कन्नडा हाडु
- Read more about कन्नडा हाडु
- 20 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय!
उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!)
आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण.
पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.
हुकलेली संधी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
- Read more about हुकलेली संधी
- 44 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
माध्यान्हीची वेळ | जराशी निवांत | लाभतो एकांत | घरामध्ये ||
झाली सामसूम | आटोपता काम | करिती आराम | सारेजण ||
खळ्यामध्ये बैल | करिती रवंथ | बसुनी निवांत | झाडाखाली ||
गडीमाणसेही | खावया भाकरी | गेली त्यांच्या घरी | नुकतीच ||
दळ्णकांडणी | पडलासे खंड | सारे काही थंड | अंगणात ||
चिमण्याही गेल्या | आपुल्या खोप्यात | राघू पिंजर्यात | विसावला ||
मंदसा तेवतो | देव्हार्यात दीप | म्हातारीचा जप | चालू असे ||
पाणी द्यावयाचे | करून निमित्त | नार गेली आत | खोलीमध्ये ||
आयन्यात बाई | पाहे पुन्हा पुन्हा | गालावरी खुणा | रात्रीच्या त्या ||
आठवता सारे | दूर झाली लाज | चमकली वीज | देहामध्ये ||
प्रीत
पांढरपेशी कविता
लेखनविषय:
- Read more about पांढरपेशी कविता
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
पांढरपेशी कविता
क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या
फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या
मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास
खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास
गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या
मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या
गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली
दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली
चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी
फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी
शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा
कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा
जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही
आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही!
दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व
वेड हे रक्तात माझ्या...
Taxonomy upgrade extras
- Read more about वेड हे रक्तात माझ्या...
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
वेड हे रक्तात माझ्या वादळाशी झुंजण्याचे
जे किनार्याचेच प्रेमी वेगळे सगळेच त्यांचे
पेटले वणवे विखारी ज्यात मी झोकून देई
वाचवाया कातडी ना, कौल मिळती काळजाचे
होऊ दे उध्वस्त आयू, होऊ दे जखमी जटायू
घ्येयपथि हे घातलेले गालिचे ही कंटकांचे
जो लढे लोकार्थ त्याला भुलविती ना शब्दलेणी
दार मौनाचे खुणावी आतले हृदयांतरीचे
नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज
रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे
--अशोक गोडबोले, पनवेल.
मी!
Taxonomy upgrade extras
- Read more about मी!
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ना शोधितो किनारा
ना धुंडितो निवारा
मी धुंद वादळाशी
अविराम झुंजणारा
चुंबावया नभाला
झेपावतात लाटा
उद्दाम कालियाचे
शिर मीच ठेचणारा
दर्या अथांग माझी
टाकी गिळून नाव
तेजाळ रत्नगुंफा
तिमिरात शोधणारा
आयाळ पिंजणारा
झोंबे पिसाट वारा
दुर्दम्य निश्चयाचे
मी शीड रोवणारा
धावून ये घनांची
रणधुंद मत्त सेना
मी नेत्र शंकराचा
अंगार ओकणारा
आभाळ फाडुनी ये
बिजली कडाडणारी
नी निग्रही ध्रुवाशी
रणनाळ जोडणारा
--अशोक गोडबोले, पनवेल.
अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.
नमोगत दिवाळी अंक आणि त्या अनुषंगाने...:)
लेखनप्रकार
- Read more about नमोगत दिवाळी अंक आणि त्या अनुषंगाने...:)
- 20 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आदरणीय पंचायत समिती,
सदर लेख हा केवळ माझ्या कल्पनेतला आणि स्वप्नरंजनातला आहे. कुणाही जिवंत वा मृत व्यक्तिशी अथवा संकेतस्थळाशी याचा संबंध नाही आणि तसे कुणाला आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा असे मी जाहीर करतो. त्याचप्रमाणे या लेखात काही कॉमन कोकणी शिव्या आहेत, त्याही पंचायत समितीची हरकत नसल्यास या लेखात राहू द्याव्यात अशी माझी आग्रहवजा विनम्र मागणी आहे!
एजीओजी
लेखनप्रकार
- Read more about एजीओजी
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे.
सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
काशीबाई..
लेखनविषय:
- Read more about काशीबाई..
- 42 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
तात्या अभ्यंकरांची व्यक्तिचित्रे आणि गणगोतातील माणसे!
१) आबा जोशी
२) बुवा
३) पाटणकर आजोबा
४) नेनेसाहेब
५) साधना कोळीण
६)