मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मानसी - बॉलपेन स्केच

चांदणे संदीप · · मिपा कलादालन
Manasi Sketch copy बर्‍याच दिवसांनी आज स्केच करायला घेतले. मागच्या आठवड्यात दुपारी घरी सगळ्यांसोबतच्या करायच्या मनोरंजनात माझ्या लहान मुलीला साडी नेसवून फोटो काढले होते. त्यातलाच हा एक फोटो मी स्केचसाठी घेतला. साडीवरची कलाकुसर माझ्या भाचीची आहे. पेन्सिलचं मला वावडं नाही पण ऐनवेळी बॉलपेनच येतो हातात. शिवाय, माझ्याकडे सगळा कार्यक्रम उत्स्फूर्त असतो. ठरवून असं काही होतच नाही. त्यामुळे बॉलपेन तर बॉलपेन. सांगा कसं झालंय. सर्वांच्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागतच आहे.

वाचने 22333 वाचनखूण प्रतिक्रिया 40

In reply to by अभ्या..

चौकटराजा Tue, 06/02/2020 - 15:43
हे अभ्या आहेत ना ,त्यान्चे लग्न झाले आहे ! त्याना आता असे विचारणे झाले ना की "पोहे कसे झाले आहेत ?" चहा कसा झाला आहे. कान्द्याची भजी कशी झाली आहे की ते आपसूक म्हणतात " एकच लम्बर " !!! )))))

सौंदाळा Sat, 05/30/2020 - 18:43
सुंदर केसांमधल्या छटा निव्वळ अप्रतिम

चांदणे संदीप Sat, 05/30/2020 - 18:58
कधीतरी काहीतरी आडवे उभे करतो कागदावर. त्याला आवडल्याची पावती दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आमचे सोलापूरकर भाऊ बरेच दिवसांनी आल्याबद्दल मला विशेष आनंद झालाय. बबन ताम्बेजी स्वतः उत्तम चित्रे काढतात ते पाहिले आहे. सं - दी - प

मन्या ऽ Sun, 05/31/2020 - 09:20
मस्तच! मी काढायचे स्केचेस.. आता खूप वर्ष झाली पेन्सिल हातात धरुन.. आता परत जमेल कि नाही माहिती नाही..

चौथा कोनाडा Sun, 05/31/2020 - 10:21
आज बर्‍याच दिवसांनी कुणीतरी मिपाच्या कलांगणात सुंदर रांगोळी काढलीय ! व्वा, खुप सुंदर चित्र ! रेषा मस्त आहेत, डोळे तर एकदम सुंदर आलेत ! क्यूट, गोडुली आहे मानसी ! सॅन्डीबाबा _/\_

कानडाऊ योगेशु Sun, 05/31/2020 - 11:56
मस्त. लहान मुलांचे डोळे विशिष्ठ असतात. एकाच वेळी निरागसता,औत्सुक्य आणि खोडकरपणा झ्ळकतो. इथे तुमच्या लेकीच्या डोळ्यात ते हुबेहुब उतरले आहे.

झेन Sun, 05/31/2020 - 12:10
सुंदर सं - दी - प ही पण कला तूमच्याकडे आहे नशीबवान आहात.

चांदणे संदीप Sun, 05/31/2020 - 13:59
चांगलं म्हटलं की मूठभर मांस चढतंच अंगावर. (आधीच बरचंस घेऊन बसलोय. आणि आता थोडी मोदीकाकांची कृपा!) त्यामुळे प्रतिसाद बघून आनंदच होतोय. पण मला विचाराल तर, बरं झालंय असं म्हणण्याइतपतच आहे हे. फक्त, कानडाऊ योगेशु म्हणतात त्याप्रमाणे डोळ्यांना मला विशेष काळजीपूर्वक काढावे लागले. तिथे मेहनत जास्त लागली. कारण बॉलपेनाला एर्रोर मार्जीन खूप कमी असते. नाही म्हणण्याइतपत. @झेन, छंद आहे बाकी काही नाही. मनूला, इतक्या लोकांनी गोड गोड म्हटलंय सांगितल्यावर घरभर नाचेल ती. :) पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. ___/\___ सं - दी - प

