Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !

छ
छोटा डॉन यांनी
Fri, 10/10/2008 - 16:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18272 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

अ
अभिरत भिरभि-या Fri, 10/10/2008 - 16:39 नवीन
शीर्षक वाचुन असे वाटले की म्हैसुरच्या दसर्‍याचा वृतांत आला की काय? असो लेख चांगला आहे .. कारण मते पटो न पटोत, या माणसाच करिष्मा वादातीत आहे. शीर्षकाच्या नावासाठी आमची दोन पैसे सुचोवणी .. तुमच्याच लेखात लिहिले आहे तसे .. शेर जरी बुढा झाला पण ...
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 10/10/2008 - 18:28 नवीन
कारण मते पटो न पटोत, या माणसाच करिष्मा वादातीत आहे. असेच म्हणतो ,,, शिर्षक : ढाण्या वाघ -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
य
यशोधरा Fri, 10/10/2008 - 18:09 नवीन
यू टूबवर असले तर पहायला हवे..
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 10/10/2008 - 18:11 नवीन
" यु ट्युब" वर काय पहावे लागेल ? मला नाही समजले अजिबात .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 10/10/2008 - 18:29 नवीन
ठाकरेंचे भाषण आहे का बघण्यासाठी उपलब्ध ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/10/2008 - 18:28 नवीन
भारी लिहिलंय डानराव. मी कधी गेलो नाहिये. आणि काल रात्री कुठल्यातरी वाहिनीवर क्षणचित्रं दाखवत होते. बाळासाहेब शेर खरेच पण त्यांची प्रकृति खूपच खराब वाटली. खोकत वगैरे होते. अवांतरः बाळासाहेब, राज, उध्दव... सगळे एकत्र आले पाहिजेत रे... वेगळे वेगळे राहून नुकसानच आहे. Image removed. Image removed. बिपिन.
  • Log in or register to post comments
र
रम्या Fri, 10/10/2008 - 18:25 नवीन
आम्हीही बाळासाहेबांचे चाहाते! वाघच तो! शब्दांवर जबरदस्त पकड! शिवाजी पार्क भरून गर्दी खेचू शकणार्‍या काही व्यक्तिमत्वांपैकी एक. पण मला एक प्रश्न पडलाय. ही प्रचंड गर्दी शिवसेना या पक्षासाठी आहे, बाळासाहेबांसाठी आहे की उद्धव ठाकरेंसाठी? बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो. पण बाळासाहेबांच्या पश्चात खरोखरच शिवाजी पार्क पुन्हा भरेल? (बाळासाहेबांचा चाहता) रम्या
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 10/10/2008 - 18:34 नवीन
आम्हीही बाळासाहेबांचे चाहाते! वाघच तो! शब्दांवर जबरदस्त पकड! शिवाजी पार्क भरून गर्दी खेचू शकणार्‍या काही व्यक्तिमत्वांपैकी एक.
