थोडं कळलं, थोडं नाही.....
तुम्हाला वेळ मिळाला तर याबद्दल सविस्तर लिहावे. अजुन जाणून घ्यायला आवडेल.
- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)
संकल्पनेबद्दल थोडक्यात पण माझ्या सारख्या (अज्ञानी ) वाचकांना कळेल अशा शब्दात दिलेल्या माहिती बद्दल आभार
तुम्हाला वेळ मिळाला तर याबद्दल सविस्तर लिहावे. अजुन जाणून घ्यायला आवडेल. हेच म्हणते ..
काही लोकांनी तत्काल मला सविस्तर लिहायला सांगितलं आहे. मी काही या (खरंतर कोणत्याच) विषयातली तज्ञ नाही. पण वर लिहिल्याप्रमाणे "घाई" असल्यामुळे आत्ता झटपट लेख पाडला. संध्याकाळी (किंवा वाचलो आपण सगळे) तर एक-दोन दिवसात ते लार्ज हॅड्रॉन कोलायडर आणि बिग-बँगवर थोडं जास्त लिहेन. सध्या माझे बिग-बँगबद्दलचे थोडे विचार:
http://www.misalpav.com/node/3366#comment-47823
संध्याकाळी (किंवा वाचलो आपण सगळे) तर एक-दोन दिवसात ते लार्ज हॅड्रॉन कोलायडर आणि बिग-बँगवर थोडं जास्त लिहेन
आपण वाचणारच आहेत हो...
तेव्हा तुम्हाला लेख लिहावाच लागेल. तयारीला लागा.
बाकी वरच्या लेखाबद्दल धन्यवाद.
बिगबैंग बद्दल तिथेच बोलु. काय?
बरचस डोक्यावरून गेल !!!
पण सारांश पॄथ्वी ला व पृथ्वी तलावरील प्राण्यांना काहीही धोका नाही , हे वाचुन आनंद झाला...
( अगदी गगनात मावेनासा झाला )
वेळ मिळालाच तर अधीक सोप्या भाषेत आणी विस्तॄत लिखाण करावे ...
म्हणजे माझ्या सारख्याना समजेन .....
(पॄथ्वीतलावरील निरूपद्रवी प्राणी )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
अदिती
थोडं कळल्,बरच नाही कळालं
जे कळालं त्या बद्दल ते कळवल्या बद्दल धन्यवाद!!
जे नाही कळालं त्याची माहीती तुझ्याच कडुन घेइन :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)Tue, 09/09/2008 - 10:03नवीन
हा प्रयोग तुम्ही थेट प्रेक्षपणाद्वारे येथे पाहू शकता - http://webcast.cern.ch/
ह्या प्रयोगासाठी भारताने देखील आर्थिक मदत केली आहे तसेच टाटा संशोधन संस्था, भाभा अणू संशोधन केंद्र, साहा इन्स्टिट्यूट आणि पंजाब विद्यापीठ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अजून रंजक माहीती हवी असेल तर तुनळी गुगलून पाहा ... ;)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
गेल्या महिन्याच्या सायंटिफिक अमेरिकन (इंडिया) च्या अंकात या विषयाबद्दल सविस्तर माहिती आली होती.
असो.
ज्यांना या प्रयोगाविषयी सर्वसामान्यांच्या इंग्रजी भाषेत समजण्याजोगी माहिती हवी असेल त्यांनी या दुव्यावर पहावे.
थोडक्यात चांगली माहिती दिलीत. आताच सकाळमध्ये बातमी वाचून मिपवर दुवाद्यावा असे ठरवले आणि आपला लेख दिसला.
अजून सविस्तर वाचायला आवडेल.
सहज यांनी दिलेल्या दुव्यावरील काकू काकांचे बोलणे सुद्धा ऐकले.
उद्या असलो तर जास्त माहिती वाचीन.. नाहितर काय उपयोग !
-- लिखाळ.
आता १० तारखेलाच समजेल .जगबुडी होते का न्ह्याय ते..
या विषयावर डिस्कव्हरी वाहिनी वर डोक्युमेंट्री पाहिल्याच आठवतय !!
(जगबुडीला टरकणारा..)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
काय मस्त दिवस आहे! संख्याशास्त्र वाले याच्यावरून (उगाचच) चर्चा करू शकतात :-) त्यात अमेरिकन लोकांच्या दृष्टीने ९११च्या जवळ... (९११ नुसती दहशतवादाची आठवण करून देत नाही तर तो "इमर्जन्सीचा" राष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आहे...)
बाकी या प्रयोगाबद्दल उत्सुकता नक्कीच आहे. त्यात कृष्णविवर होऊ शकेल असे ऐकल्यावर जरा पोटात गोळा आला पण जेंव्हा इ-सकाळ मधे या संदर्भात वाचले की, "ती निराधार असल्याचे "सर्न'च्या सुरक्षाविषयक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रयोगाच्या वेळी कृष्णविवर तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि ते झालेच तर आकाराने खूप लहान असेल..." - म्हणजेच शक्यता आहे, असा याचा अर्थ होतो... तेंव्हा अंमळ जास्तच गोळा आला. :S
ही सृष्टी कोणी निर्माण केली ते माहीत नाही, पण संपवायला शंकराच्या तिसर्या डोळ्याऐवजी माणूस स्वतः समर्थतर नाही ना असे वाटले... :?
तरी देखील सर्वकाही व्यवस्थित होईल अशी खात्री आहे. माझ्या कडून या प्रकल्पाला शुभेच्छा!
बाकी अजून तूनळी अथवा या संदर्भात अजून विशेष न वाचल्याने पडलेला एक प्रश्न: या प्रयोगाचे काही गर्भित फायदे आहेत का? म्हणजे अब्जावधी डॉलर्सचा उपयोग फक्त विश्वाची उत्पत्ती समजण्यासाठीच होणार आहे की त्या व्यतिरीक्त काही व्यावहारीक फायदे देखील त्यात आहेत? उ.दा. उर्जा निर्मितीचे नवीन तंत्र, वगैरे...
"सर्न'च्या सुरक्षाविषयक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रयोगाच्या वेळी कृष्णविवर तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि ते झालेच तर आकाराने खूप लहान असेल..."
बरोबर... हे मी पण विश्वासार्ह स्रोताकडून ऐकलं आणि पुढचं स्पष्टीकरण पण! आणि जर असं काही कृष्णविवर तयार झालं तरिही ते हॉकिंग रेडीएशन टाकून नष्ट पावेल असं गणित सांगतं.
त्यामुळे विकासराव खुशाल एंजॉय करा.
>> ही सृष्टी कोणी निर्माण केली ते माहीत नाही, पण संपवायला शंकराच्या तिसर्या डोळ्याऐवजी माणूस स्वतः समर्थतर नाही ना असे वाटले...
अणुबाँब टाकला तर मात्र हे नक्की होईल.
>>बरोबर... हे मी पण विश्वासार्ह स्रोताकडून ऐकलं आणि पुढचं स्पष्टीकरण पण! आणि जर असं काही कृष्णविवर तयार झालं तरिही ते हॉकिंग रेडीएशन टाकून नष्ट पावेल असं गणित सांगतं.<<
वर सहज यांनी जो काकू यांच्या मुलाखतीचा दुवा दिला आहे, त्यात काकू सुद्धा असेच म्हणतात.. अत्यंत लहान कृष्णविवरे एखाद्यावेळी होतील पण त्यांचा आवाका एखाद्या विजेच्या बल्ब येवढा सुद्ध नसेल.
हॉकिंग रेडिएशन काय असते?
कृष्णविवराची ताकद त्याच्या लहानमोठेपणात असते का?
-- (रामभक्त)लिखाळ :)
छान माहिती सांगितलीस. पण यातूनच थोडंसंच समजलं गं. जरा सविस्तर लिहिशील का??
बाय द वे ते रॅप साँग सह्ही आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चर्चेचा विषय जरी क्लिष्ठ असला तरी आकर्षक नक्कीच आहे. सैद्धांतिक भौतिकशास्त्र (theoretical physics) समजायला जरा कठिण आहे, पण एकदा जर त्याची आवड लागली तर "आपले जग खरोखर किती अद्भुत आहे" याची खात्री पटते.
लार्ज हॅड्रोन कोलायडर (LHC) बद्दल भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांचे काय मत आहे हे या लेखामध्ये दिले आहे. LHC मुळे अति-सूक्ष्म कृष्णविवरे तयार होण्याची शक्यता खूप कमी आहे (अंदाजे १%); पण जरी ती तयार झाली तरी क्षणिक असतील.
सारांश, LHC मुळे खालील महत्वाच्या गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळू शकेल:
१. हिग्ज बोसोन्स (अथर्थात God particles)
२. डार्क मॅटर
३. स्ट्रींग थिअरीला अभिप्रेत असलेली 'एकादश मिती' (अथर्थात extra dimensions - बाप रे, भीती वाटली ना!)
४. अँटी-मॅटर
५. सुपर-सिमेट्री
(हे जर डोक्याच्या ४ इंच वरून गेले तर सोडून द्या; 'स्ट्रींग थिअरी'चे पुस्तक पहिल्यांदा वाचताना माझेही असेच झाले होते!)
स्टीफन हॉकिंग्ज यांनी सांगितल्याप्रमाणे, LHC चे व्यावहारीक फायदे (नजिकच्या काळात) होतील की नाही हे आत्तातरी सांगता येणार नाही. आजपर्यंतच्या इतिहासात 'विज्ञान' हे मुख्यतः विश्वाबद्दलचे ज्ञान जाणून घेण्याचे साधन म्हणून वापरले आहे; वैज्ञानिक शोध हे त्यानंतर तंत्रज्ञानातील क्रांती घडवतात आणि व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात. सांगायचा मुद्दा हा की LHC हा मानवी उत्क्रांतीमधील एक खूप महत्वाचा प्रयोग मानावा लागेल.
काही उद्बोधक दुवे: LHC accelerator at CERN, CERN in 3 minutes, the elegant universe
--
The most incomprehensible thing about the world is that it is comprehensible - Einstein.
माहितीबद्दल धन्यवाद.
पण येथे बरेच जण असे आहेत की ज्यांचा अभ्यासाचा विषय फिजिक्स नाहिये. त्यामुळे जरी सर्व शास्त्रीय भाषेतले दुवे उपलब्ध असलेत, तरी संदर्भांची विशेष माहिती नसल्यामुळे नीट गाभा समजत नाही.
जर तुम्हांस साध्या भाषेत जरा विस्तॄतपणे सांगणे शक्य असेल तर समजून घेण्यास सगळ्यांसच सोपे होईल.
मुमुक्षू
मुमुक्षू, प्राजू, ऋचा आणि माझ्याकडून माहीती मागणारे सगळे + राहूल,
मला राहूलचा प्रतिसाद वाचून असं वाटतंय की माझ्यापेक्षा त्यांनाच या विषयातलं जास्त समजतं. तर मी त्यांनाच विनंती करते की त्यांनी जरा या विषयावर लिहावं.
अदिती
बर्याच लोकांना ह्या विषयामध्ये रस आहे असे दिसते. काही जणांना मरायच्या भितीमुळे असेल कदाचित :-)
थोडे सविस्तर लिहिण्यासाठी नविन धागा सुरू करणे रास्त होईल.
मी काही या विषयातला तज्ञ नाही, तरीपण मला जमेल तेवढे लिहायचा प्रयत्न करेन.
तर मंडळी, वाईच दमानं घ्या.
(आयला कारणच शोधताय न लिहायला)
हो ... ज्यातलं काय समजत नाय त्यातलं काय लिवा लिवा ...
आणि हे आणखी एक कारणः
http://www.misalpav.com/node/3399#comment-48010
राहूलना समजतं त्यातलं असं दिसतंय, त्यांना सांगा!
खरे की काय ?
बघा तिच्यायला त्या " हैड्रोन कोलायडर" ला कांपेटिशन म्हणुन "पुणे - ३०" वाल्यांनी काय नविन उद्योग सुरु केले का ?
प्रयोग करत असतील तर आवरा त्यांना, नाहितर फुकट मरताल ...
च्यायला हे काय "रिस्क" घ्यायचे दिवस आहेत का ?
[ कॄपया ह. घ्या.च ]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
त्या मुळेला इंग्रजी आणि ल्याटीन येतं ना थोडंथोडं म्हणून त्याने हॅड्रॉन आणि पाण्याचा संबंध लावला.
तो जोक होता, आता हस!
अवांतरः त्याचं नाव त्याला येतं म्हणून नको लिहूस फळ्यावर! ;-)
आणि ते "रिस्क"चं काय?
मागच्या शनवारी आम्हाला नोहाची नौका हा चित्रपट दाखवला होता. त्यामूळे आम्ही अस समज करुन घेतला होता के जग नष्ट होणार म्हनजे पाउसच येणार खुप. बाकी आम्हाला मराठीच मोठ्या मुश्किलीने येते, ते ल्याटीन फिटीन काय येतेय आम्हाला ?
त्यामूळे आम्ही अस समज करुन घेतला होता के जग नष्ट होणार म्हनजे पाउसच येणार खुप...
ते या प्रयोगामुळे होणार नाही आहे तर क्लायमेट चेंजमुळे जे काही समुद्रातील पाणी (बर्फ वितळल्याने) वाढत आहे त्याने होत आहे.
>>तर क्लायमेट चेंजमुळे जे काही समुद्रातील पाणी (बर्फ वितळल्याने) वाढत आहे त्याने होत आहे.
लोकांमधे बीअर पिण्याचे प्रमाण वाढल्यानेसुद्धा समुद्राचे पाणी वाढलेय असे ऐकुन आहे;)
नाही कळणार.
"कृष्णविवरात जातो आहोत" येथे "जातो आहोत"ची व्याख्या करणे महत्त्वाचे.
कृष्णविवराकडे (किंवा कुठल्याही वस्तूकडे) जाणारे आपण ताणले जात आहोत हे लक्षातच येते - पण त्यात वेगळे काय आहे? (पृथ्वीच्या पृष्ठभागावरही आपले अंग ताणले जात असते. पैकी सर्वात सूक्ष्म ताण मापणारे मज्जातंतू आतल्या कानात असतात - त्यामुळे आपल्याला "खालची दिशा कुठली" ही संवेदना डोळे बंद करूनही होते.) ग्रहाचे गुरुत्व जितके जास्त तितका हा ताण अधिक. हाच ताण जास्त जाणवेल, पण तो जास्त होता होता नेमका कृष्णविवराचा कधी होतो ती कुठली विशिष्ट पातळी नाही. (त्या मानाने खूपच कमी ताणाच्या पातळीवर शरिराचा चेंदामेंदा होईल, ही बात सोडा.)
या क्षणी सुद्धा आपण कुठल्यातरी कृष्णविवराकडे ओढले जात आहोत. आकाशगंगेच्या केंद्रबिंदूपाशी एक मोठे कृष्णविवर आहे, असे मानण्यासाठी बर्यापैकी समर्थन आहे. तर या क्षणी तरी आपल्याला काही खास संवेदना होत आहे काय? मला तरी नाही. कदाचित जोवर त्या कृष्णविवराकडचे आपले अंतर कमी-अधिक होऊ शकते, तोवर आपण "कृष्णविवराकडे जातो आहोत" असे म्हणू नये, अशी आपण व्याख्या करूया. मग त्याच्याकडे जातो आहोत असे कधी म्हणायचे?
कृष्णविवराच्या दिशेने जाताना एक असे कुठले ठिकाण असते की "येथून मागे फिरणे नाही". त्या ठिकाणाला पार केल्यावर आपण म्हणू की आता कृष्णविवराकडे जातो आहोत. पण त्या "सीमा"बिंदूपाशी त्याच्या आगल्या-मागल्या बिंदूपेक्षा कुठली खास वेगळी संवेदना अपेक्षित नाही.
कृष्णविवराच्या दिशेने जाताना एक असे कुठले ठिकाण असते की "येथून मागे फिरणे नाही".
ते एक ठिकाण नसतं, एका विशिष्ट त्रिज्जेच्या आत गेल्यावर असतं की "येथून मागे फिरणे नाही", त्याला श्वार्तश्चाईल्ड त्रिज्जा (Schwarzschild radius) म्हणतात.
या क्षणी सुद्धा आपण कुठल्यातरी कृष्णविवराकडे ओढले जात आहोत. आकाशगंगेच्या केंद्रबिंदूपाशी एक मोठे कृष्णविवर आहे, असे मानण्यासाठी बर्यापैकी समर्थन आहे. तर या क्षणी तरी आपल्याला काही खास संवेदना होत आहे काय? मला तरी नाही. कदाचित जोवर त्या कृष्णविवराकडचे आपले अंतर कमी-अधिक होऊ शकते, तोवर आपण "कृष्णविवराकडे जातो आहोत" असे म्हणू नये, अशी आपण व्याख्या करूया. मग त्याच्याकडे जातो आहोत असे कधी म्हणायचे?
मस्त समजवून सांगितलंत, धनंजय!
मी कालच Dan Brown चे angels & demons वाचायला घेतले. हे पुस्तक सुद्धा एलएचसी वगैरे वरच आधारीत आहे. मिळाल्यास वाचा..अतिशय मस्त आहे..ह्या पुस्तका बद्दल ऐकले होते पण तेव्हा हे एलएचसीशी संबंधीत आहे हे माहीत नव्हते..
स्वप्निल..
प्रतिक्रिया