✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पारध

स — सहज, Wed, 06/30/2010 - 10:03
वस्ती पाखरांची स्थिरावलेली होती हाव पारध्याची उफाळलेली होती नशा हो सत्तेची नित्य चढत होती भूक जुगार्‍याची चाळवलेली होती गात्रे पाखरांची फुलली देखील नव्हती तरी पसरुनी जाळी सर्वत्र टाकली होती पिसे कापण्याची ही चाल धूर्त होती बहेलियानेच त्यांची तोंडे बांधली होती नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती

प्रतिक्रिया द्या
3845 वाचन

💬 प्रतिसाद (24)

आता मी पण......

रामदास
Wed, 06/30/2010 - 10:06 नवीन
पारध्यांची वस्ती ही एक स्वतंत्र कविता लिहीणार आहे.
  • Log in or register to post comments

लवकर लिहा !

अवलिया
Wed, 06/30/2010 - 15:58 नवीन
लवकर लिहा ! लवकर लिहा !! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

कोणाची

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/30/2010 - 11:19 नवीन
कोणाची 'शिकार' आता? आणि कोण 'नवी कबूतरं'?? ;-) अदिती
  • Log in or register to post comments

छान ! पाखरं

अवलिया
Wed, 06/30/2010 - 11:29 नवीन
छान ! पाखरं पारध करतांना पाहुन डो़ळे पाणावले --अवलिया
  • Log in or register to post comments

कुंथ कुंथ

टारझन
Wed, 06/30/2010 - 12:32 नवीन
कुंथ कुंथ के ... दिल से एक आवाज निकली आदाब अर्ज है .. कुंथ कुंथ के ... दिल से एक आवाज निकली गौर फर्माईयेगा हजुर .. कुंथ कुंथ के ... दिल से एक आवाज निकली सहज राव के कमर से आज अचानक तलवार निकली व्वा व्वा !! व्वा व्वा !! - (कवतिक भुर्जी) टारेश आदाबार्जवी
  • Log in or register to post comments

सहज कविता

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/30/2010 - 13:16 नवीन
सहज कविता छान आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments

नव्या

शरदिनी
Wed, 06/30/2010 - 13:58 नवीन
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती ओळी विशेष आवडल्या.... :)
  • Log in or register to post comments

छान

आंबोळी
Wed, 06/30/2010 - 15:01 नवीन
छान आहे. बहेलिया म्हणजे काय ? आंबोळी
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
Wed, 06/30/2010 - 15:50 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

स्क्रिप्ट

II विकास II
Wed, 06/30/2010 - 16:43 नवीन
स्क्रिप्ट का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

खुपंच छाण !!

टारझन
Wed, 06/30/2010 - 15:56 नवीन
खुपंच छाण !! - टारझन
  • Log in or register to post comments

काय चालु आहे ?

छोटा डॉन
Wed, 06/30/2010 - 16:24 नवीन
एक प्रतिसाद किती वेळा टाकणार ? एकदा उडालेला प्रतिसाद पुन्हा किती वेळा पेस्ट कारणार ? नक्की प्रॉब्लेम काय आहे ? इथे संपादकांना इतर काही कामे नाहीत म्हणुन ते उडवाउडवी करत बसतात असा समज आहे का वारंवार एकच प्रतिसाद चिटकवणार्‍यांचा ? हे प्रकार त्वरित थांबवा अशी विनंती. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

सुंदर रे..!

विसोबा खेचर
Wed, 06/30/2010 - 16:25 नवीन
सुंदर रे..! Image removed.
  • Log in or register to post comments

गझल

मीनल
Wed, 06/30/2010 - 22:15 नवीन
आशय चांगला आहे. शेवट तर फारच वास्तव आहे. हे प्रासंगिक काव्य ते चित्र डोळ्यासमोर आणते आहे. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त हं...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/30/2010 - 17:48 नवीन
सहजा, कवितेतला आशय वास्तवाची जाण करुन देणारा आहे. कविता आवडलीच हे वेगळे सांगणे न लगे. अनंत काणेकरांच्या 'सांबर' नावाच्या एकांकिकेची आठवण झाली. पारध संस्कृती विरुद्ध कला संस्कृती असा तो संघर्ष होता. 'सांबराला' मारायला गेलेला अदिवासी तरुण सांबराच्या डोळ्यात पाहता पाहता प्रेयसीला त्या सांबरात पाहतो आपलं अस्तित्त्व हरवतो सांबर अखेर आपली शिंगे मारुन त्याला मारतो. या एकांकीकेतला आशय वेगळा असला तरी सारांश सांगायचे असे की, शिकारी नेहमीच यशस्वी होईल असे काही नाही. अवांतर : सहजराव आपण नेहमी चांगले लिहिता हे अनेकांना माहित आहे. बालकांच्यासाठी अनुवादित केलेल्या कविता, काही माहितीपूर्ण लेखन, विविध आशयाच्या कविता, असा बराच खजिना आपल्याकडे आहे, तो येऊ द्या....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बालकांच्य

