आठवण (देवद्वार छंद)

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माझ्याकडुन एक प्रयत्न मन हे कातरं होई संधिकाली प्रेमाची सावली हरवली || भुक ना तहान होइ जीव वेडा विरहाची पिडा ह्रुदयात || तुझी आठवण भान हरपते मन ना लागते कशातच || नित्याचि चाहुल कानात साठते गळा दाटवते नित्यनेमे || लागे हुरहुर आता नाही भेट दाखव तु वाट अंधारात || थांबले स्पंदन उर हा फुटला विरह दाटला सर्वदुर || तेवतो प्रकाश मंद गाभार्‍यात पेटवुन ज्योत समईची || सुंदर ते ध्यान डोळे साठवती मिळे मनःशांती काही वेळ || पुन्हा दिनक्रम पुन्हा संध्याकाळ मिळे पाठबळ नामासंगे || अवांतर : धोडोंपंताकडुन बरचं काही शिकायला मिळणार तरं :)

मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८ - अभिप्राय

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मिपा काव्यकट्ट्याच्या नोव्हेंबर २००८ च्या काव्यस्पर्धेतील रचनांवर अभिप्राय येथे द्यावेत. अन्य कोणतेही लेखन येथे करू नये. धोंडोपंत

मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लोकहो, मिपावरील आमच्या छंदशास्त्रीय लेखनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मिपावरील काव्यप्रेमींना धन्यवाद. भारावून टाकणारा हा प्रतिसाद आहे. असा प्रतिसाद कोणत्याही मराठी संकेतस्थळावर आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. मिपाला उथळ वगैरे म्हणणार्‍यांनी हे सदर पहावे. या प्रतिसादावरून एक गोष्ट सिद्ध झाली की अनेक जण उत्कृष्ट काव्यलेखनाची क्षमता बाळगून आहेत. फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि वाव मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने "मिसळपाव काव्यकट्टा" आजपासून सुरू होत आहे. मिसळपाव काव्यकट्टा हे मिसळपाववरील कवींसाठी काव्यसंमेलन आहे.

देवद्वार छंद

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लोकहो, वृत्तबद्ध काव्य ज्यांना लिहायचे आहे त्यांनी एक एक वृत्तावर प्रभुत्व मिळवावे. एकदम भाराभर वृत्ते समोर घेऊन बसू नये. त्यातही तीन पायर्‍या आहेत. सर्वप्रथम १) छंदांवर प्रभुत्व मिळवावे. त्यानंतर २) छंदात लिहिणे जमू लागले की जातींमध्ये लिहायला सुरूवात करावी. आणि शेवटी ३) जातींमध्ये लिहिता यायला लागले की मग अक्षरगणवृत्तात लिहिण्याच्या पायरीवर जावे. एकदम सुरूवातच मालिनी किंवा शार्दूलविक्रीडित सारख्या वृत्तांची निवड केल्यास जमणार काहीही नाही आणि त्यातून फ्रस्ट्रेशनमात्र भरपूर येईल. एवढं येईल की ते आयुष्यभर पुरेल.

आमची बायको कुत्रा पाळते

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमची बायको कुत्रा पाळते तुम्ही पाळून देऊ नका आमच्या पायाखाली जळते तुम्ही पोळून घेऊ नका.
कुत्रे पाहून मैत्रीणीकडे वेडे खूळ मनात भरले आपण पपी घेऊ गडे लाडे लाडे फर्मान सुटले
भलतीच पपी वाटली मला घेऊ ग लवकर, म्हटले पपी नव्हे, घात झाला कुत्रे शोधणे सुरू झाले.
अल्सेशियन, बव्हेरियन डोबरमॅन, चिव्हावा सारे कनाईन धुंडून पामेरोरियन ठरला घ्यावा
नकद चार हजार मोजून शुभ्र कुत्रा हिने खरिदला सतत लाड त्याचे पाहून माझा भाव खाली उतरला
पपीची खेळणी आणि खाऊ रोज हिची धावपळ बघून वाटे पपीला गिळू की खाऊ सारखा

हा स्पंद फुलण्याचा

उन्मादूनी उसळतो आनंद अंतरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा हातात पावसाची ओली फुले उमलती पाण्यात नाचताना जणू थेंब ताल होती झाडांतूनी पसरतो नवश्वास पालवीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा आरश्यात पाहताना प्रतिबिंब रोज हासे माझे मलास सांगे, हे दिवस श्रावणाचे अंगातूनी फिरे मग, स्वरनाद बासरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा लपुनी पुन्हा पुन्हा मी, मलाच साद देई थरकून पैंजणांना, हलकेच नाद देई लडीवाळ स्पर्श होतो, गालांवरी फुलांचा सारी नवी उ भारी हा स्पंद फुलण्याचा

खपली

लेखनविषय:
रुतलेल्या सहस्त्र जखमा मी सांभाळतो उराशी रुदनाचे सोयर तुटले मज खंत ना जराशी आक्रोश ना कदापी ना द्रोह जीवनाशी अजुनी सजीव आहे ना राग हा तुझ्याशी गाऊ नको वॄथा तू माझी मलाच गाणी वांझोट्या स्वप्नांनीही मानले रिक्त हे पाणी जा सोड इथेच आता चल मोह पाश तोडू झेपेना स्पर्ष हताचा खपली नकोस काढू

माझी विठ्ठल माऊली..

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की! तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही?

अर्थ काय ह्याचा?

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कळीने कधी विचारला अर्थ उमलण्याचा? फ़ुलाने कधी दाखवला स्वार्थ जपणुकीचा? उषा पुन्हा निघून गेली पुसून लाली रंगांची नाही क्षणही थबकली वाट पहात टाळ्यांची निर्झरांना कधी मिळाला आस्वाद मधु जलाचा? पाखरांना कधी समजला आवेग तृप्त करण्याचा? आईने कधी का केला कंटाळा भरवण्याचा? अर्थ कधी ना पुसला बाळाच्या लाथांचा.
Subscribe to कविता