माझी रेल्वे यात्रा
रेल्वे प्रवास... मला माझ्या लहानपणा पासुन हा प्रवास अत्यंत ओढ लावणारा,उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे... झुकझुक अगीन गाडी... लहानपणी कोळशाच्या इंधनावर चालणार्या गाड्या फार वेगळा प्रवासाचा अनुभव द्यायच्या... धूर,खिडकीतुन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केल्यास डोळ्यात जाणारे बारीक कोळश्याचे कण ! आणि त्यामुळे डोळा लाल होउन पाणी यायचे... अश्या अनेक आणि अगणित आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. निरिक्षण करत प्रवास करणे ही माझी आवड आणि सवय सुद्धा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी टिपण्यास,समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होते.
आता डिझेल आणि इलेक्ट्रीक पॉवरवर धावणारी इंजिन्स आहेत... आणि यांच्या प्रवासातुन सुद्धा वेगळा आनंद मला मिळतोच ! :)
२०११ साली इंदुरला जाताना मी काही फोटो प्रवास करताना टिपले ते आज इथे देत आहे... तुम्हाला ते आवडली अशी अपेक्षा करतो. :)
सकाळी उठल्यावर रेल्वेच्या डब्यातुन फोटो काढण्यास सुरुवात केली, अर्थात पहिला फोटो रेल्वेच्या बोगीचा काढुन मग मी इतर फोटो काढण्यास सुरुवात केली...
अनेक वेगवेगळे लोक,वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या स्थानकांवर उतरणारे आणि चढणारे...कधी सहकुटुंब प्रवास करणारे,तर कधी एखादा एकटाच प्रवास करणारा व्यक्ती... मधेच येणारे विक्रेते,भेळवाले,भीक मागणारे तर चेकींगसाठी अचानक चक्कर टाकुन जाणारे रेल्वे सुरक्षा दल. प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव देणारा असतो...या प्रवासात भेटणारे,गप्पा मारणारे,भांडणारे परत या प्रवासात एकमेकांना भेटणार सुद्धा नाहीत... तरी सुद्धा काही काळ प्रत्येक जण या प्रवासाच्या अनुभवातुन एकत्रपणे जात असतो...
मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुंनी दिसणार्या अनेक गोष्टी पहायला फार आवडतात... शेत, रस्ते, नद्या, पूल आणि बरंच काही.
वेगवेगळ्या पद्धतीने नांगरलेली, नुकतीच कापणी झालेली, हिरवीगार, मधेच एखादे झाड असणारी, भाजणी झालेली, एखादा मळा असलेली असे अनेक प्रकार या पळत्या प्रवास पहायला मिळतात.
एकदा आमच्या बरोबर वाडीला बाबांचे शर्मा नावाचे त्यांचे डॉ.मित्र आले होते... माझ्या बरोबर दरवाज उभे राहुन समोरुन वेगात जाणारी हिरवळ आणि उसाची शेतं पाहुन त्यांनी ओ गॉड ब्युटिफुल ही एक इंग्रजी कविता म्हंटली होती... ती कविता अश्या प्रवासात शेतं आणि हिरवळ पाहिली की मला आठवुन जाते.
या दॄष्यांमधे गाडीच्या वेगा प्रमाणेच सातत्याने बदल होत असतो... कधी ओढे कधी नाले कधी घरे तर कधी अगदी वीट भट्ट्या सुद्धा दॄष्टी पथास पडतात...
या गोष्टीं बरोबरच नजरेस पडतात ते म्हणजे वेगवेगळे टॉवर... कधी विजेचे तर कधी कुठलेसे मोबाइल टॉवर... ते या रेल्वेतुन जितक्या वेगाने मागे पळताना दिसतात तितकेच ते मनाला भावतात देखील.
रेल्वे ट्रॅकच्या बाजुने अनेकदा छोटी वाहतुक, पायवाटा आणि त्यातुन प्रवास करणारी माणसे,गुरे आणि वाहने सगळच कसं गमतीदार वाटतं... सकाळी सकाळी अशीच कामावर निघालेली ही मंडळी तर पहा...
रेल्वेचे पुढ्चे इंजीन आणि रेल्वेचा शेवटचा डबा एखादा वळवणावर आपल्या नजरेस पडतो...
मधेच एखादा लाईनमन त्यांचे काम इमानेइतबारे करताना नजरेस पडतो... एक वाहतुक व्यवस्था आणि त्याच्यावर निर्भर असणारे लाखो करोडो लोक !
रेल्वे क्रॉसिंग... इंजिन हे क्रॉसिंग जवळ येण्या आधीच विशिष्ठ प्रकारे हॉर्न वाजवुन गाडी येत असल्याची वर्दी देतात... अश्याच एका रेल्वे क्रॉसिंगला धूळ उडवत जाणारी आमची एक्सप्रेस...