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/30/2010 - 18:08 नवीन
बालकांच्यासाठी अनुवादित केलेल्या कविता सहमत आहे. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बालकांच्यासाठी अनुवादित केलेल्या कविता

आंबोळी
Wed, 06/30/2010 - 18:11 नवीन
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती मला वाटतय ही कविता पण बालकांसाठीच आहे... काय सहजराव? आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

अनंत

राजेश घासकडवी
Wed, 06/30/2010 - 18:47 नवीन
अनंत काणेकरांच्या 'सांबर' नावाच्या एकांकिकेची आठवण झाली.
बिरुटेसर, ती एकांकिका मलाही आठवते आहे. तीतला कॅनव्हास थोडा मोठा होता. पारंपारिक समाजरीती न पाळणार्‍या कलाकाराची समाजात कशी कुचंबणा होते, व त्यात त्याचा आत्मा कसा मरतो याचं चित्रण होतं. त्यातलं पारधी हे रूपक खूपच वेगळ्या अर्थाने आलं होतं असं वाटतं. अधिक व्यापक व सहज बोट न ठेवता येण्यासारखं. या कवितेतला पारधी हा अधिक वैयक्तिक अनुभूतींतून आल्यासारखा वाटतो. जास्त लोकलाइज्ड वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी बरोबर...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/30/2010 - 23:07 नवीन
पारंपारिक समाजरीती न पाळणार्‍या कलाकाराची समाजात कशी कुचंबणा होते, व त्यात त्याचा आत्मा कसा मरतो याचं चित्रण होतं. त्यातलं पारधी हे रूपक खूपच वेगळ्या अर्थाने आलं होतं असं वाटतं. अगदी बरोबर...! मुग्लीमाय,झिप्री, कुंजा या सर्वांची मला आठवण आहे. दोन वर्षापूर्वी अभ्यासक्रमात ही एकांकिका पोरांना शिकवायला होती. सांबर मारला तर कुंजा परिपूर्ण पुरुष बनणार असतो. पण, याचे कलाप्रेम आडवे येते. असो, तो विषयच वेगळा होता. कवितेतील 'पारधी' भोवतीच प्रतिसाद रेंगाळतील की काय असे वाटले आणि नेमके मला वेगळ्या अर्थाने वरील एकांकिकेची आठवण झाली. कलेवर प्रेम करणारा माणूस. समाज परंपरेनुसार त्याला शिकारीसाठी जावे लागते तरी तो केवळ कलेच्या प्रेमापोटी शिकारी असूनही शिकार करीत नाही. ही गोष्ट मला उगाच महत्त्वाची वाटली आणि एकांकिकेची आठवण झाली. असो, थांबतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आवडली....

प्रभो
Wed, 06/30/2010 - 18:16 नवीन
आवडली....
  • Log in or register to post comments

कविता

स्वाती दिनेश
Wed, 06/30/2010 - 18:52 नवीन
कविता आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments

अंगावर काटा आला ...

वाहीदा
Wed, 06/30/2010 - 19:19 नवीन
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती आशेतून निराशे कडे पण वरिल ओळी खुपच आवड्ल्या ! अवांतर : बहेलिया हा हिंदी शब्द येथे घेतला आहे बहेलिया = FOWLER - someone who hunts wild birds for food ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

नव्या

Nile
Wed, 06/30/2010 - 23:21 नवीन
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
कविता आवडली पण शेवटच्या ओळीतील आत्मस्तुती खटकली. ;) -Nile
  • Log in or register to post comments

छान

पाषाणभेद
गुरुवार, 07/01/2010 - 02:53 नवीन
छान कविता. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा