मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ४

स्वच्छंदी_मनोज ·

प्रचेतस Wed, 10/03/2018 - 14:00
अगदी मनातलं लिहिलंस. १७/१८ वर्षापूर्वी जीवधनला गेलो होतो. तेव्हा आपटाळ्याच्या पुढे रस्ता नव्हताच. सगळंच खडबडीत. खाजगी गाड्या कुणाकडे नव्हत्याच, असल्या तरी त्या तिथंवर नेणंही दुरापास्तच होतं. अशा वेळी जुन्नर अंजनावळे एसटीचा खूप आधार वाटायचा. इतक्या खराब रस्त्यांवर फक्त एसटीच अविरत सेवा देतेय हे पाहून एसटीचा अभिमानही वाटायचा. आजही जुन्नरच्या एसटी स्टॅण्डवर तिथल्या पश्मिकेकडल्या दुर्गम भागात जाणार्‍या लाल गाड्यांचे वेळापत्रक बघून जुन्या आठवणी दाटून येतात. असंच एकदा लोणावळा-राजमाची-ढाक करुन येताना जांभिवलीतून कामशेत गाठलं होतं. तो रस्ताही अतिशय दुर्गम पण एसटी मात्र वेळेवर. हरिनाम सप्ताहांचा अनुभव तर खूपदा घेतलाय. कित्येकदा किल्ल्यांवर किंवा किल्ल्यांच्या पायथ्याच्या मंदिरांत, शाळेत मुक्काम असताना रात्रभर हे भजनाचे सूर दुरुन कुठूनतरी वाजतच असंत. काहीवेळा काकडारती. मजा असे.

sagarpdy Wed, 10/03/2018 - 17:30
होळी कोकणात मानाने कदाचित गणपती पेक्षा मोठा सण . गणपती तसे घरगुतीच, होळी मात्र गावची - त्यामुळे मानापमान असो किंवा एकत्र येणे/करणे असो होळीच्या वेळी जास्त. होळी खालोखाल गावदेवाचा उत्सव. उदा. आमच्याकडे केदारलिंगचे म्हणून महाशिवरात्र व त्रिपुरी पौर्णिमा मोठे सण. मस्त लिहिलंय हे वे न सा. पु भा प्र

दुर्गविहारी गुरुवार, 10/04/2018 - 12:21
बर्‍याच दिवसांनी आज मि.पा.वर फिरकलो. बरेच धागे वाचायचे राहिले आहेत. पहिला धागा हा वाचला. अपेक्षेप्रमाणे अप्रतिम ! ट्रेक संपंताना हि लाल परी आपली वाट बघत उभी दिसते तेव्हाच्या भावना शब्दबध्द करणे कठीण. आपल्या घरी आता आपण सुरक्षित पोहचणार याची जणु हमी मिळते. सह्याद्रीत साजरे होणारे ॠतु हा असाच हळवा विषय, खांदेरीला जायचे असेल तर होळीपौर्णिमेला पर्याय नाही, मी ही अशीच जोडून सुट्टी घेउन कधी डोंगरात जातोय याची वाट पहात असतो. मग अनंत चतुर्दशी, होळी, रंगपंचमी अशी निमित्ते शोधून जोडून सुट्टी घेउन आणखी काही किल्ले नावावर केले जातात. छान लिहीलय. पु.भा.प्र.

Taxonomy upgrade extras
काही दिवसांच्या ब्रेक नंतर आणिक दोन नविन शब्दचित्रे घेऊन आलोय. पहील्या तिन भागांच्या लिंक इथे आहेत - सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग १ - https://www.misalpav.com/node/43030 सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग २ - https://www.misalpav.com/node/43057 सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43162 ------------------------------------------------- सह्याद्रीतील शब्दचित्रे: गणपती आठवड्यापुर्वीच्या वर्तमानपत्रामधे वाचले होते की ह्या गणपती सिझनला एस्टी मुंबईतून साधारण २२०० जादा गाड्या सोडणार आहे ज्यांचे जवळ जवळ ७५% बुकिंग ऑलरेडी झालेले आहे.