झुलत्या पुलावरचे नि:शब्द उसासे
अन यौवनाच्या पखाली वाहणारे गद्य कणसूर
डुर्र डुर्र
निबिड अरण्यातली बेभान लगबग
अन फत्तराच्या पाझरातले निर्जीव काहूर
डुर्र डुर्र डुर्र
असतोच दडलेला काहींच्या मनात
चिखलात लोळणारा काळाकभिन्न कापूर
डुर्र डुर्र डुर्र डुर्र
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 4:29 pm | कवटी
लैच डुर्र (बेष्ट) झालिय कविता....
जरा ही "चिखलात लोळणारा काळाकभिन्न कापूर" ओळ समजाउन सांगता का?
कवटी
3 Mar 2009 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम 'डुर्र'दार कवीता.
कविता वाचली आणी मन एकदम 'डुर्रावले'.
मनात विविध भावना एकदम 'डुर्राटुन' आल्या.
भक्त डुर्राद
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
3 Mar 2009 - 5:34 pm | कवटी
एकदम 'डुर्र'दार कवीता.
कविता वाचली आणी मन एकदम 'डुर्रावले'.
मनात विविध भावना एकदम 'डुर्राटुन' आल्या.
भक्त डुर्राद
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
कवटी
http://www.misalpav.com/user/765
3 Mar 2009 - 5:43 pm | दशानन
डुर्रडुर्र डुर्र डुर्रडुर्रडुर्रडुर्र डुर्र
डुर्रडुर्रडुर्र डुर्रडुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्र :?
डुर्रडुर्र :D
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
3 Mar 2009 - 6:07 pm | भडकमकर मास्तर
रे कवट्या,
बाकीच्या ओळी सगळ्या कळाल्यासारख्या काय विचारतोय्स?
अवांतर ....
डुर्र डुर्र डुर्र
कशाला लिहिलंय असा प्रश्न पडला...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Mar 2009 - 4:30 pm | ब्रिटिश
डुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
3 Mar 2009 - 5:25 pm | मनीषा
(कवितेचे?) 'रसग्रहण' करावे ...
3 Mar 2009 - 5:29 pm | झेल्या
वळू मधल्या डुरक्याची आठवण झाली आणि पोटात एकदम डुर्र झालं.. :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
3 Mar 2009 - 6:10 pm | विनायक प्रभू
तरी बर
तुला कविता येत नाहीत र विप्र
आल्या असत्या तर
मिपाकरानी म्हटले असते
फुर्र फुर्र
3 Mar 2009 - 6:50 pm | वेताळ
कवितेच्या पहिल्या कडव्यात दोन डुर्र आले आहेत. दुसर्या कडव्यात तीन डुर्र आले आहेत. तिसर्या कडव्यात चार डुर्र आले आहेत्.पुढे डुर्र्,डुर्र्,डुर्र डुर्र डुर्र....
वेताळ
4 Mar 2009 - 1:01 am | सुक्या
डुर्र्,डुर्र् डुर्र्,डुर्र्
रोशेस साराभाई ची आठवण आली . . =))
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
4 Mar 2009 - 1:48 am | भडकमकर मास्तर
कवयित्रीने दिल्लि ६ पाहिल्यानंतर ही कविता लिहिली असावी किंबहुना ही कविता हाच चित्रपटामुळे आलेल्या वैफ़ल्यपीडित भावकल्लोळाचा तेजस्वी हुंकार आहे, असं वाटतंय...
कवितेचे शीर्षक आहे पूल...
हा कोणता पूल?? तर सिनेमा सुरू होताना नायक ज्या ब्रूकलीन पुलावर दिसतो , तो हा पूल....किंवा प्रतीक मानायचे तर संस्कृती जोडणारा पूल.....(अमेरिकन संस्कृती आणि चांदनी चौकातली संस्कृती यांचा आगळावेगळा भावसंकर तर नव्हे ना ?)....
तर नायक त्या सांस्कृतिक भावसंकराच्या टेन्शनमध्ये उसासे टाकतोय.... ( आठवा ते नायकाचे पाठमोरे पोस्टर.. इकडे ती मस्जिद आणि इकडे स्वातंत्र्यदेवता इ.इ.इ. ).... काही लोक गद्यसुद्धा सुरेल बोलतात, कधी गद्यात कमीजास्त झालं की कण्सूर...
