.."आयला रामानं त्या पांगळ्या मानसाला मदद केल्यामुळे ..त्याच्य आशिर्वादाने हा पास झाला बघ."
खरच आजच्या जगात अशी मदत कोणीही करत नाही कोणाला कोणाकडे पाहयला वेळ नाही तर मदत कोठुन करणार
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
धाडसच म्हणायला हवं. दहावीची परिक्षा भल्याभल्यांची घाबरगुंडी उडवते. इतर करतात त्यापेक्षा आपण केलेला वेगळा विचार आवडला.
ह्यावरून एक गोष्टं आठवते. माझ्या मैत्रिणीचे वडील दहावीच्या परिक्षेला तीला शाळेत सोडायला स्कूटरवरून निघाले. त्यांना हिच्या परिक्षेचं इतकं टेंशन होतं कि मुलीला बरोबर न घेताच निघाले. मैत्रिण आपली ओरडत मागून पळत होती. शेवटी तिने रिक्षा केली व वडीलांना पुढच्या चौकात गाठले.
रेवती
.."आयला रामानं त्या पांगळ्या माणसाला मदद केल्यामुळे ..त्याच्या आशिर्वादाने हा पास झाला बघ."..आणि मला तो सगळा प्रसंग पुन्हा आठवला..
ती गोष्ट मी आजपर्यंत विसरलेलो नाही..
वा! सुंदर..!
मिपामुळे मला खुप चांगले लेख वाचायला मिळतात..
मी मि.पा. चा मनापासुन आभारी आहे..
आपण मिपाचे आहात अन् मिपाही आपलेच आहे! :)
तात्या.
प्रिय मित्रांनो..
तुम्हा सर्वांच्या छान प्रतिक्रिया वाचुन मला खुप बरे वाटले..
तुम्ही पण तुमचा अनुभव सांगावा..आम्हा मिपाकरांना त्यातुन खुप काही शिकायला मिळेल..
धन्यवाद.
राम दादा..
मस्त अनुभव...
असाच एक माझाही अनुभव आहे..
ठाणे ते दादर असा माझा रोजचा प्रवास सुरु होता..एक संगणकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी मी रोज दादरला येत असे..
एक दिवस क्लास संपल्यानंतर मी घरी जाण्यास निघालो...मी आपल्याच धुंदीत चालत होत्..दादर स्टेशनकडे जाण्यासाठी निघालो..रस्त्यावर तशी बरीच गर्दी होती ...मी माझ्या घड्याळात वेळ पाहिली..काही वेळानेच असलेली जलद लोकल मला पकडायची होती !!..गर्दीतुन वाट काढत काढत जात असताना अचानक कोणीतरी माझा हात घट्ट धरला..अशाप्रकारे कोणीतरी माझा हात घट्ट पकडल्याने मी जरा भांबावलो..माझा हात पकडणार्या त्या व्यक्तीकडे मी पाहिले.. ती व्यक्ती अंध होती..व त्या व्यक्तीच्या दुसर्या हातात अंधांकडे असणारी फोल्डेबल काठी होती..
मी त्या अंध व्यक्तीला विचारले काय झालं तुम्हाला ? काही मदत हवी आहे का ?तो मला म्हणाला की प्लीज मला कोलो फोटो स्टुडिओ मधे घेऊन चला...मी त्याला विचारले की तुम्हाला पत्ता माहित आहे का? तो मला म्हणाला इथचं आस पास कुठे तरी तो स्टुडिओ आहे..मी मनात विचार केला की एका अंध व्यक्तीला फोटो स्टुडिओ मधे काय काम असेल्?जाऊंदे ..काही तरी असेल त्याच काम !!असा विचार करुन मी त्याचा हात धरुन रस्ता ओलांडला..पण मला तो स्टुडिओ काही केल्या सापडेना..शेवटी समोर असलेल्या एका दुकानदारालाच आपण हा स्टुडिओ कुठं आहे असे विचारायच ठरवल्..त्या अंध व्यक्तीचा हात धरुन मी त्या दुकानदाराकडे गेलो..तो दुकानदार मला म्हणाला की मी विरुध्द्द दिशेला आलो आहे..त्याने मला तो स्टुडिओ कुठ आहे ते सांगितल्..आता त्या अंध व्यक्तीचा हात धरुन मी स्टुडिओ च्या दिशेने चालायला सुरुवात केली.. माझ्या मनात परत तोच विचार आला की ज्या व्यक्तीला प्रकाश म्हणजे काय हेच ठाऊक नसत..त्या व्यक्तीला फोटो स्टुडिओ मधे काय काम असेल ?शेवटी हा प्रश्न मी त्याला विचारालाच की तुम्हाला फोटो स्टुडिओ मधे कशासाठी जायचे आहे ? त्यावर तो म्हणाला की काही दिवसा पुर्वी तो दादरच्या पादचारी पुलावरुन जात असताना त्या गर्दी मधे कोणी तरी त्याच्या हातातील छोटी ब्याग मारली होती...त्यात त्याची काही कागदपत्र आणि एक आयडी कार्ड होते..त्या आयडी कार्ड वर त्याचा फोटो होता...व आता नवीन आयडी कार्ड साठी त्याला नविन फोटो काढायचा होता..
मला हे ऐकुन फार वाईट वाटल्..ज्या लोकांना आजन्म अंधारातच चाचपडंतच जगाव लागत आणि काठी हाच ज्यांचा आधार असतो अशा त्या व्यक्तीला हा खडतर अनुभव आला होता..मनातल्या मनात मी त्याची ब्याग मारणार्या माणसाला शिव्यां घातल्या..
शेवटी तो फोटो स्टुडिओ मला सापडला...तिथे मी त्याला सोडले व विचारले की अजुन कुठे तुम्हाला जायचे असल्यास मी तिथे तुम्हाला सोडावयास तयार आहे..तो म्हणाला नाही अजुन कुठेही मला जायचे नाही पण इथं आणुन सोडल्या बद्दल धन्यवाद!!!
खरचं सागतो त्या दिवशी मला त्या व्यक्तीला मदत करुन जो आनंद मिळाला त्याला तोड नाही !!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
प्रतिक्रिया