हे असं का होतंय?
- Read more about हे असं का होतंय?
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नमस्कार मंडळी,
सर्वात आधी आज मिसळपावच्या सेवादात्याच्या खंडीत सेवेमुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मिसळपाव तर्फे दिलगिरी व्यक्त करतो.
मिसळपाव दिवसागणीक वाढतं आहे. रोज नवीन सदस्य येत आहेत. आणि हजर असणार्या सदस्यांची संख्या सुध्दा वाढती आहे. सध्या खर्या अर्थाने सक्रिय असणार्या सदस्यांच्या संख्येत दुप्पट किंवा तिप्पट सुध्दा वाढ झाली तरी आपला सेवादात पुरून उरेल एवढी क्षमता आहे. मात्र गेले काही दिवस कधीतरी अचानकच भेट देणार्या अतिथींची संख्या खूप वाढते. सेवादात्याला
झेपणार नाही एवढ्या मागण्या केल्या जातात. हे नैसर्गीक नाही अशी शंका आहे. असो.
गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु