✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

संकल्प मत्स्यपुराणाचा

स
सुनील यांनी
Tue, 02/17/2009 - 19:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11121 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

परमेश्वरा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/17/2009 - 19:40 नवीन
परमेश्वराच्या पहिल्या अवताराच्या कृपेने मत्स्यपुराण लिहिण्यासाठी आपणांस लवकरात लवकर वेळ लाभो. (शाकाहारी) अदिती
  • Log in or register to post comments

असेच

लिखाळ
Tue, 02/17/2009 - 19:43 नवीन
असेच म्हणतो :) फोटोंमध्ये मासे हातात धरुन उभी कोळीण असली तर आमची हरकत नाही हो !:) -- (पूर्वीचा मत्स्याहारी) लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद

सहज
Tue, 02/17/2009 - 19:42 नवीन
वाचनखुण साठवली आहे. लवकरात लवकर कोष्टक पुर्ण करावे.
  • Log in or register to post comments

परदेशी (भारतात सहसा न मिळणारे) मासे

प्रदीप
Tue, 02/17/2009 - 19:43 नवीन
अजून काही नावे: हॅडॉक ग्रूपर रेड स्नॅपर व्हाईट स्नॅपर स्वॉर्ड फिश हेरिंग ('मसल्स' ला मराठी नाव काय? आणि तो भारतात मिळत असावा?) आणि मोरी म्हणजे कॉड नव्हे का?
  • Log in or register to post comments

सामन आणि कॅट फिश

संदीप चित्रे
Tue, 02/17/2009 - 20:02 नवीन
हे मासे राहिले की .... सामन (स्पेलिंगप्रमाणे उच्चार साल्मन !) ----- 'मोरी' म्हणजे कॉड नाही. माझ्या माहितीप्रमाणे 'मोरी' मासा म्हणजे 'शार्क'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

('मसल्स' ला मराठी नाव काय?

नूतन सावंत
Wed, 09/11/2019 - 22:55 नवीन
('मसल्स' ला मराठी नाव काय? आणि तो भारतात मिळत असावा?) शिनाया मोरी म्हमजे शार्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

लॉब्स्टर

सागर
Tue, 02/17/2009 - 21:12 नवीन
लॉब्स्टरला मराठीत काय म्हणतात माहित नाही... पण चवदार सी-फूड मधे लॉब्स्टर मला आवडतो (मत्स्यप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments

लॉबस्टरला

घाटावरचे भट
Wed, 02/18/2009 - 06:24 नवीन
लॉबस्टरला शेवंड म्हणतात बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

धन्यवाद

सागर
Wed, 02/18/2009 - 12:56 नवीन
धन्यवाद भटोबा :) आणि वाचकबुवांना ही.... आता लॉब्स्टर (चुकलं ... आपलं शेवंड) मराठीतून मागून खाता येईन... हा हा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

लॉबस्टर म्हणजे 'शेवंड'

वाचक
Tue, 02/17/2009 - 21:41 नवीन
बाकी उत्तम धागा :)
  • Log in or register to post comments

ट्यूना?

नाटक्या
Tue, 02/17/2009 - 21:45 नवीन
ट्यूना फिश राहीला की? अमेरिकेत तर त्याचा वापर बर्‍याच पाककृतींमध्ये करतात. टुना सलाड्/सँडविच ... - नाटक्या
  • Log in or register to post comments

फोटो (फोटो

विसोबा खेचर
Tue, 02/17/2009 - 22:27 नवीन
फोटो (फोटो माशांचे हवेत, कोळीणींचे नव्हे!). हे बाकी मस्त! :) आपला, (साधना कोळणीचा लाडका!) तात्या. आयला सुन्या, आजच काही कामानिमित्त वांद्र्याला गेलो होतो. तिथून हायवेच्या जवळच असलेल्या 'हाय वे गोमांतक'मध्ये पोटभर जेवलो. आत्ता तेथूनच येतो आहे. तुझ्या यादीत जवळा हे नाव वाचलं. आज मी पण जवळा खाल्ला रे! हा बघ फोटू.. (चांगली थाळी समोर आली की मोबाईलवर फोटू काढून ठेवायची आमची सवय!) :) Image removed. पापलेटचं कालवण, कांद्यामिरचीवर परतलेला जवळा अन् बोंबिल! :) आपला, तात्या तांडेल.
  • Log in or register to post comments

त्रास आहे

संदीप चित्रे
Wed, 02/18/2009 - 22:36 नवीन
तात्या !!! त्रास आहे रे ही थाळी म्हणजे .... तोंडाला पाणी सुटलं ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तारली

प्रभाकर पेठकर
Tue, 02/17/2009 - 22:35 नवीन
तारली (सार्डिन) पेडव्यांना सार्डीन म्हणत नसावेत. (काय म्हणतात माहित नाही.) हलवा (ब्लॅक पाँफ्रेट) काही राहिलेले मासे: पाकड (काईट फिश) टोके (डोक्याकडे चोचीसारखा भाग असणारे) मोदकं भिंगी डोमा दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

अजून एक..

विसोबा खेचर
Tue, 02/17/2009 - 22:42 नवीन
गोब्रा मासा! हा मासा म्हणजे स्थूल, अति लठ्ठ पापलेटाचाच एक प्रकार. मुंबैत क्वचितच मिळतो, खूप महाग असतो.. आपला, (स्थूल) तात्या.
  • Log in or register to post comments

गोब्रा ...गैरसमज

chipatakhdumdum
Tue, 02/17/2009 - 23:19 नवीन
गोब्रा आणि पापलेटचा काहीही सम्बध नाही. पापलेट गोब्र्यापेक्षा खूप महाग असत. गोब्रा सिन्धुदूर्ग जिल्ह्यासमोरच्या समुद्रात मिळतो. एकदम स्वस्त असतो आणि जरा बोयट्यासारखा गोडा असल्याने मुम्बै पर्यन्त बर्फातून टिकत नाही. ( आता तात्या विचारणार.. बोयटा हा मासा कुठला.. तर सिन्धुदूर्गात खाडीच्या तोन्डावर ज्या लहान आकाराच्या गुन्जल्या मिळतात, त्याना बोयटे म्हणतात. बोयट्याच तिखल ...वा वा वा वा..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

गोड्या पाण्यातील मासे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/17/2009 - 22:52 नवीन
वामट मर्‍हळ चोपडा मासा ( गंगावरी)
  • Log in or register to post comments

अजुन काही मासे

लवंगी
Wed, 02/18/2009 - 05:42 नवीन
भारतातले मासे.. निवटि बोय मोदकं करंदि शिंगाळे ( हा आमच्या गावी मिळतो.. मुंबईला कधी पाहिला नाहि.. याच्या तोंडावर मोठे शिंग असते) अमेरीकेतले मासे क्वाड बटर फिश ( पापलेटचा भाऊ )
  • Log in or register to post comments

मत्स्य पुराण

हरकाम्या
Wed, 02/18/2009 - 00:18 नवीन
तुझे पुराण लवकरच पूर्ण होवो ही परमेश्वराच्या प्रथम अवताराकडे प्रार्थना .
  • Log in or register to post comments

क्याट् फिश् आणि क्यालामारी

बेसनलाडू
Wed, 02/18/2009 - 00:22 नवीन
परदेशात (अमेरिकेत) मिळणारे, भारतात सहजासहजी न मिळणारे मासे (परदेशस्थ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

स्क्वीड चा प्रकार

पक्या
Wed, 02/18/2009 - 02:37 नवीन
क्यालामारी हा स्क्वीड चा प्रकार आहे . मासा नाहीये तो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हो पण ...

