✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कुटुंब गेले कुणीकडे?...

द
दिनेश५७ यांनी
Fri, 08/28/2009 - 12:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2423 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

जागतिकीकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/28/2009 - 12:42 नवीन
जागतिकीकरणाचा फटका केवळ महिलांनाच बसतो असे म्हणतांना जरा कचरतोय पण तसे असेल,नसेल. पण बेकारी, महिलांचे शोषण, बालकांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न 'आ' वासून आपल्या समोर उभे आहेत. अर्थात तुटपूंज्या उदरनिर्वाहाच्या साधनांद्वारे कुटुंब चालवणे अवघड झाले आहे, हे खरे आहे. फक्त माणूसकी कमी होऊ नये असे वाटते. महिलांसाठी पंचायतीत ५० टक्के आरक्षण ही एक आज आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. आखाती देशांमध्ये नोकरीधंद्यानिमित्त जाणा-या तरुणांची संख्या वाढत असल्यामुळे, घरांमध्ये केवळ वृद्धांचाच वावर उरला असल्याचे एका पाहणीत उघड झाले होते. ही मुले आपल्या आईबापांच्या उदरनिर्वाहासाठी भरपूर पैसेही पाठवतात. पण देखभाल ही त्यांची उतारवयातील गरज दुर्लक्षित राहाते. मग, पैशाची पोतडी सोबत घेऊन त्यांना वृद्धाश्रम गाठावा लागतो... नो कमेंट्स ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हळवे

मिसळभोक्ता
Fri, 08/28/2009 - 22:34 नवीन
फारच हळवे बुवा तुम्ही बिरूटे सर.. आज कुठे धावायला गेला होतात ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/29/2009 - 00:13 नवीन
फारच हळवे बुवा तुम्ही बिरूटे सर.. :) मी हळवाच आहे. विंदाच्या ओळी आठवल्या...... विविध वादांच्या असंख्य चिंध्या जोडून बनवितो आपल्या लंगोट्या. तरिही शेवटी राहतो नागडेच... -दिलीप बिरुटे (नागडा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

ह्म्म्म्म

मिसळभोक्ता
Sat, 08/29/2009 - 00:17 नवीन
म्हणजे अजूनही विजार शिवण्या इतपत वादांच्या चिंध्या केल्या नाहीत तर. आम्ही बघा, सूट शिवलाय, खिडक्यांचे पडदे, बेडशीट्स. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालची तेजी आमच्या गावात आलीच नाही

रामदास
Fri, 08/28/2009 - 13:57 नवीन
जागतिकीकरणाचा फायदा गावांपर्यंत पोहचण्याआधीच मंदीला सुरुवात झाली. कुटुंबकल्याण आणि माता-बालकांचे आरोग्य ,मुलींचे शिक्षण ,आणि इतर अनेक समस्या आहेत तशाच राहतील. जगण्याच्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो हे मात्र जोरकस वाक्य आहे. काटकसर ही नवी जीवनशैली ही तर आमची परंपरागत शैली आहे. लेख आवडला.पण चांगल्या लेखांची वारंवारीता फार कमी असते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
Fri, 08/28/2009 - 14:10 नवीन
चांगला लेख. मुले व वृद्ध व काहि प्रमाणात स्त्रीया, समाजाचे 'अन्प्रोडक्टीव्ह' भाग. त्यातही मुले ही भविष्य व स्त्रीया मुले जन्माला घालणार म्हणून निदान समाज त्यांच्याकडे- त्यांच्या प्रश्नांकडे ( हेवे तितके नसले तरी काहि प्रमाणात) लक्ष तरी देतो. वृद्धांना मात्र आपला "पाचोळा" होतो का "निर्माल्य" इतकंच काय ते बघणं नशीबी असतं. लेख आवडला. ह्या मंदीमुळे म्हणा - महागाई मुळे म्हणा - दुष्काळामुळे म्हणा सर्वात जास्त परिणाम होणार तो याच घटकांवर हे आपले म्हणणे पटले. रामदासजी म्हणतात त्याप्रमाणे "जगण्याच्या लढाईत माणुसकीचा पराभव होत" हे वाक्य मार्मिक आहे. ऋषिकेश ------------------ दूपारचे २ वाजून ०९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु देऽऽ...."
  • Log in or register to post comments

जगण्या’च्

लिखाळ
Fri, 08/28/2009 - 17:59 नवीन
जगण्या’च्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो, याचे दाखले आजवर कमी नाहीत. हम्म ! खरे आहे. लेख आवडला. निवासी करियरिस्टांच्या मुलांची एक कथा आणि करियरिस्ट अनिवासींच्या पालकांची दुसरी कथा !! -- लिखाळ. आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो. ;)
  • Log in or register to post comments

चांगला लेख

स्वाती२
Fri, 08/28/2009 - 19:51 नवीन
>>जगण्या’च्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो, याचे दाखले आजवर कमी नाहीत>> खरे आहे पण माणूसकी हरू देणार नाही ही जीद्द बाळगणे, त्यासाठी प्रयत्न करणे तर आपल्या हातात आहे. >>पैशाची पोतडी सोबत घेऊन त्यांना वृद्धाश्रम गाठावा लागतो... याच परीस्थितीकडे एक संधी म्हणून बघितले तर बर्‍याच जणांना रोजगार मिळू शकतो. एकेकाळी पाळणाघर ही कल्पना ही काहीशी विचित्र वाटायची आज तिच गोष्ट सामान्य वाटते. सुट्टीत मामाच्या गावाला जाणारी मुले आता फारशी दिसत नाहित. दिवाळीच्या सुट्टीतील कँपच्या जाहिराती बरेच काही सांगुन जातात. आजच्या काळात एकत्र रहात रहात असले तरी किती मुलांना आपल्या वृद्ध आईवडिलांसाठी वेळ देता येतो? आमच्या इथे मंदीचा फटका महिलांना बसलाय पण तो अगदी वेगळ्या प्रकारचा. सहसा पुरुष ज्या क्षेत्रात काम करतात, उदा. घरबांधणी, कारखान्यात कामगार वगैरे तिथे मंदीमुळे नोकर कपात. त्यामुळे पुरुष मंडळी बेकार. बायका साधारण शाळा,पाळणाघर,हास्पिटल, डेंटिस्ट किंवा डाक्टरचे इथे कामाला. त्या कमावत्या. या परिस्थितीत इगो दुखावलेल्या जोडीदाराला सांभाळत घर चालवायचे, प्रसंगी त्याच्या रागापासून मुलांना, स्वतःला वाचवायचे, त्यातुन जोडीदाराची व्यसने. पुन्हा काम अशा प्रकारचे की सतत चेहर्‍यावर खोटे हसू वागवावे लागते.
  • Log in or register to post comments

उत्तम प्रतिसाद

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/28/2009 - 21:46 नवीन
स्वाती२ यांचा उत्तम प्रतिसाद. अगदी असेच म्हंतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा