Skip to main content

आस्वाद

Mr.Bean

लेखक हृषिकेश पांडकर यांनी बुधवार, 10/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी प्रथमदर्शनी जितक्या समजतात त्यापेक्षा जास्त त्या पुढल्या वेळी पाहताना कळतात.जितक्या जास्त वेळा पाहू तितक्या वेळा काहीतरी नवीन पाहिल्याचा बोध मला होतो.

आवारा कृष्णमेघ आणि दिल्लीचे रस्ते

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
(मराठी सृष्टीत पूर्वप्रकाशित हि कथा कॉमनवेल्थ खेळांच्या आधी लिहिली होती - या पावसाळ्यात दिल्लीच्या रस्त्यांची दशा आणि देश्यात इतरत्र घडलेल्या घटना पाहून या लेखाची आठवण झाली. कथा काल्पनिक आहे, वास्तवाची काही एक संबंध नाही). दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरतीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्णमेघाने धरतीला तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे.

एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे. वीज गेली. पंखा हि बंद झाला. इमरजेन्सी लाईट लाऊन वीज येण्याची वाट पाहू लागलो. एक तर पावसाळी महिना आणि त्यात भरपूर उमस. सौ.

शेवटचा पदन्यास एक

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 03/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा वर्षांपूर्वी एक तंत्रज्ञ काम करायचा हाताखाली, डॅरेन कोल्स्टन नावाचा. "आपलं काम बरं आणि आपण बरं" असा एकाग्र चित्ताने, इतरांमध्ये फारसा न मिसळता रहायचा. उत्तम कमावलेली शरीरयष्टी. त्यामुळे त्यामुळे एक श्वेतवर्णी आणि एक कृष्णवर्णी अशा नटखट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन्ही सहकारी तंत्रज्ञ सहकारी कन्यका त्याच्या आगे-मागे रुंजी घालायच्या, पण हा कुणाच्या अध्ये-मध्ये न पडता, कानांत इअरफोन्स घालून गाणी ऐकत आपलं काम करीत रहायचा.

चुकचुकली पाल एक...!

लेखक खेडूत यांनी सोमवार, 01/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गीत : चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी गीतातील सूर असे का मधेच पण तुटले तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार ही अशीच तव छाया पण मागे धावणार सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६ *** अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.

(आरोळ्या जालीय फेरीवाल्यांच्या)

लेखक खेडूत यांनी शनिवार, 30/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (सदर धाग्याच्या लेखिका आदरणीय आणि सिनियर मिपाकर आहेत. आम्ही त्यांच्या लेखनाचे पंखा आहोत - त्यामुळे धागा टाकताना दोन दिवस विचारच करत होतो - पण आशा आहे की त्या स्वतः आणि ज्यांच्याकडे कळत नकळत निर्देश होते ते सगळेही ह.च घेतील.) पूर्वी निवडक संस्थळे सोडली तर इतर चेपू समूह , संस्थळांवर आतासारखी जिलब्यांची बाजारपेठ खूप कमी होती. मिपा तर अस्तित्वातच नव्हते. पण एकदा मिपा सुरु झाल्यावर मग काही नित्य गप्पांसाठी मिपावर येणार्‍या फेरीवाल्यांची - आय मीन आयडींची आतुरतेने वाट पाहिली जायची.

असेच काहितरी सुचलेले

लेखक राजू यांनी गुरुवार, 28/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा. थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा. कॉलेजला गेल्यावर चार्ली,डार्लिंग,ब्रुट, स्वीटहार्ट अशी काही नावे कानावर पडू लागली नव्हे त्या

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.६) सुनता है गुरु ग्यानी - चौथा आणि पाचवा चरण

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे या दोन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते.

मी आर्ची बोलत्येय.

लेखक आंबट चिंच यांनी गुरुवार, 28/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

लेखक सुंड्या यांनी गुरुवार, 28/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं- उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब, चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है, तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब मै कब डूबुंगा फिक्र किया करते है, कश्ती-वश्ती, दर्या-वर्या लंगर-वंगर सब... “वा वाह!!.....गजब” -मी “जियो क्या ब