माझीपण आवडती कलाकार आहे मेघना. विशेषतः एक डबिंग आर्टिस्ट म्हणुन. वेगवेगळे आवाज काढण्याची तिची खुबी खरेच जबरदस्त आहे. विशेषतः लहान मुलांचे आणि कार्टुन्सचे आवाज ही तिची खासियतच आहे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी या हरहुन्नरी कलावंताची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
अहो तात्या माहिती नव्हती इतकी मोठी कलाकार तुमची बहिण आहे.अहो ती विनोदी भुमिका अगदी लिलया करते.माझी आजच्या काळातली सर्वात आवडती मराठी कलाकार आहे ती. मस्तच...तुमच्या मुळे निदान तिला कधीतरी भेटता येईल. तिला माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा,
वेताळ
>>१५ ऑगस्ट रोजी साक्षात थोरल्या आबासाहेबांच्या जन्मस्थानी, शिवनेरीवर २०० बालगोपाळांसहीत झेंडावंदन आणि 'भारत माता की जय..' चा जयघोष!
भारत माता की जय !!!
मेघना एरंडेंशी गुजगोष्टी करणारा एक कार्यक्रम (त्यांची मुलाखत) पाहिली होती, त्यांचा आवाज खुप सार्या कार्टुन्सला असतो हेही माहिती होते.
राखीपोर्णिमेच्या पुर्वसंध्येला छान लेख लिहिलात तात्या :)
मेघनाची ओळख मागील वर्षी "हास्यसम्राट" मधुन झाली. त्यांनी गाठलेली उंची खूप आहे तसेच कलेतील एक वेगळा प्रकार "डबींग"- त्या हाताळतात हे कळले. त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा.
मेघना एरंडेला आत्तापर्यंत नुसतेच पडद्यावर पाहिले होते, आता तिच्याबद्दल वाचुन आनंद वाटला.
ती आपल्या नात्यातली आहे हे अजिबात माहित नव्हते, बरे वाटले आता हे कळुन ...
बाकी मेघनाबद्दल ऐकुन होतोच तिच्या डबिंग, विनोदी भुमिका वगैरेबद्दल.
तिला भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा ..!!!
लेख आवडला हे वे.सां. न.ल.
------
छोटा डॉन
बहुदा त्या मला एकदा ई टी व्ही मराठीवर मुलाखतीत दिसलेल्या.
(तेव्हा नाव लक्षात नव्हतं राहिलं. पण त्यांचा परफॉर्मन्स पाहिला/ऐकला होता. )
बहुदा माझ्या आवडत्या "स्मॉल वंडर" ह्या बाल मालिकेतील व्रात्य "हॅरियेट" ह्या पात्राचा आवाज ह्यांचाच आहे, हे पाहुन कौतुक वाटलं होतं.
अप्रतिम हुकुमत आहे ह्यांची आवाजाच्या वापरावर.
बाकी, नेहमीप्रमाणेच ओघवतं व्यक्तीचित्रण आलय तात्या कडुन.
आपलाच,
मनोबा
मेघना एरंडेंची एक मुलाखत पाहिली होती, त्यात त्यांचा अवाज बर्याच कार्टुन्स ला असतो हे कळालेच होते. तात्या पण तुम्ही त्यांची खुप छान ओळख करुन दिलीत
निखिल
================================
मेघना ला शाळेच्या नाटकातून, टीव्हीवर , शिवाजी पार्क मध्ये अनेक वेळा पहिले. पण तिचे एवढे सगळे गुण महित नव्हते. खरच गुणी आहे. तिला खूप खूप शुभेच्छा !!
चकली
http://chakali.blogspot.com
खुपच सुन्दर ओळख करुन दिलीत तुम्ही मेघनाची.अतीशय उत्तम कलाकार आहे ती.दिसते पण सुन्दर ,काम पण चान्गले करते,आणी डबीन्ग तर उत्तमच.
डबीन्गचे अतिशय अवघड काम ती इतक्या लहान वयात इतके सुरेख करते ,तिचे कवतुक करावे तितके कमीच .
मेघनाला मी तिच्या बालपणापासूनच ओळखतोय..एक हरहुन्नरी कलाकार आणि खळाळत्या उत्साहाचं प्रतिक म्हणून. माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक ती ही आहे.
व्यक्तिमत्व ओळख छान करून दिलेय.
अवांतरः आकाशवाणीवर पूर्वी जयंत एरंडे होते...त्यांचे तिचे काही नाते आहे काय?
