Skip to main content

आस्वाद

श्रीकृष्ण वसुदेव यादव

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 01/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिळपाववर रामायण-महाभारताच्या विविध अंगानी चर्चा होत राहाते. त्यातील एक बहुचर्चित व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या लीलांमुळे सामान्यजनांवर त्याच्या चरित्रातील विविधांगांची मोहिनी पडलेली जाणवते. अनेकांना लीला व अदभूतता सोडून श्रीकृष्णाच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाची माहिती मला नव्याने कळल्याचे जाणवले. ते मला भावले. कदाचित आपणालाही ते वाचायला रंजक वाटेल.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 30/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान नमस्कार मंडळी, या स्पर्धेला दिलेल्या उत्साही प्रतिसादाबाबत मनःपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा. कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ९ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती.

माझे आवडते गाणे

लेखक सत्याचे प्रयोग यांनी शुक्रवार, 30/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बऱ्याच वेळा आनंदी , दु:खी असताना काही गाणी गुणगुणत असतो. बरीच गाणी नुसती ऐकूनच मन प्रसन्न होते. मनात घर केलेली गाणी वारंवार गुणगुणायला आवडतात. असेच माझ्या आवडत्या गाण्यापैकी एक गाणे आहे “ तेजाब “ सिनेमा मधील “ सो गया ये जहा ‘’ साध्या सोप्या पण आशयघन शब्दांनी गीते फुलविणारे गीतकार जावेद अख्तर , तर हजारो गीतांना आपल्या मंत्रमुग्ध संगीताने भूरळ पाडणारे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल , तर काही मोजकीच पण लक्षात राहणारी गीते गाजवणारे गायक नितीन मुकेश , सोबत गायक शब्बीर कुमार व अलका याग्निक आणि हो यातील कोरसची साथ ही महत्वपूर्ण आहे.

मूठभर खजूर [पूर्वार्ध]

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 22/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मूठभर खजूर [पूर्वार्ध] (El Tayeb Salih यांच्या 'A Handful of Dates' या कथेचा स्वैर अनुवाद. ही कथा मूळ अरेबिक मध्ये लिहिली गेली, नंतर तिचे इंग्रजीत भाषांतर झाले.) नेमके वय नाही आठवत आता, पण खूप लहान होतो. आजोबांबरोबर बाहेर पडलो, कि गावातले लोक प्रेमाने माझे गालगुच्चे घ्यायचे, डोक्यावर हळूच टपली मारायचे.... आता हे असलं काही, ते माझ्या आजोबांबरोबर करायचे नाहीत! वडील कधीच नाही, पण आजोबा मात्र मला नेहमी त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन जात. दररोज भल्या सकाळी मी कुराणपठनासाठी मशिदीत जाई. ती मशीद, ती शेते, ती नदी.....आमच्या जगण्याचे आधार! माझ्या वयाची इतर मुले मात्र मशिदीत जायला,कुराणपठन करायला कुरकुरत.

से ह वा ग!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 21/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
से ह वा ग! वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू!

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेशमधून प्रस्थान

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 20/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

श्रीरामाचा मित्र - भद्र - रामायणातले एक महत्वपूर्ण पात्र

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 19/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांड मधील ४३व्या सर्गात श्रीरामांची त्यांच्या मित्रांसोबत होणार्या चर्चेचे वर्णन आहे. त्यात श्रीरामांचा मित्र भद्र सीता विषयी प्रजेचे मत बेधडकपणे श्रीरामांसमोर मांडतो. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून श्रीरामाला आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. रामकथेला कलाटणी देण्यात भद्राचे महत्वपूर्ण स्थान असूनही, अधिकांश लोकांना भद्राचे नाव माहित नाही. म्हणतात न, राजाला मित्र नसतात. राजा अवतीभोवती वावरतात फक्त, चाटुकार, चारण, भाट आणि विदूषक. राजावर स्तुतिसुमने उधळून, निरनिराळ्या क्लुप्त्या करून राजाला प्रसन्न करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट.

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ८ ऋषीकेश दर्शन

लेखक मार्गी यांनी सोमवार, 19/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ७ हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 16/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 14/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
[रामसेततु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन]. वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते. आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे.