Skip to main content

(मूल)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 03/03/2009 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर उह आह गजबजलेल्या दवाखान्यातली बेभान लगबग अन फत्तरासारख्या काळजातले गोठलेले काहूर होणार मूल होणार मूल असतोच दडलेला काहिंच्या मनात बाजेवर उफाळणारा गुलाबी प्रणयपूर भरपूर भरपूर --लिखाळ. (प्रेरणा-शरदिनी यांची कविता पूल )
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 6093
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

भन्नाट लिखाळबाबू...! मुलाचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ एकदम जोरात...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

ज ह ब र्‍या !! आजकाल मिपा वर फारच 'प्रेरणादायक' कविता यायला लागल्या आहेत. भक्त डुर्राद ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

=D> क्या बात है... तुमच्यात आम्हाला श्री सतिश राव दिसू लागले आहेत =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

खूपच 'उम्फ' आहे या कवितेत. जरा "अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर" या ओळीचा अर्थ सांगाल का? =)) अवांतरः अर्थ नाही सांगितलात तर उत्तम! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

आज जागतीक विडंबन दिन काय? अदिती आणि लिखाळरावनी नारळ तर फोडलाच आहे आता डॉन्या, पिडांकाका, अवलीया, रंगाशेठ, केसु तुमची वाट पहतोय.

काय हे लिखाळभौ, असलं खत्तरनाक लिहतात होय ? वा-र-लो ... कवितेतले मार्मिक शब्द सहन न झाल्याने डॉनराव अभयंकरांनी ती कविता एका कागदावर लिहुन त्याचे विमान केले, त्या विमाअनात बसुन आकाशात झेप घेतली व त्यातुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे उद्या पेप्रात वाचा ... स्वगतः आयला विडंबन करावे की काय ? ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

या हो डानराव मैदानात तुम्हीपण! मग आपण एक कौल टाकू या कोण विडंबनसम्राट आहे म्हणून! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदा सम्राट पदाचा काटेरी मुकुट घातला की मग अवघड होऊन बसते ... आम्ही आपले मध्येआध्ये वाटमारी करणारे पेंढारीच बरे ... प्रयत्न करतो, येईलच इतक्यात ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

डानराव, तो कौलपण आपण कंसातच टाकू या, म्हणजे झालं? ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

तुमच्या विडंबनाचा उगम इतका कण्हत कण्हत अन पुलाखालून झाला असेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती बॉ!! ;) चतुरंग

In reply to by ब्रिटिश टिंग्या

=)) =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अवलिया

>विचार करतोय.... पुढे 'नको नाऽऽऽऽ' असे हवे होते का? एकतर ते मिटर मध्ये बसत नव्हते .. (मिटर - कवितेचा ठेका .. भलतेच अर्थ निघतील नहितर) आणि ते आले असते तर पुढली दोन कडवी आली असती का? असा वेगळा विचार :) -- लिखाळ.

>> नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर कवितेची सुरूवातच एकदम आवडली रे लिखाळ :)