प्रिया तुझ्या प्रितीमध्ये हृदय माझे गुंफले,
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...
हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी
आज तिचे देहभान, सागरातच गुंतले..
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...
चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली
घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली,
त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...
स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला
तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला
मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले
रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले...
- प्राजु
शहारे आले.......
टंकलेखन सहाय्य.
छान
सहि रे
धन्यवाद
जबरदस्त!
चैतन्यमयी काव्य!
अतिशय चैतन्यपूर्ण...