मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लिली

Bhakti · · मिपा कलादालन
लिली म्हणजेच लिलीयम ही फुलं असंख्य प्रकारची आहेत.उन्हाळ्यात, पावसाळ्यात फुलणारी फुलं आपल्याकडे आढळतात.कंद (bulb) मातीत लावतात.त्यातील काही प्रकार. १.पावसाळी पांढरी लिली(Rainy White Lily) 1 २.पावसाळी गुलाबी लिली(Rainy Pinky Lily) 2 ३.पावसाळी पिवळी लिली(Rainy Yellow Lily) 33 ४.स्पायडर लिली(White spider Lily) 4 ५.नारंगी लिली 5 ६.मे लिली(Football Lily) 34 हा फोटो नऊ वर्षांपूर्वीचा आहे. अजून सहज आढळणारी लिली म्हणजे water लिली आणि फायर किंग शोधत आहे.

वाचने 13472 वाचनखूण प्रतिक्रिया 18

गुल्लू दादा Sun, 07/04/2021 - 17:03
माझ्या आईला झाडांची प्रचंड आवड असल्याने बऱ्याच प्रकारचे झाडे घरी आहेत. कालच आमच्या मेसच्या काकूंना मी घरून 30-40 विविध प्रकारच्या कलमा आणून दिल्यात. लिली बद्दल एक आठवण म्हणजे. जर याचे बी जमिनीत पसरले तर प्रचंड त्रास होतो उपटून फेकताना. मागच्या वेळी घरी गेलो तर तेच काम होत माझ्याकडे. परेशान झालो होतो. या निमित्ताने कटू का असेना माझ्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद.

Bhakti Sun, 07/04/2021 - 20:45
धन्यवाद प्रचेतस आणि गोरगावलेकर काका . गुलाबी लिली सुंदर फुलली आहे.

कंजूस Sun, 07/04/2021 - 21:43
पावसाळी म्हटली तरी पांढरीला वर्षभर थोडी फुले येतात. बाकीच्या पावसाळी. आणि बिया पिवळीला येतात. स्पाईडरची फुले म्हणजे हारातली फुले. मंद सुवास येतो. वर्षभर थोडी आणि पावसाळ्यात अधिक.

Bhakti Mon, 07/05/2021 - 12:29
चौकोजी, कंजूस काका, पैजारबुवा. @कंजूस काका होय पिवळ्या लिलीला बिया पाहिल्या आहेत.मागणीमुळे स्पायडर लिलीची अनेक ठिकाणी शेती केली जाते.

मदनबाण Mon, 07/05/2021 - 22:36
वाह, हल्लीच घरी मोगरा आणि मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजा अशी मोगर्‍याची दोन रोपटी आणली आहेत. :) हल्ली मोठ्या पात्रात पाण्यात तरंगणारी फुले ? असतात त्याला काय म्हणतात ? हे कोणास ठावूक आहे काय ? वॉटर लिली असा काही प्रकार असतो का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।

In reply to by मदनबाण

मदनबाण Mon, 07/05/2021 - 23:31
मदनबाण जागु तै मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजा या एका वाक्याने तुला लॉगिन व्हायला भाग पाडलं ना ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।

In reply to by टर्मीनेटर

गोरगावलेकर Wed, 07/07/2021 - 18:08
काका, काकू, ताई काहीही म्हणू द्या. फोटो आवडला हे त्यांनी आवर्जून सांगितले ह्यातच समाधान.