Skip to main content

काही अडचणी आहेत का?

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 04/05/2011 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वापरताना खूप अडचणी येत होत्या. आता जवळपास सर्वच अडचणी दूर झाल्या असतील. आता सुध्दा कुणाला मिसळपाव वापरताना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी येथे मांडाव्या किंवा मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. - नीलकांत

वाचने 39969
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by मस्त कलंदर

सर्वरवरचा लोड कमी करण्यासाठी काही सुविधा तात्पुरता बंद केल्या आहेत. लवकरात लवकर त्या सुरु करण्यात येतील.

In reply to by Nile

Agadi kalaparyant thik hota, aata mala marathitun lihita yet naahiye.

आधी धागाकर्त्याचं नावंच वाचलं नाही , त्यामुळे षिर्शक वाचुन अंमळ पाणी पिता पिताच ठसका लागला . असो , निलकांतसाहेब, खरडवहीतील स्वागत मजकुरा मधे जे टॅग्ज चालत नाहीत ते कॄपया चालु करावेत .

मिपा परत सुरू झालेलं पाहून आनंद झाला. एक अडचण अशी आहे की, नवीन सोयीसुविधा देताना त्यांच्याबद्दल सूचना मिळत नाही. उदा: मत देण्याची सोय. एखाद्या प्रतिसादाला खूप - मतं आली तर तो प्रतिसाद उडणार/उडवणार का कसं? नवीन सोयी देताना त्याबद्दल छोटीशी सूचनाही आली तर उत्तम.

ही अडचण मलाच येती आहे का सगळ्यांना हे माहीत नाही. का माझ्याच मशीन वर येते आहे हेही माहीत नाही. पण ही अडचण सध्या येत आहे - खाली खाली जात असताना शेवटचा भाग स्क्रिनवर थांबत नाही. लगेच वर सरकतो. उदा. नवीन लेख या स्क्रिन्वर जर मला खाली जाऊन पुढचे पान उघडायचे असेल तर तेथे थांबता येत नाही. स्क्रिन लगेच वरती सरकतो. पण मी आत्ता लिहीतोय या स्क्रिन्वर ही अडचण येत नाही.

नीलकांता, गेले काही दिवस मिपा खूप स्लो चालतंय रे. बघ जरा प्लीज.. बाकी, झकासच सांभाळतो आहेस.. जियो..! (संस्थापक) तात्या.

devnagari madhe lihita yet nahiye... swatache nav pan "chopya paste" karun aat shirave lagle ahe..

तसं मिपा सुरुळीत चालू आहे पणं काही वेळेला एखाद पेज ओपन व्हायला बराच वेळ लागतो....आणि ओपन झाल्यावर तो पेज एरर दाखवतो.

कुठे एरर दाखवते? ते सांगाल का? आणि मराठी व्यवस्थित चालतंय आता. चोप्य पस्ते :) करण्याची गरज नाही.

In reply to by नीलकांत

धन्यवाद मालक! देवनागरीची अडचण दुर केल्याबद्दल्....:) आणि एरर दाखवल्यावर मी लगेच तुम्हाला व्य. नि करतो.

नीलकांत, पुष्करिणीने हे तुला कळवायला सांगितले आहे - तिला लॉगिन जमत नाहीये. देवनागरी वापरुन लॉगिन करताना, देवनागरीमध्ये अक्षरे उमटत नाहीत. इंग्लिश वापरुनही होत नाही. चुकीचा पासवर्ड/ नाव असा एरर मेसेज येतो आहे तिला. पाहशील का? आज लिंका खूप वेळ घेत आहेत ओपन व्हायला.

Fatal error: Out of memory (allocated 19660800) (tried to allocate 4104 bytes) in /home/misalpav/public_html/includes/menu.inc on line 637 नवे पान / दुवा उघडायला पुर्वी पेक्षा वेळ लागत आहे.

In reply to by नन्दादीप

आत्ता उत्तर द्या याच्यावर क्लिक केल्यावर ७५ सेकंदांनी हा स्क्रिन आला. ९०% ट्क्के वेळा पान उघडताना- Fatal error: Out of memory ......... याच प्रकारचा मेसेज येतो. माझ्याकडे १ mbpsचे connection aahe आणि यावरच मिपा खटाखट चालत होते. ;-)

घरच्या नेट वरुन उघडतय. पण ऑफिस मधुन उघडत नाही. आयएसपीचा प्रॉब्लेम असेल काय? (ऑफिस ने मिपा बॅन केले नाहीये.)

थ्रेड अपडेट झालेला नीट कळत नाहीए. मला नविन प्रतिसाद दाखवतंय (मी पाहिल्यावरही पुन्हा दाखवतंय) मात्र त्यात नविन प्रतिसाद नाहीएत. काहींना प्रतिसाद आलेत पण काउंट शून्य दाखवतंय.

