.....या हीडीस रूपातदेखील जर कोणी त्याच्यावर प्रेम केलं तर त्याला पुनः पूर्वरूप प्राप्त होऊ शकेल>>>
ह्या दृष्टीनी या गोष्टीकडे कधीच पाहिले नव्हते.
मला वाटते, वृश्चिक राशीचे सोडून बाकी सगळयांना ही गोष्ट आवडेल! ;)
(वृश्चिकेशी षडाष्टक वाली) माउ.
ही तुलना सुंदरच आहे आणि यात ज्योतिषावर विश्वास अविश्वासचा प्रश्नच येऊ नये.
हे तर माणसाच्या आयुष्यातल्या संकल्पनांवर आधारित आहे. बाकी ग्रहांमुळे होतं की आणि कशामुळे याचा इथे संबंधच नाही.
प्लुटो हा लिटरली एक ग्रह न मानता एक स्वभाव मानावा हवं तर.
आवडलं.
वैयक्तिक मत : बाराही राशींमध्ये सर्वात जास्त बदनाम केली गेलेली रास म्हणजे वृश्चिक. वृश्चिकेचा फटकळपणा, डंख मारण्याची वृत्ती, उन्मादक आणि कामुकता, सूड घेण्याची मनोवृत्ती, सत्ता व वर्चस्वासाठीची आकांक्षा याच गुणधर्मांवर आजवर अनेक ज्योतिषी रसाळपणे बोलले आहेत. जाहीर कार्यक्रम करणारे शरद उपाध्येसुद्धा त्याला अपवाद नाहीत.
"वृश्चिकेचा फटकळपणा, डंख मारण्याची वृत्ती, उन्मादक आणि कामुकता, सूड घेण्याची मनोवृत्ती, सत्ता व वर्चस्वासाठीची आकांक्षा याच गुणधर्मांवर " फिदा होउन मी वृश्चिकेवर जन्म घेतला आहे.
काय होतं ही असे स्वभाव विशेष वाचले ना की आपण नकळत तसे होत जातो किंवा आपल्या प्रत्येक क्रुतीला याच नजरेतुन पाहायला लागतो. नाही तर आपला स्वभाव कळत नकळत असा बनवत जातो.
पण आजच्या जगात सुखानं जगायला हे सगळे अतिशय आवश्यक गुण आहेत.
बाकी गोष्ट छान होती, मी वृश्चिकेचा असुन मला आवडली, तसे पण वृश्चिकेवे सारे जरा आत्मकेंद्रिच असतात, स्वतबद्दल सगळ्या गोष्टींचं यांना खुप कॉतुक असतं हे मात्र खरं.
हर्षद.
उत्साह मस्त असतो तुम्हा लोकांचा... काम आणि कामात जोरदार रस घेता तुम्ही मंडळी! :)
फिदा होउन मी वृश्चिकेवर जन्म घेतला आहे. हे जन्म कधी आणि कुठे घ्यायचा हेच तर आपल्या हातात नसते ना... सगळा लोच्या तिथेच आहे!
जे काही आहे ते आपल्याला 'मिळते' आणि ते स्विकारण्या शिवाय आपल्या हातात काय असते?
लिहिलेले आवडले ..
वृश्चिक रास अआणि प्लुटो ग्रह यांच्या बद्दल असे जास्त काही माहिती नव्हते .. त्यामुळे सगळे नविन वाटले.
अवांतर : मकर रास आणि स्वामी शनी या बद्दल आहे का हो काही माहिती कोणाकडे ?
वृश्चिक फार आडमुठे आणि सत्ता गाजवणारे असतात. माझं आणि वृश्चिकेच्या व्यक्तींचं कधीच प्टलं नाही. "एकवेळ साप सोडावा पण विंचू ठेचावाच" असं कुठेतरी वाचलं आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. ;-)
(वृश्चिक राशीच्या लोकांनी लगेच नांगी उगारू नये. राशीवरून माणसाचा स्वभाव ठरतो हे जितकं खरं आहे तितकंच माझं वरील विधान खरं आहे. )
हे लोक फारच आत्मकेद्रीत असतात (कारस्थानी सूध्दा). पण फक्त मैत्री म्हणूनच जर यांचा आपल्या जीवनात प्रवेश घडला असेल तर फारच विश्वासू नाहीतर कीतीही आपले वाटले तरी कारस्थानीच साले.
>वृश्चिक फार आडमुठे आणि सत्ता गाजवणारे असतात.
लग्न झाले की स्त्रीचे नाव बदलते (सहसा, आजकाल नसेलही चू. भू. दे. घे.) तशी रासही बदलते की काय? जाणकारांनी खुलासा करावा.
'बायको' हा शब्दच खतरनाक आहे!
एकदा का प्रेयसी ते बायको हे परिवर्तन झाले की, आपण लोक खल्लास!
यांना रास, ग्रह ज्योतिष वगैरे सर्व गैरलागू असते.
लग्न झाल्यावर माझा तर आवाज जो काही बसला रे बाबांन्नो, तो अजून परत आला नाही...
तशात ही समोर आली की तो आवाज अजून खोल जातो आणि तीचा वर! ;)
कथा छान आहे.
मी वृश्चिक राशीचा आहे (आपल्या मराठी ज्योतिषानुसार). मराठी आणि पाश्चात्य राशींमध्ये फरक असतो का?