बेसनलाडू
Wed, 02/18/2009 - 04:36 नवीन
मला वाटते येथे सी फूड / समुद्री खाद्य हा व्यापक विषय चालू आहे. क्यालामारी मासा नाही, माखली आहे; कोळंबी/झिंगे, खेकडे वगैरे सुद्धा मासे नाहीतच ना? की आहेत? (चिकित्सक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

क्यालामारी

पक्या
गुरुवार, 02/19/2009 - 06:39 नवीन
>>क्याट् फिश् आणि क्यालामारी - परदेशात (अमेरिकेत) मिळणारे, भारतात सहजासहजी न मिळणारे मासे असं तुम्ही लिहिल्याने मी लिहीले कि क्यालामारी मासा नाहीये. ज्यांना क्यालामारीबद्द्ल माहीत नाही त्यांना तो मासाच आहे असे वाटू नये एवढाच हेतू. तुम्ही प्रतिसाद नीट वाचला नाही बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

स्वोर्डफी

पक्या
Wed, 02/18/2009 - 02:36 नवीन
स्वोर्डफीश माहीमाही (mahi mahi) (भारतात मिळत नसावा बहुतेक किंवा मिळत असल्यास भारतीय नाव माहीत नाही.) इतर खाल्ले जाणारे सीफूड म्हणजे स्कॅलॉप , स्क्विड , ऑइस्टर , ऑक्टोपस कॅव्हिअर (caviar) तर सीफूडमधलं डेलीकसी समजलं जातं.
  • Log in or register to post comments

माहीमाही

लवंगी
Wed, 02/18/2009 - 05:36 नवीन
म्हणजे डॉल्फिन मला वाटते. म्हणूनच कधी खावासा नाही वाटला. इथल्या माश्यामध्ये सि-बास विसरले होते.. खूपच चविष्ट मासा आहे. सार्डिन पण छान लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

>>माहीमाही

पक्या
गुरुवार, 02/19/2009 - 14:44 नवीन
>>माहीमाही म्हणजे डॉल्फिन मला वाटते. म्हणूनच कधी खावासा नाही वाटला. डॉल्फिन नसावा. डॉल्फिन पण खाल्ला जातो हे कधी ऐकले नाही अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

पूर्व आशियातले मासे

विंजिनेर
Wed, 02/18/2009 - 04:53 नवीन
१. ब्लो-फिश (जपानी मधे "फुगु"/कोरियन मधे "बोगु") - हा विषारी असतो(अगदी प्राणघातक) पण कुशल सुशी-गुरूच्या हाती ह्याचे अलगद काढलेले पातळ/पारदर्शक तुकडे जिभेला चरचरवून(किंचित असलेल्या विषामुळे) जातात. सजावटसुद्धा भान हरपवणारी असते. हा मासा हाताळायला परवाना लागतो. तो परवाना मिळवण्यासाठी गुरुच्या हाताखाली सरासरी २-३ वर्षे उमेदवारी करणे जरूरीचे असते. उमेदवारीचे सुरवातीचे काही महिने मासा फक्त पाण्यात स्वच्छ धुवावा कसा यात जातात. मग यथावकाश त्याचे कलात्मक काप करावे कसे, त्यातला विषारी भाग काढावा कसा यात जातात. सर्वात शेवटी परिक्षा म्हणून स्वतः कापलेला आणि विषारी भाग काढलेला असा मासा स्वतःलाच खावून दाखवावा लागतो! (३०% परीक्षार्थी उत्तीर्ण होतात :)). उपहारगृहातला सुशी/साशीमीचा मुख्य हा एकूणच अतिशय आदराच्या स्थानी असतो. त्यात फुगु माशाच्या साशीमीचा गुरु तर अजून वरचा!! आपण तेथे गेल्यावर पहिल्यांदा त्याला रामराम घालयाचा. त्याच्या बरोबर घोटघोट बियर नाहीतर साके (तांदूळापासून बनविलेली दारू) घ्यायची. मग त्यालाच विचारयचे "काय बाबा, आज काय खाऊ?" तो तुमच्या साधारण आवडी निवडी, त्यादिवशीचा "बाजार", दिवसाची वेळ ह्याचा अंदाज घेउन स्वतः ठरवतो की कुठली सुशी/साशिमी सयुक्तिक. मग धीरे धीरे एकेका सुशीचा आनंद घेत चवीने २-३ तास जेवण चालते(सुशीचे जेवण जर पटकन उरकले तर सुशी-गुरूचा तो अपमान होतो :)). एकूण काय, सुशी आणि साशीमी हा प्रकार भारतीय संगीताच्या फार जवळ जातो. त्यासाठी करावी लागणारी दीर्घ उमेदवारी, ख्याल गायकी ढंगाने जाणारे ते जेवण, पंचेद्रियांना सुखवणारी ती सजावट, माशाची चव, तुमच्या एखाद्या जवळच्या सहचर्‍या/मित्रा/मैत्रिणीबरोबर बरोबर निवांत गप्पा मारत आणि जोडीला उत्तम दर्जाची साके/वारूणी यांचा आस्वाद घेत ते केलेले जेवण ..अहाहा... स्वर्ग याहून वेगळा नसतो! (सौजन्यः अनुभव स्वतःचे + काही मजकूर विकीपीडीयातला) छायाचित्र सौजन्यः गुगल सेवा Image removed. २. यलो-क्रोकर(गुलबी/चिम-जोगी) - हा पापलेट सारखाच श्वेतमांसाचा मासा पण अजून चविष्ट. कोरियात हा उत्तम दर्जाचा आणि महागडा मासा "चुसक" (आपल्या दिवाळी सारखा सुगी नंतर येणारा सण)च्या वेळी भेट देतात (तळहाताएव्हढ्या आकाराच्या ७ माशांची किंमत असते ३,५०० रु. फक्त!!) समुद्र काठच्या खार्‍या थंड आणि दमट हवेत तो काही महिने "वाळवतात" त्याची खुमारी अजूनच वाढते(त्याचे सूप खल्लास लागते पण त्याची पाकृ. पुन्हा कधीतरी). परवाच मी तो आणला (नशीब जोरावर होते म्हणून स्वस्त मिळाला !!) छायाचित्र सौजन्यः स्वतः Image removed.
  • Log in or register to post comments

