आमची प्रेरणा छायाताईंचा वाढदिवस आणि ढवळ्या व पवळ्या चे 'वाढ'-दाढ दिवस
हे रोजचेच बघणे ,बघण्यात वेळ गेला
मागून हर मुलीच्या पळण्यात वेळ गेला
कटल्या किती तरी पण ,पटल्या किती तरी ही
पटल्या चुकून त्यांना जपण्यात वेळ गेला
जमवून धाडसाने संवाद साधताना
गालास सुजवलेल्या धरण्यात वेळ गेला
उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता
वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला
नुसताच वाढला तू एरंड वाढल्यागत
"केश्या" तुला अरे हे कळण्यात वेळ गेला
प्रतिक्रिया
16 Dec 2009 - 4:58 pm | दशानन
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
निशब्द !
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
16 Dec 2009 - 5:03 pm | प्रमोद देव
उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता
वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला
हे एकदम खास.
एकूण विडंबन मस्तच!
16 Dec 2009 - 5:15 pm | टारझन
पण बाकी विडंबन मस्त!
हे काही कळले नाही; पण बाकी प्रतिक्रिया मस्त!
-चुकभुल देव घेव
16 Dec 2009 - 5:19 pm | केशवसुमार
मिश्टेक हुवा.. दुरुस्ती किया है..
धन्यवाद..
16 Dec 2009 - 5:34 pm | jaypal
>जमवून धाडसाने संवाद साधताना

गालास सुजवलेल्या धरण्यात वेळ गेला
हे बाकी सट्याक
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
16 Dec 2009 - 6:09 pm | चतुरंग
उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता
वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला
म्हणजे तुमचीही आता 'मामा बनून भाचे मी खेळवीन म्हणतो' ची वेळ झाली म्हणायची! ;)
(एरंड)चतुरंग
16 Dec 2009 - 11:37 pm | मी-सौरभ
असंच किती दिवस चालणार?????????????
-----
सौरभ :)
16 Dec 2009 - 8:42 pm | रेवती
उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता
वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला
हीहीही. भारीच. बाकी कधीतरी आपणही 'पवळ्या' म्हणून का होइना प्ररणादायी ;) ठरलो असल्याची भावना सुखावून गेली.;)
रेवती
17 Dec 2009 - 10:23 am | हर्षद आनंदी
तुह्या नावातुन कान्हा टपकुन राहिला ना बे, आनि त्वा असी भाषा करताव, मंग मायला आमी कह्याकडे बगावं?
भावना बाकी छान पोचल्या,
कृष्णाचे परमभक्त...
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
17 Dec 2009 - 11:59 am | श्रावण मोडक
जोरदार. चालू द्या!!!