(कळले ते फंडे)
प्रेरणा - ऋषीकेषाला कळलेले अंडे
लिहिल्या लेखना पटकन केवळ कळले ते फंडे
नेमक्यावेळी डिलिट करुनी मारले ते दंडे
अनिवासी वाद, तोडी पाणी, भट्टी जमली वाट्टं
परंतु मागच्या चावडीमागे शिजले ते फंडे
धोरणाच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी
तरी पेपरावरती शेवटी उरले ते फंडे
झकास ठुमक्या नंतर देवा मनभावे स्मरले.
दुखतील भावना म्हणूनी ढोसले ते फंडे
रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान
पण पीसीवर बसल्याबसल्या बोलले ते फंडे
**नेहमीच्या फंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही
सदर काव्य आमचे परममित्र परा यांना समर्पित.
काव्यरस
मिसळपाव
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.