“बुडीत खाते“ माझेहि ! !
सध्या मिपा वर सन्माननीय सभासदाचा प्रचंड "काथ्याकुट" सुरु आहे बुडीत “ खा s s त्या"च्या “ हिशेबाचा ! ! ! जो माझ्यासारख्या सामान्य व नवीन मिपाकराच्या आकलना पलीकडे आहे. वाटलं आपणही आपला “ हिशेब ” सांगून मोकळ झालेलं बरं ! कदाचित सन्माननीय सभासंदांना ह्या मनस्तापाचा ताण कमी होण्यांस थोडीफार मदत होईल
कोरीच पान आयुष्याची ! ! !
मसणांत गोवऱ्या गेल्या
अन आयुष्याच्या अस्ताला आलो
नुरले नव्हते आता काही
तरी जीवनाच्या हिशेबाला बसलो
आयुष्याचा ताळेबंद तपासण्याचा,
कोरे कागदं रंगवण्याचा,
पुन्हा पुन्हा केला प्रयत्न.
जीवन च धूसर झालेलं,
व्यर्थ ठरले सारे यत्न.
काय कमावले काय गमावले
हिशेब कधी जुळलाच नाही
आयुष्याची ची कोरी पानं
रंगांत कधी भिजलीच नाहीत.
निरंजन वहाळेकर
चांगली कविता
खूप
छान
छाण !! बाकी
धन्यवाद ! व मनस्वी आभार.! !
रंग रंगी रंगलो
धन्यवाद ! व मनस्वी आभार.! !