Skip to main content

लेख

जसं असायला हवं तसंच व्हावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 07/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे.

वाट सागरदुर्गाची . . . .अर्थात सागरगडाचा ट्रेक

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 04/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबागजवळील डोंगरावर सागरगड वसलेला आहे. सागरगडावर जाण्यासाठी वाघेडे गावांत जावे लागते. पेण-पोयनाड मार्गावर असलेल्या पेझारी फाट्यावरुन वाघेडे गावाकडे रस्ता जातो. अंतर अंदाजे अर्धा कि.मी. हे अंतर काटल्यावर आपण वाघेडे गावांत येतो. हे सागरगडाच्या पायथ्याचे गांव. गावाच्या मागच्या ठाकरवस्तीपासनं रस्ता आहे. ठाकरवस्ती डाव्या हाताला ठेवून चालत निघालं कि एक डोंगर लागतो तो पार करायचा आणि चढाई कायम ठेवायची. रस्ता बरोबर असल्याची खूण म्हणजे वाटेतच उजव्या हाताला रस्त्यालगतच भग्न अवस्थेतील एक दगडी नंदी दिसतो. नंतर अजून एक डोंगराचा टप्पा लागतो इथे वाटेवर सागाच्या पानांचा सडा पडलेला दिसतो.

अद्भुत प्रकाराचा अनुभव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको." फास्कूच्या घरी मी खूप दिवसानी गेलो.खरं त्याचं नांव पास्कल.पण आम्ही सर्व त्याला फास्कूच म्हणायचो.तशी मला समुद्राची ओढ लहानपणापासूनची.फास्कू हा कोळी जमातीतला.समुद्र ही त्याची कर्मभुमी.माडाच्या झावळ्या शिवून त्याची झापं बनवून ती झापं झोपडीवर शाकाहरतात.आणि झोपडीच्या आत ह्या झापांच्या आडोशाच्या भिंती करून खोल्या बनवतात.बाहेर उन खूप असलं तरी झोपडीच्या आत एकदम थंड वाटतं. झोपडीच्या आजूबाजूला बांबूंची तिरकांडी उभी करून एकपदरी सुंभाच्या दोर्‍या बांधून पिळाच्या चिमटीत बांगडे,तारल्या किंवा कोलंबी अडकवून

मौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 31/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले. "तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं" असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं, "घरी सर्व ठिक आहेना?" "ठिक नसायला काय झालं?.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी निदान बिझी असल्यासारखं दाखवावं लागतं.सध्या जॉब टिकण्याची काही खात्री नाही.राहाता राहिलो आम्ही म्हातारी कोतारी माणसं.सकाळी उठल्यावर गुडघे दुखत नाही हे समजल्यावर समजावं आपण ठिक आहो.ह्यावरून कळलं ना तुम्हाला की सर्व ठिक आहे ते.?" प्रो.देसायानी एव्हडं सविस्तर

|| धर्मांतर ||

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 30/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत वाटत आली आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. पुण्यातील एका मानाच्या गणपतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका विद्वानाचे "धर्मांतराची समस्या" या विषयावर प्रवचन होते. वर म्हटल्याप्रमाणे, हा कुतुहलाचा विषय असल्यामुळे मी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो होतो. शुभ्र वेष, शुभ्र दाढी आणि तुळतुळीत टक्कल असलेले प्रमुख वक्ते पूर्वाश्रमीचे अमेरीकेत एमेस केलेले संगणक अभियंते होते.

पांढर्‍याचं काळं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 28/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला खूप दिवस होऊन गेले.मी एकदा गिरगावात गेलो होतो.पॉप्युलर बूकडेपोत काही पुस्तकं चाळत होतो.विं.दा.करंदिकरांचं कवितेचं एक पुस्तक आवडलं.आलो होतो चिं.त्र्यं.च्या चानी ह्या कादंबरीसाठी.मिना साठे आणि तिचे यजमान बुकडेपोतच भेटले.माझी त्यांची फार पुर्वीची ओळख आहे.त्यानंतर आज आमची भेट झाली ती योगायोगानेच.माझी पत्नी मला म्हणाली खूप दिवस आपण खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला गेलो नाही.म्हणून आज आम्ही जायचं ठरवून आलो होतो.बाजूच्या फॅमेलीरूम मधे साठे पतीपत्नी बसली होती.साठ्यांना मासे खूप आवडतात.मीच त्यांना अनंताश्रमाची माहिती दिली होती.पापलेटची आमटी आणि तळलेल्या सरंग्याचं काप हे समीकरण त्यांना खूप आवडायच

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

आयुर्वृद्धितीतली सुंदरता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची.तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं. मला म्हणाली, "तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी आपण भेटतोय.तू मात्र आहेस तसाच आहेस." "पण तू इतकी खराब कशी झालीस?. असं मी म्हणता म्हणता मला अर्थू म्हणाली, "अरे हे सर्व प्रश्न दारातच विचारणार की आत येणार?" मी आत गेल्यावर प्रथम सहाजीकच इकडच्या तिकडच