नूतन Mon, 06/01/2020 - 09:41
सुंदर. आवडलं. डोळ्यांमुळे चित्र जिवंत झालं आहे

लै म्हणजे लैच भारी आले आहे चित्र, निवांत वेळ देत मनापासुन काढलेले दिसते आहे. बॉलपेन ने चित्र काढण्याचा एक गैरफायदा म्हणजे एकदा काढलेली रेष पुसता येत नाही आणि या चित्रात बोट दाखवायला एकही जागा सापडत नाही. यातच तुझे यश आहे. बाकी डोळ्यांमधले भाव, केसांचे चित्रण आणि साडीवरची नक्षी कमाल आहे. तुझ्या बरोबर तुझ्या भाचीचे ही कौतुक. चित्र निट जपून ठेव मानसी साठी तिच्या अयुष्यातली ही एक सर्वोत्तम भेट ठरणार आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चांदणे संदीप Tue, 06/02/2020 - 15:50
तुझ्या बरोबर तुझ्या भाचीचे ही कौतुक.
हे तिला सांगतो आज.
चित्र निट जपून ठेव मानसी साठी तिच्या अयुष्यातली ही एक सर्वोत्तम भेट ठरणार आहे.
येस्सार! :) सं - दी - प

चौकटराजा Tue, 06/02/2020 - 15:38
हे आलंय मस्त पण हे म्हणजे एकच स्वादाचे आईस्क्रीम झाले. बॉल पेनात अनेक शाई येतात .त्यामुळे चार पाच रन्गात चार पाच चित्रे असा धागा अधिक भावला असता . पुढ्चा धागा असा टाका सन्दीपभौ !!

गामा पैलवान Sun, 06/21/2020 - 18:07
संदीप चांदणे, सुरेख चित्रं आहे. चित्राचा विषय कसला गोंडस ( = क्यूट ) आहे ! डावी भुवई कमालीची नैसर्गिक आलीये. त्यामानाने उजवी जरा विसकटलेली वाटते. मानसीनेच खरवडली असावी बहुतेक. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चांदणे संदीप Sun, 06/21/2020 - 20:58
त्यामानाने उजवी जरा विसकटलेली वाटते. मानसीनेच खरवडली असावी बहुतेक
. बरोब्बर ओळखलेत तुम्ही. हे चित्र काढत असताना ती सारखी झोंबत होती अंगाला, त्यामुळे उजवी भुवई जराशी आडवीतिडवी झालीच. आपल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद! कळावे, आ. न. सं - दी - प (ता .क. : आमच्या इथे मस्तानी मिळणेस सुरूवात झालेली आहे.)

In reply to by चांदणे संदीप

गामा पैलवान Sun, 06/21/2020 - 22:09
संदीप चांदणे, मस्तानीबद्दल धन्यवाद! :-) दोन भुवया वेगळ्या काढल्याने चित्रं नैसर्गिक रीत्या जमलं का काहीसं म्हणतात ते झालं आहे. बॉलपेनाने हे असं काढणं अविश्वसनीय आहे. ____/\____ आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Sun, 06/21/2020 - 18:14
मस्त झालं आहे स्केच. पुन्हा एकदा स्केचचा फोटो काढून टाकावा अशी शिफारस करतो, कारण या फोटोत चेहर्‍यावर केलेले काम नीट दिसत नाहीये. फोटो मोबाईल ऐवजी कॅमेर्‍याने काढला तर बरे होईल. तुमची आणखी चित्रकला बघायला आवडेल.

In reply to by चित्रगुप्त

चांदणे संदीप Sun, 06/21/2020 - 20:53
चित्रगुप्तकाका अनेक धन्यवाद! क्यामेरा माझ्याकडे नाहीये त्यामुळे परत हा फोटो टाकायला वेळ लागेल कदाचित. आणि, कधीतरीच खरडतो पेन कागदावर. आवड आहे पण वेळ नाही. परत काही खरडले की नक्की टाकेन. सं - दी - प