...आणि यौवनाच्या पखाली म्हणजे यौवनाच्या पखाली... हाय काय अन नाय काय? शेवटी वय वेडंच अस्तं ना...
आणि डुर्र हा आतला आवाज.... प्रत्येकाच्या आत तो अस्तोच ...
आता प्रतीकांचा खुबीने वापर बघा....
गोष्ट जशी पुढे जाते तसे अरण्य घनदाट...नायक भारतात... लोकसंख्या प्रचंड...म्हणून व्यक्तिरेखांचा सुळसुळाट... त्या सर्व व्यक्तिरेखांची ती ही लगबग... बेभान....
पण या सार्या व्यक्तिरेखा फ़त्तरदिल, पण योग्य वेळी स्वतःला पाझर फ़ोडणार्या इ.इ.इ ( बघा त्यांची याच्या आजीला मदत करतानाची पाझरफोड मदत) .....आणि नंतर काला बंदर काला बंदर असे उठलेले काहूर.....तेही सजीव नाही बरं.... निर्जीव एकदम डेड...कारण हे काहूर खोटं आहे.... बनावट आहे...
मग डुर्र हा आतला आवाज ... वाढतोय.... वाढतोय....
कशाचा बरं आवाज हा?
हर एक के मन में एक काला बंदर होता है | हे झालं सिनेमातलं वाक्य...
पण कवयित्रीला ते मान्य नाही... तिला बंदर च्या जागी एक वराह दिसतो.... होय तोच.... काळाकाळा , आपापली पिले घेऊन चिखलात लोळणारा संसारमग्न वराह..... पण ती त्याला उपमा देते कापराची..... म्हणजे आपले मन कितीही शुद्ध पांढरे भासले तरी, ते चिखलात लोळले की त्याचा वराहच होणार....
.... शेवटी आसमंत व्यापून चराचरात भरून राहिलेला तोच आवाज .... प्रत्येकाच्या आतल्या वराहाचा ...
डुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्र
__________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
4 Mar 2009 - 2:01 am | बिपिन कार्यकर्ते
मी खरंच हे वाचतोय की झोप आली आहे मला? :(
=))
मास्तर काय लिहिलंय हो हे.... ठार झालो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
4 Mar 2009 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मास्तर, तुमच्या पायांचा फोटो फोटोशॉप न करता पाठवून द्या. रोज सकाळी पाय ओढेन :p धरेन म्हणत्ये.
=))
रंगरावांनी काल गणपतीच्या केलेल्या आरतीमुळे (मास्तरांसकट) सर्वांना सुबुद्धी आलेली दिसत आहे. =)) =)) =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
4 Mar 2009 - 1:02 pm | मेघना भुस्कुटे
वैफ़ल्यपीडित भावकल्लोळाचा तेजस्वी हुंकार
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
अगायायायाया....
काय हो हे मास्तर?
मास्तर, सध्या काय खाता काय आहात? अभिनिवेशाचा भावणारा अभाव काय, भावकल्लोळाचा हुंकार काय...
बाकी विडंबनाच्या मैदानात तुम्हीसुद्धा उतरलात?
प्राजूतै, आता बोल. आणखी एक विडंबन!
4 Mar 2009 - 1:06 pm | सहज
एक कॉपी इकडे येउ दे पायाची.
हुच्च रसग्रहण!
4 Mar 2009 - 4:12 pm | लिखाळ
मास्तर,
रसग्रहण भारीच आहे. हे रसग्रहण वाचून एकदम मला माझ्या भेसूर रात्रीची आठवण झाली :)
वैफल्यपीडित भावकल्लोळाचा समिक्षिकी हुंकार आवडला :)
शरदिनी,
तुमच्या रचनेवरुन मला सुद्धा काही लिहावेसे वाटले.
-- लिखाळ.
4 Mar 2009 - 10:44 am | विसोबा खेचर
शरदिनी, तुझ्या काव्यप्रतिभेला प्रणाम गं बाई..! :)
तात्या.
4 Mar 2009 - 11:06 am | ऋचा
इतकी "डुर्रेदार" कवीता!!!!! @)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
15 May 2009 - 6:36 am | Nile
वा! सुंदर!!! मी ही डुरकलो!!!
4 Dec 2015 - 2:45 pm | प्रमोद देर्देकर
वा मास्तर रसग्रहण असावं ते असे. र्डु र र्डु र
4 Dec 2015 - 2:48 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
आपलं ते हे ठ्ठुर्र =)) =))