म्हणजे मराठी वृश्चिक रास आणि इंग्रजी वृश्चिक रास यांचे गुणधर्म सारखे असतात काय?
सर्वात प्रथम,
ज्यांना ज्योतिष हे थोतांड वगैरे वाटत असेल त्यांनी हा लेख वाचू नये अथवा समं ना सांगून वरील पर्यायातून "ज्योतिष" हा पर्याय काढून टाकायची मागणी करावी. या धाग्यावर अवांतर करू नये ही विनंती. झकास ढिस्क्लेमर टाकून फालतू प्रतिक्रियांना ढीस्स केल्या बद्दल अभिनंदन! उत्तम केलेत.
कथा, ग्रह आणि राशी याची उत्तम सांगड घातली आहे. हे मी आधी वाचले नव्हते त्यामुळे आवडले.
वर वृश्चिक राशीवर काहीजण बरसलेले दिसत आहेत.
असे बरसू नका नकारात्मक ग्रह करून घेऊ नका. प्रत्येकच राशीचे चांगले आणि वाईट गुणधर्म आहेत.
या राशीच्या विवेचनानंतर कदाचित तुम्ही त्यांना जास्त समजून घेऊ शकाल.
एखादा वृश्चिक राशीची व्यक्ती तुमच्या दृष्टीकोनातून वाईट वाटलीही असेल. पण त्याच वेळी त्याच्या कुंडलीतील चंद्राची, मंगळाची, गुरू आदी ग्रहांची स्थिती तसेच त्यांचे दृष्टी योग काय आहेत हे ही पाहिले पाहिजे.
वृश्चिक ही जल तत्वाची स्थिर राशी आहे. या राशीची व्यक्ती बहुदा स्वावलंबी असण्याच्या प्रयत्नात असते. तसेच यांची मते अतिशय ठाम असतात. भावना बहुदा तीव्र स्वरूपाने दिसून येतात. (यामुळेही काही वेळा ही मंडळी त्रासदायक वाटू शकतात!) तरल बुद्धीमत्तेच्या या व्यक्ती, प्रेम अतिशय उत्कटतेने करतात. शैय्यासुखाची आसक्ती असते. जोडीदाराची अतिशय काळजी घेतात पण टीका अजिबात आवडत नाही. (अर्थात कुणाला आवडते म्हणा...?) मनात आणले तर वृश्चिकेच्या व्यक्ती वेळप्रसंगी पर्वत महंमदाकडे घेऊन जाणार्या असतात. काहीश्या उधळ्या स्वभावाच्याही असतात. पैसा साठवणे जड जाते जरा यांना. :)
या व्यक्ती मध्यमकाळात अतिशय उत्तम मैत्री निभावतात पण यांचे शत्रुत्व अतिशय वाईट!
एक लक्षात ठेवा वृश्चिक राशीची व्यक्ती अतिशय कुटुंब वत्सल असते. आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. कोणतीही झीज सोसण्याची तयारी ठेवतात. माझ्यामते हा फार महत्त्वाचा गूण आहे.
परत एकदा वरील सर्व गूणावगूण हे पत्रिकेतील/कुंडलीतील चंद्राची, मंगळाची, गुरू आदी ग्रहांची स्थिती तसेच त्यांचे दृष्टी योग काय आहेत यावर अवलंबून असते.
सध्या इतकेच.
+१
अगदी अगदी !! वाचायला आवडेल, कारण आम्हा सिंह वाल्यांबद्दल असंच काहीबाही बोलतात लोक, आम्ही अहंकारी असतो वैगरे. अर्थात लोकांच्या बोलण्याला भीक घालू ते आम्ही कुठले. ;)
आणखी एक, हे स्वभावविशेष सरसकट त्या राशीला लागू होतात, की राशीतल्या तीन नक्षत्रांनुसार त्या बाबतीत थोडाफार बदल होतो ??
+१००००० टु धमु.
मला पण, वर गुंडोपंतांनी सांगितलेलं माझ्याबाबतीत तर बरेच खरं आहे, विशेषतः उधळेपणा वगॅरे. पण या सगळ्या गुण आणि अवगुणांचा मला निश्चितच अभिमान आहे.
हर्षद.
प्रतिक्रिया
प्रतिसाद
.....या हीडीस रूपातदेखील जर
डिट्टो
??
ही तुलना सुंदरच आहे आणि यात
ह्ह्म्म्म !! ज्योतिष माहिती
वृश्चिक राशीबद्दल गैरसमजच फार...
अवांतरः कर्सर पर्यन्त प्रेषण
"वृश्चिकेचा फटकळपणा, डंख
मी पण
उत्साह
लिहिलेले आवडले .. वृश्चिक रास
मस्त लेख, पण शूचीतै आपली रास कोणती आहे ?
वृश्चिक फार आडमुठे आणि सत्ता
सहमत
:-)
जबरी!
काकु छान लिहले आहे.
यावरून आठवले
?!
छान आहे
वर वृश्चिक राशीवर काहीजण बरसलेले दिसत आहेत.
प्रतिसादातील माहिती
मस्त माहिती
छान लिहिलंय. सगळ्यांच
+१ अगदी अगदी !! वाचायला
+१
व्वा!
+१००००० टु धमु. मला पण, वर
वृश्चिक असल्याचा पुन्हा एकदा
अर्रे धमाल! तू बी वृश्चिक? वा