+१, सहमत आहे ... कालची गर्दी ही "बाळासाहेबांसाठी" होती नक्कीच, ते आल्यावर जमावाचा जो जयघोष झाला त्यावरुन खात्री पटते ... काल सबकुछ बाळासाहेब होते .... >> पण बाळासाहेबांच्या पश्चात खरोखरच शिवाजी पार्क पुन्हा भरेल? का नाही, जरुर भरेल ... अशी धमक असलेले लोक आहेत अजुन. शिवाय मराठी माणसाच्या कल्याणासाठी हाक देणार्‍या कुणाच्याही मागे शिवाजी पार्क भरेल एवढी जनता नक्की धाऊन येईल ... मग तो ठाकरे आडनावाचा असो अगर नसो .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 10/10/2008 - 19:28 नवीन
छोटा डॉन! तुमच्या शब्दात केलेले या अद्वितीय सोहळ्याचे वर्णन मस्तच जमुन आले आहे. कालची माझी देखिल अवस्था अशीच होती. नशिबाने काल इथे हवामान उत्तम असल्याकारणाने झी २४ तास चे प्रक्षेपण कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न येता सुरु होते.लाख लाख दुवा दिला मी काल झी २४ तास या वृत्तवाहीनीला. आज वडिलांची उणिव प्रकर्षाने जाणवली कारण २००४ पर्यंत या सोहळ्याचा वृत्तांत त्यांच्या मुखातुन ऐकायची सवय जडलेली.त्यांनी केलेल वर्णन म्हणजे "याची देहि याची डोळा" आपण तो सोहळा अनुभवलाय असेच असायचे आज तुमचे लिखाण वाचुन त्यांची खुप आठवण आली .मी स्वतह ९३ साला पर्यंत वडिलांबरोबर या सोहळ्याला हजेरी लावत असे. सेनेच्या दसर्‍या मेळाव्याच दिमाखच न्यारा . कालचे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण उत्तमच झाले. मुंबई आमच्याच बापाची हे ठणकावुन सांगणारा उध्दव आवडुन गेला ............................पण सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती माननिय बाळासाहेबांना बघायची,त्यांचे विचार ऐकायची.उत्कंठा वाढत होती आणि माननिय बाळासाहेबांचे व्यासपीठावर आगमन झाले .पण त्यांना बघुन काळजात चर्र झाले. नकळत हात जोडुन बाळासाहेबांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे म्हणुन देवाची प्रार्थना केली. त्यांच्या" इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो .... " या चिरपरिचीत संबोधनाने अंगावर काटा उभा राहीला .सौम्य शब्दात राजला दिलेली समज ऐकल्यावर अजुनही कुठे तरी आत राज बद्दल प्रेमाचा ओलावा आहे हे दिसुन आले.आवाज खोलवर गेला असला तरी आवाजातील जरब जरा देखिल कमी झालेय असे वाटले नाही. भाषण करताना त्यांना त्रास होत होता ,मधेच खोकल्याची उबळ आली तेंव्हा खरच खुप वाईट वाटले.मनात आल त्यांना शिवतिर्थावर आणण्याच अट्टाहास करायला नको होता उध्दवने .त्याही परिस्थितीत ते जवळपास ३५ मिनिटे बोलले.मधे काही मुद्यांचे त्यांना विस्मरण होत होते आणि उद्धव व पंत त्यांना आठवण करुन देत होते.ते पाहुन पोटात गलबलले.एक क्षण मनात आले वय शेवटि माणसाला परावलंबी बनवते हेच खरं! सोहळा संपन्न झाल्यावर घरी परतणारा प्रत्येक श्रोता ,शिवसैनिक हा स्वतह बरोबर विचारांचे सोने घेवुन गेलाच पण त्याच बरोबर बाळासाहेबांच्या तब्येतीची काळजी देखिल घेवुन गेला असेल्..............सोहळ्याला उपस्थित तमाम अबाल वृध्दांनी दसर्‍याच्या सुमुहुर्तावर आई भवानी कडे माननिय बाळासाहेबांसाठी उदंड आयुष्याची कामना केली असेल....................आई भवानी त्यांची इच्छा पुर्ण करो.................! मधेच मनात आल न जाणो त्या गर्दित राज वेषांतर करुन आला असेल आणि आपल्या गुरुंचे विचार ऐकत असेल आणि समजा तसे नसेल तरी निदान घरी तो देखिल दुरचित्रवाहीनी समोरच आपल्या लाडक्या काकांचे दर्शन घेण्यासाठी बसला असेल. कालचा सोहळा पाहुन मन तृप्त झाले हे खरेच ,पण तरिही मी मनोमन देवाला राज व उध्दव यांचे पुन्हा एकदा मनोमिलन व्हावे यासाठी साकडे घातले.आज ना उद्या तो दिवस उगवेल याची खात्री आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र! राज व उध्दव यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी परत एक व्हावे या प्रतिक्षेत असलेली.व जन्माने शिवसैनिक असलेली. "अनामिका"
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 10/10/2008 - 19:00 नवीन
हिंदुहृदयसम्राटांची जादु ही सगळी !! सपोज त्यांनी डिक्लेअर केले असते की यावेळेस बोलणार नाय .. तरी एवढीच गर्दी जमली असती !! जय भवानी .. जय शिवाजी !!
  • Log in or register to post comments
म
मोकाट वळू Fri, 10/10/2008 - 22:55 नवीन
वाघ म्हातारा झाला म्हनून गवत खात नाहि....!!! खरच बाळासाहेबान्च वय झालय्....पण बोलन्यात तीच धमक नि उत्साह... साहेबाना उदन्ड आयुश्य लाभो..... .....एक मराठी
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 10/10/2008 - 23:10 नवीन
बाळासाहेबांना पाहुन जुन्या आठवणी डोके वर काढतात. सत्तर च्या सुमाराचे बाळ ठाकरे हे वेगळेच. प्रामाणिकपणे सांगायचे तर जेव्हा जेव्हा मी राज ठाकरेंचे भाषण ऐकतो/ पाहतो तेव्हा डोळ्यापुढे सत्तरच्या दशकातले बाळासाहेब आठवतात. तेव्हा अनेक शत्रू जीवावर ऊठलेले असताना बाळासाहेबांना झेड सुरक्षा म्हणजे काय हे माहित नव्हते, त्यांच्या भोवतीचे सैनिकांचे कडे अक्षरशः अभेद्य होते. ते खरोखरीचे मंतरलेले दिवस होते. बाळासहेबांचे सहकारी एकापेक्षा एक भारी - 'भटक्या' प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, मुंबईचे सर्वात लहान महापौर झालेले सुधीरभाउ, दत्ताची साळवी, दताजी नलावडे.... इडलीला टक्कर देण्यासाठी मराठी माणसाला वडापावचे आव्हान उभे करीत स्वतःला रोजगार निर्माण करण्याचे आव्हान देणारे बाळासाहेब आणि कबुतरखाना, रानडे मार्ग, डिसिल्वा शाळा, पोपटलाल चाळ, खांडके इमारती येथे त्या हाकेला ओ देत भगव्या टोप्या घालुन वडापावच्या गाड्या झटक्यात लावणारे सैनिक. पैकी ४-५ वर्षांपूर्वी कबुतरखान्याच्या व्यायामशाळेच्या गल्लीच्या तोंडावर असलेल्या गाडीवर वडापाव खाताना मित्राला ती हकिकत संगताना ऐकुन भारावलेले काका अजुन आठवतात. गाडी पस्तीस वर्षे लावतोय असे अभिमानाने सांगत होते. एरवी सेनेला गुंड म्हणाणारे देखिल कबुल करतात की हिंदु मुसलमान दंग्यात मुंबईकराला आधार होता तो सेनेचा! दरवर्षी हिंदुंची कुरापत काढणार्‍या धर्मांध व उन्मत्त अशा भिवंडीच्या मुसलमानांना सेनेने एकदाच असा हाग्या मार दिला की पुन्हा दंगलीचे नाव नाही. मला रजत कपूरने घेतलेल्या मुलाखतीतील बाळासाहेबांचे मार्मिक उदगार नेहेमी आठवतात. अहिंसा आणि हिंसा असा काहीसा घोळ घालणार्‍या रजत कपूरला त्यांनी ठणकावुन सांगितले होते " शिवाजी राजे जेव्हा अफझलखानाला भेटाला गेले तेव्हा हत्यारबंद होऊन गेले होते. जर ते पंचा नेसून आणि हातात शेळी घेऊन गेले असते तर त्यांचा अफझलखान झाला असता"
  • Log in or register to post comments
न
नंदा प्रधान Sat, 10/11/2008 - 06:58 नवीन
सही बोललात सक्षी. कुणाला तरी कमी लेखल्या खेरीज कुनाचे मोठेपण कधी सिद्ध झाले आहे का? (शेळी खाणारा अहिंसावादी) नंदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सुक्या Sat, 10/11/2008 - 01:53 नवीन