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
पहिल्यांदा मेघनाने लक्ष वेधलं. त्या सिनेमातल्या हिरॉइनपेक्षा तिच्या मैत्रिणीला लीड रोल द्यायला हवं होतं असं तेव्हा अगदी मनापासून वाटलं होतं. जरा चौकशी केल्यावर समजलं होतं की ती मैत्रीणीचा रोल करणारी म्हणजे 'मेघना एरंडे'.
तिला भेटायला नक्की आवडेल तात्या कारण आवाज, अभिनय वगैरेबद्दल भरपूर गप्पा करता येतील. तिला आवर्जून कळव.
तिचा इथे दिलेला निळ्या साडीतला फोटो तर अप्रतिम :)
वा तात्या!
छानच ओळख करून दिलीत आणि ती पण योग्य वेळेस (रक्षाबंधन पूर्वसंध्या)! अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींची माहीती येथे सर्वांनीच दिली तर मिपातर्फे विद्यार्थी दशेतील नव्या पिढीस नवीन दिशा देणारा एक आगळावेगळा मार्गदर्शक लाभेल.
ऐकलं होतं या गुणी अभिनेत्रीबद्दल. बरीच चांगली माहिती या लेखातून मिळाली. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या ताईंसोबत नाटुकल्यात काम करण्याची संधी मिळाली होती (मी) अकरावीला असताना; पुढे बारावीला गेल्यावर अभ्यासाने माझी वाट लावली ;) I was born intelligent but education ruined me या म्हणीचा प्रत्यय आला. सायन्सच्या विद्यार्थ्यांचे असेच हाल होतात म्हणा! ;)
(विज्ञानी)बेसनलाडू
आजपर्यंत मेघना एक अभिनेत्री म्हणूनच ठाऊक होती.
तिचे व्यक्तिमत्व इतके हरहुन्नरी आहे, हे आजच कळले.
धन्यवाद तात्या!
"Great Power Comes With Great Responsibilities"
मेघनाताईंचे अफलातून करिअर वाचून आनंद झाला... अगदी सर्व अंगांनी अतिशय सुंदर प्रगती आहे. अभिनंदन!
माझा करंटेपणा म्हणा हवे तर पण मला मेघना एरंडे या व्यक्तिविषयी काहीही माहिती नव्हती. तात्याचे माहितीबद्दल आभार.
छायाचित्र जोडल्याबद्दलही तात्याचे आभार. नेहमी पडद्यामागून गोड आवाज पुरविणार्या मेघनाताईंचे हसतमुख दर्शनही लक्षात राहण्यासारखे आहे.
- एकलव्य
>मेघनाताईंचे अफलातून करिअर वाचून आनंद झाला... अगदी सर्व अंगांनी अतिशय सुंदर प्रगती आहे. अभिनंदन!
माझा करंटेपणा म्हणा हवे तर पण मला मेघना एरंडे या व्यक्तिविषयी काहीही माहिती नव्हती. तात्याचे माहितीबद्दल आभार.
छायाचित्र जोडल्याबद्दलही तात्याचे आभार. नेहमी पडद्यामागून गोड आवाज पुरविणार्या मेघनाताईंचे हसतमुख दर्शनही लक्षात राहण्यासारखे आहे.
अगदी हेच म्हणतो.
तात्या,
सगळेच सुंदर, हरहुन्नरी, कर्तृत्ववान लोक तुमचे सक्खे मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण कसे काय असतात हो?
याबाबतीत मला तुमचा फार हेवा वाटतो.
या सद्गुणसुंदरीचा तुम्ही परिचयही अतिशय सुरेख करून दिलेला आहेत.
कायमच आम्ही तिला सचिनच्या 'हॅलो प्रवासी' मधे पाहत आलेलो आहोत. तिचे इतर अनेक गुणही तुम्ही खुबीने समोर आणलेत.
मन:पूर्वक धन्यवाद!
त्या मला दादरला अनेका दिसतात. त्यांची साधी रहाणी, सामान्यांसारखा बस मधून प्रवास,रस्त्यावरच्या वस्तूंची खरेदी पाहून आश्चर्य वाटते.पण मनात त्यांची असामान्यता ठाऊक असते.
त्यांच्या विवाहानंतर त्या बहुदा अमेरिकेत आल्या होत्या. त्यांच्या वरचा एक लेख लोकसत्तेत वाचल्याच आठवतय.
त्यांच्या आई ही अभिनय क्षेत्रातल्या आहेत. टीव्हीवर पाहिले आहे. पण फारशी माहिती नाही.
मीनल.
आजपर्यंत मेघना एक अभिनेत्री म्हणूनच ठाऊक होती.
तिचे व्यक्तिमत्व इतके हरहुन्नरी आहे, हे आजच कळले.
ती कार्टून्चं डबिंग करते हे माहित नव्हतं पण एका विनोदी मराठी कार्यक्रमात तिला पोपायच्या ऑलिव्ह्ची भूमिका करताना पाह्यलं होतं.. वेशभूषा नि आवाज.. यांमुळे ऑलिव्ह जर मराठीत आली तर याहून वेगळी असूच शकणार नाही असं वाटलं होतं....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
सर्व प्रतिसादींचे अनेक आभार...
स्वत: मेघनानेही हा लेख वाचला. तिनेही प्रतिसाद देणार्या सर्व वाचकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सर्वांनी केलेल्या कौतुकामुळे 'आयुष्यात अजूनही काही चांगलं काम करण्याचा हुरूप वाढला आहे, असाच लोभ असू द्यावा' अशी तिची सर्व वाचकांना विनंती आहे..
मुंबै-पुण्याच्या एखाद्या मिपा कट्ट्यावर तिलाही यायला अगदी नक्की आवडेल असं तिनं कळवलं आहे..
हा लेख चांगला झाला आहे असं तिचं म्हणणं असून मराठीतील इतरही काही कलाकरांवर मी असेच लेख लिहावे असं तिचं म्हणणं आहे आणि त्या करता ती मला सर्वतोपरी मदत करणार आहे...
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद...
आपले,
(बहीण-भाऊ)
मेघना एरंडे
तात्या अभ्यंकर.
तात्या, आपले आणि मेघना ताईंचे आभार..
मराठीतील इतर कलाकरांवर लिहीणे होणार असेल तर माझी एक नम्र विनंती आहे.. 'लक्ष्मिकांत बेर्डँ'वर लेख लिहीलात तर आपला आजन्म ॠणी राहीन!
-
(लक्ष्याच्या 'अॅडिशन्स'चा चाहता)
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
आला नव्हता. बरं झालं मागची पानं चाळली ते!
मेघना एरंडे हे नाव ऐकून होतो पण बा़की सर्वच माहिती नवीन आहे.
अतिशय गुणी कलाकाराचा इतका उत्कट परिचय करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! आता ड्ब केलेले आवाज अत्यंत काळजीपूर्वक ऐकले जातील! :)
(निळ्या साडीतला फोटो तर अतिशय सुरेख आलाय!)
चतुरंग
>>अतिशय गुणी कलाकाराचा इतका उत्कट परिचय करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!
असेच म्हणतो !
>>(निळ्या साडीतला फोटो तर अतिशय सुरेख आलाय!)
सहमत आहे, खूप सुंदर दिसत आहे. पुढल्या वेळी भेटाल तेव्हा चतुरंगच्या आणि माझ्या भावना नक्की पोहचवा...! (पुढे ज्याचं त्याचं नशिब) :)
-दिलीप बिरुटे
तात्या गेल्या रैवारी मेघना ताईंचा कार्यक्रम पार्ल्यात पाहिला.
त्या सूत्रसंचलन करीत होत्या. पन त्याना थोडा आग्रह केल्यावर त्यानी डबिंग्ची झलक दाखवली.
\कार्टून्स्चे आवाज त्यानी दाखवलेच पण त्याशिवाय अनेक हिन्दी मराठी अभीनेत्र्यांचे आवाजेसही त्याने हुबेहूब काढून दाखवले
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
मेघनाला नेहमीच पाहिलं होतं मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमात. तिचे कार्यक्रम नेहमीच आवडतात. आवाजावरची तिची हुकुमत कमालीची आहे. तिचा इतका छान परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
तोरण करतानाचा फोटो खूपच सुरेख आलाय. :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
प्रतिक्रिया
अरे वा!!!
सहमत
माझीपण
मेघना व्वा....एकदम बेस्ट ......
भारत माता की जय
मेघनाची
मस्त ...
अरेच्चा! ह्या तर
मेघना
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मेघना
५
ग्रेट मेघना
आवडती कलाकार!
सनई-चौघडे पाहताना
छान ओळख
छान ओळख!
ऐकलं होतं
रुपारेलला असताना
जबरदस्त !!
!
बहिणाबाईंची सुरेख ओळख
सुंदर!
+१
छान
फक्त
छान!
थक्क झालो
या सद्गुणसुंदरीचा अतिशय सुरेख परिचय करून दिलेला आहेत, तात्या!
सद्गुणसुंदरीचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद तात्या.
माझेही मत . .
त्या
आजपर्यंत
मेघना एक
सर्व
ग्रेट
असेच म्हणतो
तात्या, मेघना ताईंचे आभार
मेघना एरन्डे-
छान.
अरेच्या तात्या, हा लेख खूपच मागच्या पानावर गेल्याने वाचनात
अरे, मीही लेख वाचला नाही.
तात्या
मस्त परिचय.