आता वेगवेगळी स्टेशन्स मार्गात येतात त्यांचा माहोल पाहुया.... धुक्यात वाट काढत स्टेशनवर पोहचताना अगदी असेच दिसते... रेल्वेची वाट पाहणारी प्रवांशांपासुन हमाला पर्यंत सर्व मंडळी लगेच लगबगीला लागतात, स्टेशनवर गाडीच्या घोषणा सुरु होतात...
काही फलाटांवर अगदी सन्नाटा असतो तर काही फलाटांच्या दुसर्या बाजुला मालवाहतुकीचा फलाट असतो... कधी एखादी मालगाडी तिथे थांबलेली दिसते तर कधी पाठीवर सिमेंट किंवा धान्याची पोती लादुन नेणारे मजूर दिसतात.
स्टेशन आले... स्टेशन आले...
गाडी थांबली... मग लक्षात आले की दुसर्या बाजुनी अजुन एक गाडी येत आहे...मग पटकन दुसर्या दरवाजात गेलो.
आख्खे इंजिन एकाच फ्रेम मधे घेण्याचा हा एक प्रयत्न... पॉइंट अँड शूट कॅमेरा मधे झूम-इन आणि आउट करताना एक प्रॉब्लेम होतो...तो म्हणजे आपल्याला हवे तितके झूम हव्या त्या क्षणी करणे कठीण असते...कारण ही मूव्हमेंट कॅमेरा ठरवत असतो...पण या क्षणी हे करणे बर्यापैकी जमले मला.
स्टेशनवरुन २ गाड्या बाहेर पडताना दिसत आहेत... या गाड्या एकमेकांना एकाच दिशेने समानांतर धावतील असे मला वाटले नव्हते, पण एक आगळा वेगळा नजारा मात्र यामुळे मला टिपता आला.
इतका वेळ ट्रेन मधुन काढलेले फोटो पाहिलेत... आता रेल्वे ट्रॅकवरुन काढलेले फोटो पाहुया...
रेल्वे क्रॉसिंगवरुन रेल्वे मार्ग कसा दिसतो बरे ?
रेल्वेच्या रुळावर कॅमेरा ठेवला आणि झोपुन हा व्हूव्ह पाहिला...
मग गुढग्यांवर बसुन उजवीकडे सरळ समोर दिसणारा मार्ग टिपला... आता गाडी येणार याचा मला अंदाज आला.
आता डाविकडे वळलो आणि दोन्ही ट्रॅकच्या मधे उभे राहुन एक व्हूव्ह घेतला...
मग परत उजवीकडे वळलो, वरती गाडीचा अंदाज आला होता आता ती दॄष्टीक्षेत्रात आली.
ही मालगाडी होती... जशी वेगाने आली तशीच ती निघुन सुद्धा गेली...
कॅमेरा :- निकॉन पी-१००
* फोटो प्रोसेस करुन कंप्रेस केले आहेत, कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.
{ हौशी प्रवासी फोटूग्राफर } ;)

मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त रे बाणा.
किती छान फोटो,लाइनमनचा
ह्म्म
मस्त प्रकाशचित्रे !!!
हे सारे फोटो धावत्या गाडीतून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुलुप लावून सोडा... ;) { टपाल }Anti-shake किंवा Super
मस्त फोटो
मस्त!
मस्त
रेल्वे सफरीचे मस्त चित्रिकरण
मस्त लिहिलय
सविस्तर पोच नंतर.
कोल्हापूरला महालक्ष्मी
मस्त मस्त मस्त!!!
सर्वसाधारणपणे रेल्वे बद्दल
इंजिनातून
चालत्या आगगाडीतून बाहेर वाकू
+१
कूऽऽऽऊऽऽऽऊ!!
फोटो आवडले!!
चालत्या गाडीतून--
आवडले
मस्त!
फोटू आवडले व जुन्या आठवणी
रेलवे चा प्रवास खरेच मस्त
@ सर्व प्रतिसादकांना मनापासुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)सुरेख
मस्त
छान आहेत फोटो…. आणि 'स्टेशन
फारच छान फोटो अन वर्णनही
सुंदर
@हर्शरन्ग ,दफोराव , अनिरुद्ध
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.मस्त फोटू....
मस्त ..
सुंदर फोटो, सुंदर रेल्वे
@ कुमार१ / चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumatiहे वाचायचे राहिले होते,
@अनिंद्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Mera Pyar Amar... :- Asli Naqliविजेच्या तारेखाली डिझेलचा गतीकोष (इंजिन)?
पुन्हा पुन्हा पाहिलं तरी
@ गापै
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Moh Moh Ke Dhaage... :- Dum Laga Ke Haishaपटेश!