व्वा

सुनील
Wed, 02/18/2009 - 09:00 नवीन
हां हां म्हणता बराच विदा गोळा झाला. आता याचे संकलन, पृथःकरण, वर्गिकरण आदि करून संकल्पित कोष्टकाचा पहिला रकाना (माशांची नावे) पूर्ण करण्याचे काम लवकरच सुरू करतो. राहिला प्रश्न कोष्टकातील दुसरा रकाना (फोटो) आणि तिसरा रकाना (पाकृ) यांचा. फोटोचा मूळ हेतू हा नवागताला बाजारात मासे ओळखणे सोपे जावे हा असल्यामुळे, फोटो हे कच्च्या माशांचे हवेत. पाकृंबद्द्ल - सविस्तर पाकृ स्वतंत्रपणे द्याव्यात. येथे फक्त त्यांची नावे (आणि दुवे) संकलित करण्याचा विचार आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

लवकर करा

संदीप चित्रे
Wed, 02/18/2009 - 22:41 नवीन
ही विनंती ....वाट बघतोय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अजुन काही मासे

जागु
Fri, 02/20/2009 - 11:56 नवीन
खार्‍या पाण्यातील घोळ बोईट बिळज शार्क (मुशी) ढोमा निवटे बला वाकटी कालेट कडकड्या हेकरु खरबी कांटा शिवल्या खुबे खुबड्या कालव पालकं कोलिम गोड्या पाण्यातिल चिवणे अजुन आठवुन सांगते. तुम्हाला मत्स्यपुराण लिहण्यासाठी शुभेच्छा. अजुन काही मला माहीती हवी असल्या मला देण्यासारखी असली तर नक्की देईन. अजुन आठवले राणी मासा - हा गुलाबी रंगाचा असतो. पिळसा - हा सापासारखा असतो. भाकस - हा एका पुढे साधारण माशासारखा असुन ह्याची पाठ काळपट आणि चपटी असते.
  • Log in or register to post comments

मत्स्य प्रेमी

नरेन
Wed, 02/18/2009 - 14:45 नवीन
गोड्या पाण्यातील अजून एक चवदार मासा खदरा काटे कमी असतात नदी मध्ये मिळतो. एकदम चविश्ट.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा