लहानपणीचे मिसळप्रेमी भाग २

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
12 Oct 2007 - 8:01 am

माननीय (डॉक्टरेट इन स्त्रीवाद) प्राध्यापक

माननीय कोंबडी (बिचारी. त्या अभिजीतला बारीक करायच्या नादात दमली हो.)

माननीय चित्राताई (NPR रेडीओवर तेव्हा कूठले गाणे लागले होते ह्याची नोंद सापड्ली नाही.)

माननीय स्वाती दिनेश (पहीले प्रवासवर्णन म्हणे ह्या प्रवासानंतरच आले)

आणी पहीली पाककृती म्हणे ह्या नंतरच आली

माननीय प्रियाली (पहील्या मोहीमेवर निघताना म्हणजे त्या आधीच्या फोटोप्रमाणे थिअरी वाचून झाली मग हे प्रॅक्टिकल. त्यानंतर म्हणे ह्या विषयातील फक्त "प्रॅक्टिकल"च करणार व शिकणार. "थिअरी " नको म्हणतात. )

माननीय केशवसूमार (पहीले विडंबन म्हणे येथेच सूचले)

माननीय धनंजय (उन्हाळ्याच्या सूटीत संस्कृत ग्रंथ वाचून स्व:ताच्या घरच्यांसाठी केलेले यंत्र. खरे आहे त्यांचे साधे लेख वाचून आमचा मेंदू ओव्हरहीट होतो/ हँग होतो. बंद विंडोज परत ओपन करून सुरवात करावी लागते. त्यामुळे मनन करून लहानग्या धनूचा पण मेंदू पण बरोबर कूलर यंत्राचा शोध आधी लावू शकला. गरज ही शोधाची जननी म्हणतात ते खोटे नाही. )

माननीय आजानूकर्ण (अर्थातच कपाळमोक्ष व्हायच्या वाटेने! :-) i kid! i kid! we love our giryarohak )

माननीय लिखाळ (फोटोत मध्यभागी लहान मूलगा नाहीतर टार्गट माणूस समजायचा उंदीर, बोका वगैरे, लिखाळ हे शो श्वीट संप्रदायातले. ह्यांचे बघा कसे सगळे कसे एकदम "पिक्चर परफेक्ट". काही खोट नाही.)

माननीय नीलकांत (बिचारे केव्हापासून आपल्यासाठी "लिटरली स्वतःचे सगळे महत्वाचे सोडून" काम करत आहेत. )

माननीय कोलबेर (लाइक फादर लाइक सन)

कोलबेर

माननीय विकासराव (युनोच्या आमसभेत (युनीसेफ नाही बर का) पहील्या भाषणाच्या दिवशी. त्याचवेळेला टेक्सासहून आलेल्या एका जॉर्जचे भाषण चालु होते. त्याच्या वकृत्वावर सगळे खदाखदा हसत असताना चि. विकास यांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा होता असे म्हणे म.टा. मधे छापुन आले होते. :-))

broken image

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

12 Oct 2007 - 1:16 pm | प्रमोद देव

+++१

टग्या's picture

12 Oct 2007 - 8:19 am | टग्या (not verified)

+++१!

(किंबहुना, जगातल्या सर्वश्रेष्ठ कल्पना बहुधा तिथेच सुचत असाव्यात.)

चित्राताईही मस्त!

केशवसुमार's picture

12 Oct 2007 - 3:07 pm | केशवसुमार

हा हा हा..
एकदम बरोबर.
तेव्हाच नाही अत्तापण सिंहासन हेच आमचे प्रेरणास्थान आहे..
(पण अत्ताचा फोटो देता येणार नाही )

(शिव्हस्त) केशवसुमार

चित्रा's picture

12 Oct 2007 - 7:59 pm | चित्रा

चित्राताई स्वतःला तशा क्यूटच समजतात, पण एवढ्या??!
आणि चित्राताई एनपीआरच फक्त ऐकतात असं नाही हो, त्या तेव्हा बहुदा हे गाणे ऐकत असाव्यात.
बाकी लहानपणचे धनंजय, प्रियाली (आणि खरे तर सर्वच) मस्त!