खात्यात पूर्वी चढवलेले चित्र आता गायब झाले आहे. खाते संपादन करून 'चित्र अपलोड करा' हा पर्याय निवडला तर नवे चित्र चढवताना खालील संदेश येत आहे: तृटी The selected file क्षयज्ञ could not be uploaded, because the destination is not properly configured. Failed to upload the picture image; the pictures directory doesn't exist or is not writable.

स्वाक्षरीच्या सोयीचा लोक गैरफायदा घेतात अनेकांनी निबंध लिहिले आहेत मजकूर छोटा स्वाक्षरी मोट्ठी असा प्रकार होतो आहे यांच्या स्वाक्षरी निबंधामुळे मिसळीवरही ताण येत असणार काय करता येइल ?

मला एक अडचण येतेय. मिपा उघडल्यानन्तर लेखाच्या नावाची अक्षरे दिसत नाहीत. नुसतेच आडवे बार दिसतात साधारण तीस सेकंदानन्तर अक्षरे उमटतात. फायरफॉक्ष वापरून हा अनुभव आला मात्र दुसर्‍या संस्थळांबाबत असे होत नाही.

मलाही खरड आल्याचे कळ्त नाही. मग खरड करणार्‍याला व्य नि करून 'खरड वाचा' असे सांगावे लागते. कारण व्य नि आलेले समजते.

In reply to by प्राजु

पण आपल्या प्रोफाइला गेल्यावर खरडवही म्हणून जो टॅब दीसतो तिथे मात्र नविन खरडींची संख्या दीसते, तेव्हा आवश्यक ते चोप्य+पस्ते करून सदरील समस्या त्वरीत मिटवावी ही विनंती.

एखादा टॉपिक वर का जातो किंवा खाली का राहतो ? ज्याला शेवटची प्रतिक्रिया तो सर्वात वर पाहिजे ते अगदी नॅचरल आहे

User guestbook (2) अशी नवीन खरडींची संख्या दिसत नाही.

In reply to by नितिन थत्ते

काही खरडी १५ दिवसांनंतर अपघाताने बघितल्या. नव्या खरडींची नोंद दाखवणे बंद का झाले आहे?

मिसळपाववर कुठल्याही धाग्याला प्रतिसाद दिल्यावर किंवा कोणालाही खरड टाकल्यावर खालील एरर दिसते:
user warning: Can't find file: 'cache_form' (errno: 2) query: cache_get /* मिसळलेला काव्यप्रेमी : cache_get */ SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache_form WHERE cid = 'form_form-284b71d897450fb041e20617378b8708' in /home/misavcom/public_html/includes/cache.inc on line 25.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

येच बोल्ने को आया था.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+२ येच बोल्ने को आयेला था | user warning: Can't find file: 'cache_form' (errno: 2) query: cache_get /* प्यारे१ : cache_get */ SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache_form WHERE cid = 'form_form-365a6b99c23ffdc16356c4bad4f15288' in /home/misavcom/public_html/includes/cache.inc on line 25.

मला माझे सदस्यनाम बदलायचे आहे. कसे बदलता येईल.

(१) खूप लांबलेल्या धाग्यांचे (पन्नासच्यावर प्रतिसाद अथवा अमुक एक केबी च्यापुढे गेल्यावर) छोटे तुकडे पाडल्यास /केल्यास बरे होईल .(२) लिखाण साठवण सेव अॅज डराफ्टचा पर्याय ठेवल्यास सवडीने मशीनवर लिहून नंतर प्रकाशित करता येईल .

In reply to by कंजूस

पूर्वी पन्नासच्यावर प्रतिसाद झाले की दुसरे पान होत असे. पण त्यामुळे नवा प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेला तर तो लोकेट करता येत नसे. ही सध्याची पद्धतच चांगली आहे. लिखाण साठवणीचा पर्याय (बटण) पूर्वी होते. पण ते कधी चालल्याचे स्मरत नाही.

फोटो कसे चिटकयायचे..? मि नेहमीची सदस्य नाहिये.

मला मिपावर लॉग इन करण्यासाठी, हल्ली वन टाइम पासवर्ड ने करावे लागते. माझा जुना पासवर्ड माझ्या सिसटम्मध्ये साठविला होता, आता गेले ४ ते ५ महिने प्रत्येकवेळी नवा घ्यावा लागतो, तेव्हा माझी हि अडचण क्रुपया दूर करावी. विनोद१८

In reply to by विनोद१८

वन टाइम पासवर्डने लॉगीन केलं की ताबडतोब आधी तुमचा पसवर्ड बदलून घ्या. उजव्या समासात 'आवागमन'च्या खालीच तुमचं सदस्य नाम दिसेल. त्या लिंकवर क्लिककरुन 'संपादन' टॅबमध्ये गेल्यावर तुम्हाला पासवर्ड बदलता येईल.

पोलिस खात्यात साहेबांचा दरबार असतो. त्यात साहेब विचारतात काही अडचणी आहेत का? त्या वेळी काही अडचणी नाही अशा आशयाचे मौन बाळगायचे असते. काही अडचण तुम्ही सांगितली की तुम्ही अडचणीत आलाच म्हणुन समजा असे अनुभवी सहकार्‍यांनी सांगितले होते त्याची आठवण आली.

२ सुचना प्रतिसाद दिल्यानतर जर तो एडिट करावासा वाटला तर करता येईल अशी व्यवस्था मी.पा वर करता येणे शक्य आहे का? एखादा धागा गुंफला व समजा तो योग्य न वाटणे वा अन्य कारणास्तव डिलिट करावासा वाटला तर तशी सोय करता येईल का?? सदर सुविधा फेस बुक व अन्य ठिकाणी आढळतात त्या वरुन हे सुचले म्हणुन शेअर करित आहे

खरड आली हे कधी कळणार? आणि आधी खरड करताना "उत्तर द्या" असा टॅब होता. ज्यामुळे सरळ दुसर्‍याच्या खरडवहीमध्ये जाता येत होते. आता जे Add Comments येत आहे त्याने आपल्यालाच खरड जातेय...

शोध हा पर्याय पूर्णत: काढून टाकण्यात आला आहे का? धागे शोधण्याचा काही मार्ग उपलब्ध नाही. अनेक वर्ष शोध नीट चालत नव्हता तो काही काळापूर्वी उत्तम काम करायला लागला होता तांत्रिक सुधारणांमुळे. अशी चांगली चालणारी उपयुक्त सुविधा बंद होण्याचं कारण समजलं नाही. आणि सहज दिसेल / सापडेल अशा ठिकाणी हे असावे. नाही तर शोधचाच शोध अपयशी होतो..

१. खरड आल्याचं इमेल नोटीफीकेशन खात्यात सुरू आहे, पण इमेल येत नाही. २. या धाग्यावर पूर्वपरिक्षणाशिवाय प्रतिसाद प्रकाशित करण्याची सोय नाही.

नीलकांत साहेब अहो, मि लोग-इन होताना प्रत्येक वेळी सान्केतिक शब्द चुकीचा टाकला आहे असा message का येतो. मग वन टाइम पासवर्ड ने करावे लागते. प्रमोद देर्देकर कळवा - ठाणे

लोग इन झालो तरि लोग इन झाल्याचे जाणवत नाही,परत परत लोगिन करावे लागते,एकदा लोगिन झाले की धागा वाचुन सम्पल्यावर वर जाण्यासाठी एरो वर क्लिक केल्या वर कधी कधी स्वग्रुहात जाते आणि लोग ओउट झाले असे जाणवते.

१. मिपा वर लोग इन होणे माहित आहे, लोग आउट कस होतात? (कुठे होतात त्यचि लिन्क मिळेल का?) २. पासवर्ड विसरल्यास - १ टाइम पास-वर्ड वापरुन झाल्यावर, दुसर्या दिवशि नविन लोग इन कसे व्हावे? जुन्या आयडि ला नविन पासवर्ड द्याव कि नव खात उघडाव? (त्याचि लिन्क मिळेल का?) ३. व्यनि म्हन्जे काय? ते कसे चेक करवे? (त्याचि लिन्क मिळेल का?)

१. मिपा वर लोग इन होणे माहित आहे, लोग आउट कस होतात? (कुठे होतात त्यचि लिन्क मिळेल का?)
- उजव्या समासात गमन दुवा आहे. त्याने लॉग आउट करता येते
२. पासवर्ड विसरल्यास - १ टाइम पास-वर्ड वापरुन झाल्यावर, दुसर्या दिवशि नविन लोग इन कसे व्हावे? जुन्या आयडि ला नविन पासवर्ड द्याव कि नव खात उघडाव? (त्याचि लिन्क मिळेल का?)
बहुतेक तरी अशा वेळी नव्याने वन टाइम पासवर्ड मागवता येतो. या कारणास्तव नवं खातं उघडण्याची गरज नाही.
३. व्यनि म्हन्जे काय? ते कसे चेक करवे? (त्याचि लिन्क मिळेल का?)
व्यनि हे व्यक्तिगत निरोपचे लघुरुप आहे. या सुविधेद्वारे मिपाकर एकमेकांना संदेश पाठवू शकतात. उजव्या समासात संदेश हा दुवा आहे. अधिक काही प्रश्न असल्यास प्रथम मदत पानांवरची माहिती वाचा. त्यातून नेमकी उत्तरे न मिळाल्यास इथे प्रतिसादाद्वारे प्रश्न विचारू शकता. मिपावर स्वागत व मिपावाटचालीसाठी शुभेच्छा!!

भ्रमणध्वनीमधून मिपा बघताना उजव्या बाजूला सरकत गेलेले उपप्रतिसाद अजिबात दिसत नाहीत. साधारणपणे मूळ प्रतिसादावर उपप्रतिसाद, त्यावर अजून उपप्रतिसाद, त्यावर अजून एक उपप्रतिसाद . . . असा प्रतिसादांचा ट्री तयार झाला की साधारणपणे चौथ्या किंवा पाचव्या उपप्रतिसादांपासून पुढील उपप्रतिसाद अजिबात दिसत नाहीत.