दिनांक ४ जानेवारी २०११ रोजी होणारे काही व्यक्तीना भाग्यदायी ठरायची शक्यता आहे. यापैकी ज्यांना ते विशेष भाग्यदायी ठरेल त्यांच्या जन्मतारखा पुढे देत आहे.
खालील दिलेल्या कालवधीत जन्म झालेल्या व्यक्तीना जन्मपत्रिकेतिल गुरुशी ग्रहणाची अमावस्या युती अथवा नवपंचम योग करते, त्यामुळे ती काही ना काही प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. या व्यक्तींचा गुरु जर लग्नाशी किंवा दशमभाव आरंभ बिंदूशी युती तर ’लाईफ जिंगा लाला’ ठरण्याची शक्यता आहे...
२२ जाने ते १० फेब्रु १९३७, १५ जुलै ते ३१ ऑगस्ट १९४०, ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर १९४०
३ मार्च ते २४ मार्च १९४१,
१८ सप्टे ते ७ ऑक्टोबर १९४४
६ जाने ते २४ जाने १९४९
२० जून ते १२ जुलै १९५२, १० नोव्हे ते १६ डिसे १९५२
२५ जाने ते १ मार्च १९५३
२ सप्टे ते २१ सप्टे १९५६
२१ डिसे १९६० ते ७ जाने १९६१
३१ मे ते १९ जून १९६४
१८ ऑगस्ट ते ५ सप्टे १९६८
४ डिसे ते २२ डिसे १९७२
१४ मे ते १ जून १९७६
१ ऑगस्ट ते २० ऑगस्ट १९८०
१६ नोवे ते ६ डिसे १९८४
या शिवाय कोणत्याही वर्षात खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तीना ग्रहणाची अमावस्या शुभ अथवा लाभदायक ठरेल...
२ जाने ते ७ जाने
१ मे ते ७ मे
४ सप्टे ते ८ सप्टे
या शिवाय सायन वृषभ रास १० अंश ते १६ अंश, सायन कन्या रास १० अंश ते १६ अंश यात कोणतेही ग्रह असल्यास त्यांनी जन्मपत्रिकेत केलेल्या योगानुसार ग्रहणाची शुभ फले मिळतील.
टीप - -आपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल (upadhye.rajeev@gmail.com)वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.
ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहे, त्यांनी या (https://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
छ्या ! हा अन्याय आहे !!
छ्या ! हा अन्याय आहे !!
मागच्या अशुभ मधे पण आमची तारिख नाही.. या शुभमधे पण तारिख नाही
आमचं नशीबच खत्रुड असण्याची शक्यता नाकारता येत नाहि.
मागच्या अशुभ मधे पण आमची
In reply to छ्या ! हा अन्याय आहे !! by अवलिया
लगता है पूरी कायनात ने आपको नजर अंदाज करने की साजिश की है!
- टारूख्खान
छ्या ! हा अन्याय आहे
छ्या ! हा अन्याय आहे !!
मागच्या अशुभ मधे पण आमची तारिख नाही.. या शुभमधे पण तारिख नाही >>>
नान्याशी प्रंचड सहमत !!!
हे काय चाल्लय ?
:-)
In reply to छ्या ! हा अन्याय आहे by सुहास..
ग्रहण उधळून लावा! :-)
हे काय चाललंय?? आमचीही तारीख
In reply to :-) by सहज
हे काय चाललंय?? आमचीही तारीख नाही! त्यामुळे या असल्या ग्रहणांना आमचा जाहीर विरोध आहे.
हे ग्रहण रद्द करता येऊ शकेल काय? पुढच्या वेळी आमच्या तारखा 'शुभ' विभागात असणारे ग्रहण भरवणे कितपत शक्य आहे? कृपया ग्रहण आयोजकांनी खुलासा करावा!!!
--असुर
+१
In reply to हे काय चाललंय?? आमचीही तारीख by असुर
सहमत आहे.
आमची जन्मतारीख शुभ यादीत का नाही याची जेपीसी मार्फत चौकशी करायला हवी. सरकार नक्कीच काहीतरी लपवत आहे.
जेपीसी नेमली जात नाही तोपर्यंत आम्ही कुठलेच ग्रहण होऊ देणार नाही. :)
आपलि जेपीसी मागनि मन्जुर
In reply to +१ by नितिन थत्ते
आपलि जेपीसी मागनि मन्जुर झालेलि आहे, लवकरच दहा वर्शात अहवाल सादर करु,
तोपर्यन्त सहकार्य करावे.
ग्रहनाला असे थांबवु नये, अमेरिका नाराज होते.
ग्रहण
महराष्ट्रात हे ग्रहण जर दिसणार नसेल तरी
त्याची शुभाशुभ फले वरीलप्रमाणेच समजावीत का?
का फक्त जिथे ग्रहण दिसते त्याच भागापुरते हे स॑ब॑धीत आहे?
महराष्ट्रात हे ग्रहण जर
In reply to ग्रहण by kamalakant samant
उत्तर हो असे आहे.
आमच्या मते
आमच्या मते ४ जानेवारी २०११ चे सूर्यग्रहण ज्यांना कुणाला याची देही याची डोळा पाहावयास मिळेल त्यांचे पुढील समस्त जीवन एक नयनरम्य अतिदुर्मिळ खगोलीय अविष्कार पाहाण्याच्या आनंदात जाईल.
धाग्याचा सारांश : विषिष्ठ
धाग्याचा सारांश : विषिष्ठ सुविधांसाठी युयुत्सु शुल्क स्विकारतात =))
मिपाची कुंडली बनवता येईल काय
मिपाची कुंडली बनवता येईल काय हो ? साला आमच्या मिपाला आजकाल रोजच ग्रहण लागायला लागलय.
आम्हि सुर्या वर राहतो, आमाला
आम्हि सुर्या वर राहतो,
आमाला कोन्ते ग्रहन लागु होते ?
किव्वा
आम्हि कोनाला ग्रहन म्हनुन लागतो ?
मुक्काम पोस्ट : सुर्य (वेस्ट).
मुक्काम पोस्ट : सुर्य (वेस्ट).
In reply to आम्हि सुर्या वर राहतो, आमाला by नरेशकुमार
सुर्यनरेश...वेस्ट ला कुट?
ते नाय का तिकडं, तिथुन डाव्या
In reply to मुक्काम पोस्ट : सुर्य (वेस्ट). by नावातकायआहे
ते नाय का तिकडं,
तिथुन डाव्या बाजुनि गेलो कि उजव्या बाजुचा शेवटचा बन्गला.
तिकडे आलात कि कोन्त्याहि शेम्ब्ड्या पोराला इचारा, (पोरग शेम्बडं असन आवश्यक आहे बरकां)
शुभ आणि अशुभ
मागच्या वेळच्या एका चंद्रग्रहणाच्या अशुभ यादीत व या सूर्यग्रहणाच्या शुभ यादीत दोन्हीमध्ये माझी तारीख बघून बरं वाटलं.
राबट, चंद्रग्रहण इसे जीने नही देगा, और सूर्यग्रहण इसे मरने नही देगा.