कोलबेर's picture

12 Oct 2007 - 8:20 am | कोलबेर

हा हा हा.. चालू द्या!! अजुनही बरेच मान्यवर बाकी आहेत :-)

धनंजय's picture

12 Oct 2007 - 9:25 am | धनंजय

हसून मुरकुंडी!

सर्किट's picture

12 Oct 2007 - 11:47 am | सर्किट (not verified)

अगदी माझ्या मनःपटलावर जशा प्रतिमा आहेत तशाच !!!
(मनःपटल वगैरे शब्द प्रमोदकाकांनी सहावीत मुंजीनंतर वापरले असतील, आम्ही आत्ताच शिकलो ;-)

- सर्किट

कोलबेर's picture

12 Oct 2007 - 8:12 pm | कोलबेर

अजानुकर्ण आणि धनंजय नविन टाकलेले दिसतात.. अजानुकर्ण भारीच पण धनंजय म्हणजे १००% मन:पटलावरून!!

सर्किट's picture

12 Oct 2007 - 10:23 pm | सर्किट (not verified)

कोलबेरचा पण पिक्चर परफेक्ट फोटू नवीन टाकलेला दिसतो !! मस्त !

- सर्किट

स्वाती दिनेश's picture

12 Oct 2007 - 11:54 am | स्वाती दिनेश

हे फोटो सुध्दा आवडले... तरीच मी गहाळ झालेला फोटो शोध शोध शोधला, सापडला नाही.आत्ता कळले.:)
स्वाती

सर्किट's picture

12 Oct 2007 - 12:28 pm | सर्किट (not verified)

लिखाळांच्या चित्रात जिना डेव्हिस काय करताहेत ?

- सर्किट

प्रमोद देव's picture

12 Oct 2007 - 1:21 pm | प्रमोद देव

की हे सहजराव आवडले?

जुना अभिजित's picture

12 Oct 2007 - 2:16 pm | जुना अभिजित

दुसरे आवडले..

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रियाली's picture

12 Oct 2007 - 3:59 pm | प्रियाली

सगळे फोटो मस्त! ;) मजा आली.

विसोबा खेचर's picture

12 Oct 2007 - 4:04 pm | विसोबा खेचर

हेच म्हणतो...

केशवसुमार मस्त! नीलकांताचे कुले छानच आहेत...:)

तात्या.

प्रियाली's picture

12 Oct 2007 - 4:36 pm | प्रियाली

हा असा असायला हवा होता.

हॅलोवीन मुबारक!

राजीव अनंत भिडे's picture

12 Oct 2007 - 6:56 pm | राजीव अनंत भिडे

'लहानपणीचे मिसळप्रेमी'चे दोन्ही भाग आवडले! सगळीच चित्रे गंमतीशीर आहेत. कोलबेरचे व सहजचे अभिनंदन आणि आभार.

अवांतर --

मला दोन मुद्दे महत्वाचे वाटतात.

१) या दोन्ही भागात मिसळपाववरील काही सदस्यांच्या नावांचा व्यक्तिगत उल्लेख असूनही, 'आपापसात' या सदरांतर्गत त्यांची मुस्कटदाबी न होता हे दोन्ही भाग अद्यापही मेन स्ट्रीमवरच आहेत!

२) तसेच मिसळपावच्या माननीय पंचायतीकडून 'व्यक्तिगत लेखन नको', 'व्यक्तिगत लेखन नको' अशी उरांची बडवाबडवी न होता ते मिसळपाववरून काढूनही टाकले गेलेले नाहीत!

वरील दोन्ही मुद्द्यांमुळेच मिसळपाव हे एक अत्यंत निरोगी आणि खेळीमेळीचं वातावरण असलेलं संकेतस्थळ आहे असे मला अभिमानाने म्हणावेसे वाटते! आणि वर्षादोनवर्षांच्या आतच 'मिसळपाव' हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ होईल याबाबत मला खात्री आहे.

त्याचप्रमाणे उद्या जर कुणी इथे येऊन उगाचंच काही विष कालवू लागला तर मिसळपावची पंचायत समिती ते प्रकरण उत्तमप्रकारे आणि लोकशाही पद्धतीने हँडल करावयास समर्थ आहे असेही मला म्हणावेसे वाटते.

मी मिसळपावच्या सरपंचांना, पंचायत समितीवरील सर्व आदरणीय सदस्यांना, आणि तमाम मिसळपावकरांना नवरात्रीच्या मन:पूर्वक शुभेच्छा प्रदान करतो आणि या निमित्ताने मिसळपावचे अभिष्टचिंतन करतो!

सरपंच साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे पंचायतीच्या निवडणुका होतीलच आणि त्या व्हाव्यातच. परंतु मला स्वत:ला मात्र सध्याचीच पंचायत समिती पसंद आहे आणि माझे मत अजून पुढची एक टर्म तरी याच पंचायतीला राहील असे मी जाहीर करतो!

शुभं भवतु!

आपला,
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, दादर.

सहज's picture

12 Oct 2007 - 7:43 pm | सहज

भिडेसाहेब, आपल्याला मिसळपाव हॉटेल आवडले. आमच्या हातची एक डीश आवडली. आम्हाला देवी पावली बघा!

खरे आहे इथे बराच व्यक्तिगत उल्लेख आहे त्याचे खरे कारण आम्ही खरच एक कुटूंब आहोत. आम्हाला सगळे जवळचे आहेत. भले म्हणायला "मिसळपावची पंचायत समिती " असा शासकीय भाषा उल्लेख आहे पण खरोखरच हे सगळे लोक आपल्याच घरची मंडळी आहेत.

मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ होईल काय ते परमेश्वराला माहीत. आम्ही तरी आमचे हे एकत्र कुटूंब असेच हसत खेळत राहू देत व आमच्यावर तिची कृपादृष्टी कायम राहूदे अशी जगदंबा मातेला विनवणी करतो.

लिखाळ's picture

12 Oct 2007 - 7:08 pm | लिखाळ

वा वा .. मस्तच एकदम !
यात आमचा फोटो असल्याने हा भाग जरा जास्तच आवडला :)
मजा येत आहे. अजून इतरांचे बालपणीचे फोटो पाहण्यास उत्सूक.

माझ्याकडे वात्सल्याने पाहणारे कोण आहेत बरे? प्रमोदकाका, गुंडोपंत, राजे की अजून कोणी ? (जाणून घ्यायची उत्सूकता आहे:)

बाकी धनंजय, स्वाती, नीलकांत यांचे फोटो झकासच.

-- ("पिक्चर परफेक्ट") लिखाळ.

तो क वी डा ल डा वि क तो
(. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

असे सत्यवचन हॉटेलमधे भिंतीवर लिहले आहेच! असो तुम्हा सर्वांना आवडले व तसे तुम्ही इथे, माझ्या खरडवहीत लिहलेत. धन्यवाद.

>>मनःपटलावर जशा प्रतिमा आहेत तशाच

एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकले / वाचले असेल पण पाहीले नसेल तरी डोळ्यासमोर एक रुपरेखा असते. कधी कधी खरी ठरते तर कधी कधी ... त्यातल्या त्यात एखादी व्यक्ती खूपच गूणवान असली पण रुपात आपल्यापेक्षा किंचीत कमी असली तर एक वेगळेच मानसिक समाधान मिळते. :-) (ह्याला सामान्य मनूष्य म्हणतात )

ज्यांच्याशी संपर्क आला, ज्यांचे लिखाण वाचले गेले त्यातून काही आडाखे बांधले गेले, काही वैशिष्ट समजली. त्याचा वापर करून सर्वांचे जितके छान (and Apt)सापडू शकतील तितके छान फोटो लावण्याचा प्रयत्न केला आहे. ते कानाला हेडफोन लावलेले बाळ तर खल्लासच!!! धनंजयचा फोटो मस्तच मिळाला, बघा धनंजय आपल्याला भेटले नसते तर कदाचित तो फोटोपण आपल्या नजरेत भरला नसता. विकासराव म्हणजे मला ते हिंदी पिक्चरमधले जबाबदार कर्ते जेष्ठ बंधू जसे राम - जॅकी श्रॉफ इन राम लखन, किंवा हम साथ साथ साथ मधील मोहनीश बहल.

काही लोकांचा प्रयत्नपूर्वक लहानपणीचा चेहरा कितिही विचार केला तरी कल्पनेत (तुमच्या पैकी काही जण मला म्हणालेत की मी भन्नाट विचार करतो तरीही नाही) आणू शकत नाही उदा. अभिनेता अशोककूमार गांगूली, ए. के हंगल, यनावाला :-) ह. घ्या.

अजून कोणाला बघायचे असल्यास मला खरडीत लिहा बघू जमते का?

आजानुकर्ण's picture

17 Oct 2007 - 6:46 pm | आजानुकर्ण

+१
मस्त

यनावाला's picture

18 Oct 2007 - 9:45 pm | यनावाला

बुद्धिमत्तेची जी षडंगे आहेत त्यातील कल्पनाशक्ती हे महत्त्वाचे अंग आहे. श्री.सहज यांच्याकडे ही कल्पनाशक्ती मोठ्याप्रमाणात आहे हे त्यांच्या लेखनातून वारंवार दिसून येते. "बालपणीचे मिसळप्रेमी " यातून तर ती प्रकर्षाने दिसते. योग्य फोटो निवडून , त्यावर समर्पक मजकुर लिहून त्यांनी हा वाचनीय आणि प्रेक्षणीय लेख तयार केला आहे. सर्वच चित्रे यथायोग्य आहेत. त्यांत पहिली तीन सांगायची तरः
१. आजानुकर्ण. २. धनंजय ३. केशवसुमार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2010 - 12:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजरावांच्या धाग्यावर माझा प्रतिसाद कसा काय राहिला.
म्हणून हा प्रतिसाद. :)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

24 Feb 2010 - 1:12 am | टारझन

ह्या प्रतिसादात मला II प्राडॉस II दिसले :)

सन्जोप राव's picture

25 Feb 2010 - 6:27 am | सन्जोप राव

प्राडॉस नव्हे, प्राडॉव!
सन्जोप राव
हर एक बेजां तकल्ल्लुफ से
बगावत का इरादा है
परस्तिश की तमन्ना है
इबादत का इरादा है

अजुन कच्चाच आहे's picture

24 Feb 2010 - 8:02 pm | अजुन कच्चाच आहे

झकास धागा वर काढल्या बद्दल धन्यवाद.
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

प्रमोद देव's picture

24 Feb 2010 - 9:11 am | प्रमोद देव

पुन:प्रत्ययाचा सुखद अनुभव देऊन गेला हा धागा. :)
पण धागा प्रवर्तक सहजराव कुठे हरवले? :(
असे काही मजेशीर धागे... ही तर सहजरावांची खासियत होती.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Feb 2010 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पहा; आणि हो, शेवटी हे वाक्य लिहायला विसरू नका: ... असशील तसा परत ये, आम्ही तुझे प्रतिसाद उडवणार नाही आणि तुला कंपूबाजांचा म्होरक्या म्हणून पिडणार नाही.

अदिती

II विकास II's picture

24 Feb 2010 - 9:19 am | II विकास II

>>पण धागा प्रवर्तक सहजराव कुठे हरवले?
सहजराव या परत.
मस्त मजेदार धागा.

२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!