च्यायला अजुन एक पोरगं खड्ड्यात पडलं का? झालं आता हे लोक हीच बातमी दाखवणार, मरु दे तिच्यायला, दुसरीकडे पाहु ... काटे आले अंगावर. माणसाने इतकेही संवेदनाहीन असु नये. उत्साहाच्या भरात तुम्ही ते लिहीलं हे मान्य आहे, पण तेवढं लेखातुन काढुन टाका. बाकी सोहळ्याचे वर्णन सुरेख आहे. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/11/2008 - 06:42 नवीन
८० च्या उत्तर दशकापासून यांची अनेक भाषणे ऐकली दसरा मेळाव्यातली. लै मजा यायची.. आज मुंबईत मराठी माणसाचा जो काही दरारा शिल्लक आहे तो केवळ यांच्यामुळेच आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.. साक्षि म्हणतो ते बरोबर आहे. आज लोकं राजमध्येच तरूणपणीचे बाळासाहेब पाहतात. उद्धवला घरातच राजकारण असल्यामुळे त्यात आपसूक पडावं लागलं, परंतु बाळासाहेबांच्या त्यात स्पार्क नाही. बाळासाहेबांचं पुत्रप्रेम आडवं आलं नसतं तर आज राजकडेच सेनेची सर्व सूत्र असती..बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यानेच ती उत्तम रितीने सांभाळली असती..! उद्धवकडे स्वत:चा असा काहीच करिष्मा नाही. केवळ वडिलांच्या नाव असल्यामुळे लोक त्याला मानतात.. असो... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदा प्रधान Sat, 10/11/2008 - 06:56 नवीन
असहमत डान्याच्या लेखातील ह्या ओळी पुन्हा वाचाव्यात. तुम्ही दसर्‍याचे भाषण ऐकले तरी आहेत का? व्वा, भारी बोलत आहे की उद्धव, ह्याला लोक " संयमी व्यक्ती" म्हणुन बदनाम का करतात ? शोभतो खरा हा "सिंहाचा छावा" , चढ बाप्पु, जबरदस्त ... -नंदा वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा..शिवसेना!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अभिरत भिरभि-या Mon, 10/13/2008 - 12:40 नवीन
सिंहाचा छावा/संयमी व्यक्ती वगैरे वगैरे ... ज्यांनी जन्मभर गांधी घराण्याच्या घराणेशाहीला विरोध केला त्यांना शेवटी घराणेशाहीच्या आश्रयाला का जावे लागले हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदा प्रधान
श
शुभा Sat, 10/11/2008 - 12:45 नवीन
बालासाहेबानी कोनाकोनाला वन्दन केले कै. प्रमोद नवलकरान्चा फोतो तिथे असायला हवा होता
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 10/11/2008 - 13:03 नवीन
च्यायला या मिपा वर पण राजकारण आले खुप वाईट झाले राव मरुदे ते राजकारण यार मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 10/12/2008 - 12:13 नवीन
>>राजकारण म्हणजे गजकर्ण सहमत (०%) मिपा राजकारणानिवाय जगुच शकत नाही. ----- आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
छ
छोटा डॉन Sun, 10/12/2008 - 12:35 नवीन
राजकारण म्हणजे गजकर्ण
स्पष्ट असहमत. राजकारण जरी एक "गलिच्छ गटार" असले तरी ते साफ करायला आपल्याला किंवा कोणा शहाण्याला त्यात उतरायलाच पाहिजे .... नुसते ते "गजकर्ण" म्हणुन शिव्या देऊन प्रश्न सुटत नाहीत .... जर असे वातते की हे खराब आहे तर तुम्ही जावा ना मदतान करायला, निवडणुक लढवायला. कोण नको म्हटले आहे ? बाजु आण मते दमदार असतील तर लोक नक्की पाठीशी उभे राहतील, तशीही आता "सुशिक्षीतांनी राजकारणात" पडुन देश चालवायचे कार्य हातात घ्यायची वेळ आलीच आहे ... असो. जास्तच अवांतर विषयांतर होत आहे ... बरं, मिपावर राजकारण हा विषय व्यर्ज्य आहे का ? उलट मी मिपा हे एक उत्कॄष्ट व्यासपीठ मानतो अशा चर्चांसाठी .... मग असा प्रतिसाद का ? आपल्याला जर अजिबातच इच्छा नसेल तर सोडुन द्या ना, उगाच असे प्रतिसाद देऊन विषयांतर घडवु नका .... अवांतर : मी लेखातच लिहले आहे की हा लेख कसलेही राजकारण, नेते व पक्ष यांचा "उदोउदो" करत नाही. हा फक्त माझ्या शब्दात मी पाहिलेला एक सोहळा आहे. मग अशा परिस्थीती असे प्रतिसाद टाकणे कितपत योग्य ? जर अजिबात आवडाले नसेल तर चक्क दुर्लक्ष करा ना ... यामुळे बाकीच्यांचा मुडऑफ होतो व अनावश्यक फाटे फुटतात त्याचे काय ? कॄपया माझे म्हणणे पॉसीटीव्हली घेणे. धन्यवाद ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/12/2008 - 13:14 नवीन
डानरावांच्या सगळ्या मुद्यांशी १००% सहमत. एवढा डिस्क्लेमर टाकला होताच त्याने. आणि बर्‍याच लोकांनी पण लिहिले होते की बाळासाहेबांविषयी काहिही मत असले तरी लेखातील भावनांशी सहमत म्हणून. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ग
गणा मास्तर Sat, 10/11/2008 - 21:41 नवीन
बाप माणसावर बाप लेख लिहिलास रे !!! शिर्षक आहे तेच जबरदस्त वर्तमानपत्रातले खास स्फुट वाचल्यासारखे वाटले. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 10/11/2008 - 22:29 नवीन
कारण मते पटो न पटोत, या माणसाचा करिष्मा वादातीत आहे. असेच म्हणते. डॉन्या, लेख छान लिहिला आहेस.यशो म्हणते तसे यु ट्यूबवर भाषण मिळते का पहायला हवे. स्वाती
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 10/12/2008 - 22:52 नवीन
अजूनही बाळासाहेबांची बुध्दी तल्लख आहे याचा प्रत्यय आलाच या वर्षी 'गात्रे थकली पण आत्मा नाही थकला'. आवाज कोणाचा? 'शिवसेनेचा' :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 10/14/2008 - 11:59 नवीन
http://www.saamana.com/2008/Oct/14/Link/Main4.htm वरिल लिंकवर तुम्ही पाहू शकता की सामनाने सुद्धा ह्या लेखाची दखल घेतली आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 10/14/2008 - 12:44 नवीन
सामनाने मिपाचे "जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्‍या अन मराठीचे जागतिक स्पंदन मानल्या जाणार्‍या" असे दिलखुलास कौतुक केले आहे. अभिनंदन तात्या :) मिसळपावचा विजय असो .. छोट्या डॉनचा विजय असो .. तात्या अभ्यंकरांचा विजय असो .. हे धतड ततड ..धतड ततड ..धतड ततड ..धतड ततड !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
मनस्वी Tue, 10/14/2008 - 12:52 नवीन

Image removed. Image removed.
मनस्वी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ध
धमाल मुलगा Tue, 10/14/2008 - 12:59 नवीन
जोरदार अभिनंदन!!!! अरे, गेल्या आठवड्यात "आझा ब्लॉग" मध्ये चमकलेले मिपाचे सदस्य, आता सामनाने घेतलेली ही दखल :) ह्या परिवाराचा सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे !!!! सामनाने मिपाचे "जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्‍या अन मराठीचे जागतिक स्पंदन मानल्या जाणार्‍या" असे दिलखुलास कौतुक केले आहे. टाळ्या टाळ्या टाळ्या !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
झ
झकासराव Tue, 10/14/2008 - 13:37 नवीन
डॉन्याचा विजय असो. मिसळपावचा विजय असो. सामनाचा विजय असो. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
झ
झकासराव Tue, 10/14/2008 - 13:38 नवीन
डॉन्याचा विजय असो. मिसळपावचा विजय असो. सामनाचा विजय असो. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/14/2008 - 14:30 नवीन
"जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्‍या अन मराठीचे जागतिक स्पंदन मानल्या जाणार्‍या" असे दिलखुलास मिसळपावचे कौतुक केले आहे. सामनातील सदरील बातमी वाचून खूपच आनंद झाला. मिपाचे आणि तात्या अभ्यंकराचे मनःपुर्वक अभिनंदन !!! -दिलीप बिरुटे (आनंदीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ध
धमाल मुलगा Tue, 10/14/2008 - 12:00 नवीन
क्या बात है डान्या! साला, सगळ्या सगळ्या भावना पोहोचल्या रे!!! वाचतानाच अंगावर काटा आला, तर पाहताना काय अवस्था झाली असेल? तुझा हा लेख म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्या प्रेरणास्थानाला विजयादशमीच्या प्रथेप्रमाणे वाहिलेलं सोनंच जणू! आम्हीही तुझ्यासोबत 'मम्' म्हणु इच्छितो! अर्थात हा लेख त्या एका 'बाळ ठाकरे' पासुन 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' झालेल्या एका तुफानी झंझावाताला भावनापुर्णतेने वाहिलेला असल्याने इथे त्यांचं, उध्दव ठाकरेंचं किंवा राज ठाकरेंचं काय चुकतं किंवा काय बरोबर ह्याची चर्चा मी करत नाही, ते इथे अप्रस्तुत ठरेल. पण एकच म्हणु इच्छितो, बाळासाहेबांनी रांगड्या मरहट्ट्यांना गोळा करुन त्यांना समजेल अशा रांगड्या भाषेत आपले विचार मांडले..नेहमीच! उध्दव आता त्याच सेनेला रांगडेपणाबरोबर एक कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी देऊ पाहताहेत. काळच ठरवेल हे योग्य की अयोग्य ते.
आयला, अंगावर काटा आला हे पाहुन, शेर जरी म्हातारा झाला तरी अजुन आपली चाल नाही विसरला, अजुन तोच कणखरपणा .... जिओ बाळासाहेब, जिओ ....
अगदी अगदी!! १०००००००% सहमत! पण साला गलबलुन आलं यार, बाळासाहेबांची वृध्दत्वानं केलेली ही क्रुर चेष्टा पाहुन :( अक्षरशः डोळ्यात पाणी उभं राहिलं रे! असो, इथं एक दुर्मिळ (कारण, ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी "काय दुर्मिळ फोटो आहे" असं मला ऐकवलं म्हणुन मीही त्याला दुर्मिळ फोटो म्हणतोय.) असा फोटो द्यायचा मोह आवरत नाहीय्ये, म्हणुन डान्या खास तुझ्यासाठी आणि तमाम ठाकरेप्रेमींसाठी हा फोटो! Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/14/2008 - 16:01 नवीन
सामना वृत्तसंस्थेने मिपावरील चर्चेची दखल घेतली याबद्दल मिसळपाव डॉट कॉम सामना वृत्तसंस्थेची आभारी आहे.. मिपाच्या सर्व सभासदांमुळेच केवळ मिपाला शोभा आहे याचीही मिपाला कृतज्ञ जाणीव आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Wed, 10/15/2008 - 00:20 नवीन
शिवसेनाप्रमुख जबरदस्त आहेत. मी पण स्टार माझाच्या वेबसाईटवरुन भाषण ऐकल्.त्यांना खोकला आल्यावर फारच वाईट वाटल्.पण तरीही भाषण जबरदस्तच होत.वाघ म्हातारा झाला तरी डरकाळी देण विसरत नाही आणि त्याच्या डरकाळीमधे तीच शक्ती असते. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा