लेखनचोर्य (कृपया ह्यावर नवीन कॉमेंट्स नकोत -कोतवालांनी क्षमा मागितली आहे)

केदार's picture
केदार in काथ्याकूट
30 Jan 2009 - 9:35 pm
गाभा: 

हल्लीच आम्ही येथील सदस्य घाशीराम कोतवाल ह्यांचा जाणता राजा ब्लॉग वर गेलो. त्याची लिंक मला http://misalpav.com/node/5805 इथे मिळाली.

आणी अहो आश्चर्यम. शिवाजी महाराजांवर मी मायबोली दिवाळी अंक २००८ मध्ये लिहीलेल्या शिवाजी महाराजाच्यां लेखाला "शिवाजी महाराजांची राज्य व सैन्यव्यवस्थ"" त्यांनी आपल्या स्वतःच्या ब्लॉग प्रसिध्दी दिली व लेखक म्हणूण स्वतचे नाव दिले. मूळ लेख आपण इथे पाहून शकता. http://vishesh.maayboli.com/node/46

तसेच इथेही. http://shailu010.blogspot.com/2009/01/blog-post_23.html हा घाशीराम रावांचा ब्लॉग आहे. माझ्या लेखातल्या शेवटच्या ओळीवरुन त्यांनी जाणता राजा हे नाव दिले वाटतं ब्लॉग ला.

घाशीराम राव इतिहास लेखन हे कथा पाडन्या सारखे सोपे नसते. आपण तिथे माझे नाव मूळ लेखक म्हणून दिले असते तर मला काही वाटले नसते. पण तुम्ही लै भारी. माझे लेखन स्वतचे म्हणून खपविले. चोरी आज नाही तर उद्या उघडकीला येते साहेब. बाकीचे लेखही असेच चोरलेले आहेत का?

संपादक हा विषय गहण आहे. डीलीट करु नये. ह्या विषयला धरुन ह्या वृत्तीवर काथ्याकुट व्हावा.

आणि घाशीरामराव इतिहास विषय जरा सावधाणपुर्वकच हाताळा. लोक त्यावरुन आपले मत बनवत असतात.

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

30 Jan 2009 - 9:52 pm | संदीप चित्रे

जेव्हा मायबोलीवर प्रसिद्ध झाला होता तेव्हाच मी तो वाचला होता.
इतिहासाबद्दल केदार अभ्यासपूर्ण लेख लिहितो. विशेष म्हणजे तो ऐतिहासिक कादंबरीतल्या उल्लेखांना इतिहास मानायची चूक करत नाही :)
बाकी मी कोतवालांचा ब्लॉग पाहिला नाहीये पण 'लेखन चौर्य' या प्रकाराचाच जाहीर निषेध !!
मागे एकदा 'मिल्या'चे 'रेशमियाच्या गाण्यांनी...' हे विडंबन दुसर्‍याच कुणीतरी आपल्या नावावर टाकले होते तेव्हा मी ते त्या व्यक्तीच्या आणि 'मिल्या'च्या निदर्शनास आणून दिले होते.
-----------
आंतर जालावर लिहिणार्‍यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की आपण जर काही चोरले असेल तर (चोरणे सोपे असले तरी) कुठे ना कुठे चोरी सापडतेच.
त्या पेक्षा एकतर 'स्वतःचे' काहीतरी लिहावे किंवा दुसर्‍याचे आवडले तर ज्याचे श्रेय त्याला द्यावे :)
-----------

कोलबेर's picture

30 Jan 2009 - 9:55 pm | कोलबेर

सहमत आहे! अश्या सदस्यांचे आयडी उडवुन आयपी ब्लॉक करण्यात यावेत.

सखाराम_गटणे™'s picture

30 Jan 2009 - 10:02 pm | सखाराम_गटणे™

सहमत आहे! अश्या सदस्यांचे आयडी उडवुन आयपी ब्लॉक करण्यात यावेत.
पहीली वेळ असेल तर समज देण्यात यावी,

संदीप चित्रे's picture

30 Jan 2009 - 9:57 pm | संदीप चित्रे

आत्ताच पाहिला....
केदारचा लेख, त्याच्या नावाने प्रसिद्ध न केल्याचा, पुन्हा एकदा निषेध !!

वासुनाना आले's picture

31 Jan 2009 - 12:48 pm | वासुनाना आले

http://shailu010.blogspot.com/
आता त्याचा ब्लोग पाहिला त्यानी त्यात निवेदन दिले आहे या चुका पुन्हा होनार नाहित म्हनुन

नीधप's picture

31 Jan 2009 - 1:08 pm | नीधप

विनोद!!
चोरी एकदा नव्हे तर चार वेळा पकडली गेली तरी ह्या व्यक्तीने चोरी करणे सोडले नव्हते. आणि आता अचानक उपरती झाली?
मानभावीपणाने असे करणार नाही म्हणतोय. चूक नव्हे हो गुन्हा आहे हा. लेखनचौर्य हा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ढ's picture

31 Jan 2009 - 1:19 pm |

आणि विसोबा खेचर म्हणतात त्याप्रमाणे खुलासा येथे हवा.

त्या कोणशाश्या ब्लॉगवर नव्हे.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2009 - 1:21 pm | बिपिन कार्यकर्ते

ही माफी इथे पण मागायला काय हरकत आहे?

बिपिन कार्यकर्ते

नीधप's picture

31 Jan 2009 - 1:29 pm | नीधप

इथेच मागायला हवी माफी.
आणि त्या ब्लॉगवर कुठे निवेदन दिसले नाही बरंका.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ढ's picture

31 Jan 2009 - 1:39 pm |

बिपिनजी,

आत्ता कळलं बघा!!!
जाऊद्या. नाव राखलं आम्ही म्हणा ना!!!

दशानन's picture

31 Jan 2009 - 1:32 pm | दशानन

पण तुम्ही कोण बॉ :?

कोतवालाचे वकील का ?

त्यांना येऊ द्या ... माफी मागू द्या ना येथे ?


* हल्ला बोल ग्रुप च्या सदस्यांना विनंती !
सर्वांनी कमीत कमी १० खरडी ( शुभेच्छा द्या) कोतवाल साहेबांना लिहाच ते दिसले की ऑनलाइन व जो पाच व्यनी पाठवेल तो तर गुरुच ;)
सोडणे नाही हल्ला बोल !!!!!!!!!

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

घाशीराम कोतवाल १.२'s picture

31 Jan 2009 - 2:54 pm | घाशीराम कोतवाल १.२

खर म्हन्जे तो जो लेख होत तो मला ओर्कुत वर भेटला होता राजे मल त्या लेखाचे खरे लेखक महित नव्हते

ह्याची लिन्क मी देइन आणी प्रताप राव गुजराचा सुधा लेख ओर्कुत वर आहे साहेब

घाशीराम कोतवाल १.२'s picture

31 Jan 2009 - 2:36 pm | घाशीराम कोतवाल १.२

http://shailu010.blogspot.com

नम्र निवेदन हां ब्लॉग महाराजाविश्यी माहिती देण्या करीता सुरु केला आहे यात जसे लेख असतील त्या लेखकांची नावे देण्यात येतील जर इथून मागे काही चुका जाल्या असतील त्या पुन्हा होणार नाहित याची नोंद घ्यावी

दशानन's picture

31 Jan 2009 - 2:39 pm | दशानन

माहीती देणे म्हणजे दुस-याचे लेखन आपल्या नावावर खपणे नाही ना ?

मग !

तुम्ही ते लेखन नष्ट करा हेच म्हणणे !

शिवाजी महाराज खुप मोठा विषय आहे त्यांच्या वर किती ही लिहले गेले तर ते कमीच त्यामुळे.. लिहा ! पण स्वतःचे विचार लिहा.. !

कॉपी पेस्ट चांगलं असतं पण स्वतः लेखन !

बाकी मी काय सल्ला देऊ तुम्हाला !

तु हुशार तुम्हाला कळाले असेलच मिपावर कॉपी पेस्ट पॉलीसीचा कसा धुव्वा उडतो ते !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

नीधप's picture

31 Jan 2009 - 4:31 pm | नीधप

निव्वळ कोलांट्याउड्या.
दिसलं बरं लेखन की ढाप आणि आपलं म्हणून छाप.
ऑर्कुट वर नाहीतर अजून कुठेही सापडेल तुला. पण तुझं नाहीये हे तरी कळत होतं की नाही तुला?
का तेही केदार ने सांगितल्यावर कळलं? तोवर ते लिखाण आपलंच समजत होतास की काय तू?
आणि बाकीच्या लेखांचं काय?
आजवर इतरही बर्‍याच ठिकाणी असं रंगेहाथ पकडलंय तुला.. त्यावर काय उत्तर आहे तुझं?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2009 - 9:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखनचौर्याचा निषेध.

मी बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेत नाही, पण कुणाचं काही वाक्य, परिच्छेद, विचार उचलला तर श्रेयही देते.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2009 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनचौर्याचा निषेध.

कुणाचं काही वाक्य, परिच्छेद, विचार उचलला तर श्रेयही देते.

आम्हीही संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना संदर्भ देण्याबद्दल सतत आग्रह धरतो. लेखनात आवश्यक तिथे पूर्वसुरींच्या मतांचे उल्लेख केलेच पाहिजेत, याचे आम्ही समर्थन करतो !

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंकरराव's picture

31 Jan 2009 - 3:10 am | शंकरराव

सहमत आहे

कलंत्री's picture

30 Jan 2009 - 9:59 pm | कलंत्री

पूर्वी एखादा गुरु केल्यावर त्याचा गंडा ( माळ असे काहिसे असावे) घालावे लागे. अमूक अमूक गुरुचा मी गंडा घातला आहे असे अभिमानाने सांगितले जाई. कोणी कधी कोणाला फसविले तर गंडा घातला असाही शब्दप्रयोग होत असे.

गंडा या शब्दाचा उलगडा आज झाला. आता आपण असे जे कोणी कृत्य करीत आहे ते माझे शिष्यच आहे असे सांगुन त्यांना गंडा घालावा.

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jan 2009 - 10:22 pm | अविनाशकुलकर्णी

ह्या वर एव्हडा ओरडा करायच काय कारण??? इथे रोज वेब साइट हॅक करु चोरल्या जातात..सॉफवेर क्राक करुन विकले जातात...आणि लेख चोरला तर तु काय करु शकतोस? कोर्टात जाउ शकतोस फार फार तर... कोर्टात १० कोटी केसेस पेंडिंग आहेत न्यायाच्या प्रितिक्षेत....माझ्याहि कविता चोरल्या गेल्या... ओरडलो गळा बसला..शेवटी विक्स झिंझर खाल्ली तेंव्हा... आणि आपन जे विंडो सॉफ्ट्वेर लोड केले आहे ते तरी विकत घेतलेल आहे का? कि पायरेटेट आहे? बाकि हे करा ते करा ह्या नुसत्या गप्पा आहेत...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2009 - 10:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणून काय चोरीचे समर्थन करावे का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2009 - 10:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण मिपाचं धोरण वाचलं आहेत का? नसेल तर हे घ्या, वाचा:
http://www.misalpav.com/node/1196

माझ्या संगणकावरचं विण्डोज विकत घेतलेलं आहे (विण्डोजशिवाय आला नाही ना संगणक); आणि मी नेहेमीच लिनक्स वापरते, आणि बाकीची फुकटात उपलब्ध असलेली सॉफ्टवअर्स! आता आपली परवानगी असेल तर पुन्हा एकदा निषेध व्यक्त करावा म्हणते! चालेल ना?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

केदार's picture

30 Jan 2009 - 10:33 pm | केदार

साईट हॅक होणे आणि चोरी होणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अविनाशराव.

मी आरडा ओरडा करत नाहीये. मी वर लिहीले आहे की मुळ लेखात माझे नाव दिले असते तर मला काही वाटले नसते. येथील वाचकांना निदान कळेल की कोणी घाशीराम राव कुठले लेख कुठे खपवतात. चोरी ती चोरीच.

विंडो सॉफ्ट्वेर लोड केले आहे ते तरी विकत घेतलेल आहे का? >> स्वतः वरुन दुसर्‍याची पारख करायला आपण सर्व तांदूळ नाही आहोत. माझ्याकडे असनारे सर्व लॅपटॉप विकत घेतले आहेत, चोरलेले नाही. :) म्हणून विंडोज पण विकत घेतलेले आहे. प्रि लोड म्हणा हवं तर.

बाकि हे करा ते करा ह्या नुसत्या गप्पा आहेत. >> गप्पा मारणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे कारण मला बोलता येते. :) तो मी गमावनार नाही.

लिखाळ's picture

30 Jan 2009 - 10:55 pm | लिखाळ

लेखनचौर्‍याचा निषेध.
-- लिखाळ.

प्राजु's picture

30 Jan 2009 - 11:05 pm | प्राजु

लेखनचौर्याचा निषेध...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jan 2009 - 11:07 pm | अविनाशकुलकर्णी

मी समर्थन करीत नाहि..पण आपण निषेधा पलिकडे काहि करु शकतो का??..मी साहित्य चोरीचा निषेधच करतो

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jan 2009 - 11:11 pm | अविनाशकुलकर्णी

गप्पा मारणे हा माझाहि जन्मसिध्द हक्क आहे ...व मी गप्पा मारणारच..आपल्या नावाचा उल्लेख करायलच हवा होता..सहमत..भावना पोहोच्ल्या..........गप्पिश्ठ

कोलबेर's picture

30 Jan 2009 - 11:25 pm | कोलबेर

च्यायला, हा घाशीराम कोतवाल कोणी संपादकांपैकी आहे का?

त्याची चोरी सापडल्यावर लगेच सगळा धागाच अप्रकाशित करुन त्यावर पांघरुण घालण्यात आले म्हणून एक शंका डोकावली!

छोटा डॉन's picture

30 Jan 2009 - 11:33 pm | छोटा डॉन

=)) =))
धन्य आहात आपण गुरुदेव ...!
_/\_

बाकी आम्हीसुद्धा लेखनचौर्याचा व त्याचे "समर्थन" करण्याचा निषेध करतो.
आता एकदाच त्या "प्रवॄत्तीला" धडा शिकवला की पुन्हा असे प्रकार होणार नाहीत अशी आशा वाटते.

------
छोटा डॉन

निदान मी तरी नक्कीच नाही! ;)
मूळ धागा संपादित करताना अप्रकाशित ठेवा असा टॅब सिलेक्ट केला गेला त्यामुळे लेखन दिसेनासे झाले होते!

चतुरंग

टारझन's picture

30 Jan 2009 - 11:30 pm | टारझन

ह्म्म्म.. .आमचा प्रतिसाद .. आणि त्यावरील केदार साहेबांचं सौम्य उत्तर .. आम्ही वाचलं बरं का संपादक मोहोदय ..
असो .. तुमच्या णिर्णयाचा माण ठिवतो .. पण ह्या धाग्याचा मोटीव्ह मला काही पटलेला णाही ...
मायबोलीवरची बोंबाबोंब इकडे णको इतकेच म्हणतो ... आता घाशीराम इकडे आहेत हा कोणाचा दोष आहे ?

- वाकड्यात शिरणारा) टारझन

नीधप's picture

31 Jan 2009 - 12:04 am | नीधप

मायबोलीचं नाव आलं म्हणून इतका त्रास का होतोय?
घाशीराम कोतवाल हा आयडी चोर आहे हे तर खरं आहे ना?
मग मूळ लिखाण कुठे प्रसिद्ध झालं ते सांगितलं तर इतकी का चिडचिड?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

यशोधरा's picture

31 Jan 2009 - 12:08 am | यशोधरा

अगदी सहमत अज्जुका! लेख मायबोलीवर किंवा कुठे प्रकाशित झालाय हा मुद्दा नसून लेखाची चोरी झाली वा केली गेली हा मुद्दा आहे! मूळ मुद्दा बाजूलाच रहतोय!

तळवे झिजलेली" चप्पल कोणी तरी चोरून नेली

करेक्ट..
त्या तळवे झिजलेल्या चपलेचा चोर तुला इथे दिसला तर तू सांगायलाच पाहिजेस ना की हा चप्पलचोर इथे घुसला आहे...
लोक आपापल्या चपला सांभाळतील, निदान चपलांवर लक्ष ठेवतील, चोरावर लक्ष ठेवतील...
....
त्यात असं म्हणून कसं चालेल की साइमंदिराचा उल्लेख इथे नको म्हणून्...चप्पल कुठे चोरली त्यासाठीच हा उल्लेख आहे ना...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

31 Jan 2009 - 12:39 am | संदीप चित्रे

नी आणि मास्तर दोघांशी सहमत.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2009 - 1:04 am | बिपिन कार्यकर्ते

नी आणि मास्तरांशी सहमत!!!

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

30 Jan 2009 - 11:48 pm | यशोधरा

हे आत्ताच वाचले. लेखनाच्या चोरीचा निषेध करावा तितका थोडाच आहे!
केदारचे अभ्यासपूर्ण लेखन बर्‍याचदा वाचले आहे.

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 11:51 pm | भडकमकर मास्तर

चोरीचा निषेध !
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jan 2009 - 11:53 pm | अविनाशकुलकर्णी

मी समर्थन करीत नाहि..पण आपण निषेधा पलिकडे काहि करु शकतो का??..मी साहित्य चोरीचा निषेधच करतो

फारएन्ड's picture

31 Jan 2009 - 12:00 am | फारएन्ड

मायबोलीवरचा लेख मूळ लेखकास श्रेय न देता येथे किंवा आणखी कोठे छापला गेला तर तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न दोन्हीकडे केला तरी काय हरकत आहे?

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2009 - 1:02 am | बिपिन कार्यकर्ते

लेखनचौर्याचा त्रिवार निषेध. वरती बर्‍याच जणांनी लिहिले आहेच की मागेही या सदस्याचे काही धागे अशाच प्रकारचे होते म्हणून उडवले गेले होते. पण हा सदस्य परत परत असे का करत आहे? मुद्दाम की 'भेजे मे बात नही घुसरेली'!!!

लेखनचौर्याचा अजून एक साळसूद प्रकार म्हणजे, इन्स्पायर्ड लिखाण. अनु मलिक, भप्पी लाहिरी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून इन्स्पायर्ड गाण्यासारख्या इन्स्पायर्ड कथा लिहितात लोक. इथे मिपावर पण काही जण असे करताना दिसतात नेहमी. मी नाव नाही घेत कारण माझ्याकडे पुरावे वगैरे नाहित पण या सदस्याच्या कथांना बरेच वेळा "ही कथा आधी कुठेतरी वाचली आहे" असे प्रतिसाद येतात. हा काय प्रकार आहे?

बिपिन कार्यकर्ते

एखादा अभ्यासपूर्ण लेख कुठल्याशा आय्डीच्या नावाने प्रसिद्ध करण्याने काय मिळत असावे?

(म्हणजे कोणी लेखकाने चोरलेल्या कथेबद्दल मानधन मिळवले, तर तो हीन प्रकार पैशांमुळे केला, नावलौकिकासाठी केला, असे काही समजून येते.)

इथे तर काहीच हेतू समजत नाही.

निषेध तर आहेच.

रामची आई's picture

31 Jan 2009 - 3:24 am | रामची आई

http://purandarchawaghsardar.blogspot.com/ इथे सगळ्या पाककृती चोरलेल्या आहेत. माझ्या मनोगत आंणि मायबोलीवर प्रसिध्द झालेल्या पाककृती आहेत.

विसोबा खेचर's picture

31 Jan 2009 - 8:34 am | विसोबा खेचर

लेखनचौर्याचा जाहीर निषेध..!

कोतवालांनी असं करायला नको होतं. त्यांचा जाहीर खुलासा/माफी येथे अपेक्षित.

तात्या.

अघळ पघळ's picture

1 Feb 2009 - 12:20 am | अघळ पघळ

माफी?? हे बघा खरडीतुन ह्या चोरट्य़ाने काय म्हंटले आहे. ब्लॉग फेमस करायची युक्ती म्हणे ही!

टारझनच्या खरडवहीतील कोतवालाची खरड

आर आर्कूट वर व्हत मला काय ठाव उद्या लिन्क देतो सम्द्यासनी
आनि आपला ब्लॉग पन पापुलर झाअला ना राव
हानु दे आपण तर जातोय आता मिसळ सोदुन

अघळ पघळा

सुनील's picture

31 Jan 2009 - 8:38 am | सुनील

कोतवालाचे चौर्य हा ऑक्सिमोरॉन म्हणावा काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

31 Jan 2009 - 9:06 am | दशानन

खरं तर लोकायत वर व मागे येथे मिपावर देखील कोतवाल ह्यांना समजावून दिले गेले होते ते आठवले,
चालू दे ! चालू दे !

आम्ही निषेध नाही करणार पण त्यांनी असे करायला नको होते हे नक्कीच... !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

बोका's picture

31 Jan 2009 - 10:49 am | बोका

कोतवालांची ही जुनी सवय दिसते.

यापूर्वीही ..
लोकसत्तातील माधव शिरवळकर यांचा हा लेख

लोकायत वर इथे

आणि स्वतः च्या (शैलेश पिंगळे ?? ) ब्लॉग वर इथे छापला होता.

लोकायतवर मी कोतवालांना हे दाखवल्यावर त्यांनी इतर दोन लेख उडवले होते.

अघळ पघळ's picture

31 Jan 2009 - 10:53 am | अघळ पघळ

शैलेश पिंगळे हे नाव देखिल चोरलेले दिसते फोकलिच्याने. ह्या नावाचा माझा एक मित्र आहे आणि तो कोतवाल नाही

विंजिनेर's picture

31 Jan 2009 - 12:31 pm | विंजिनेर

शैलेश पिंगळे हे नाव देखिल चोरलेले दिसते फोकलिच्याने.

=)) हे सर्वात धमाल.
घाशीरामाला नम्र विनंती आहे की त्यांनी (जमल्यास, स्वतःच्या बुद्धीने) धुक्यातुन लाल तार्‍याकडे च्या चालीवर "तेंडुलकरांकडुन पणशीकरांकडे" असा लेख लिहावा
म्हणजे लोकांना त्यांना "तो मी नव्हेच" ची जाणीव करुन देता येइल.
बाकी, निषेध व्यक्त वगैरे आहेच आपला.

ढ's picture

31 Jan 2009 - 12:42 pm |

अशा प्रकारच्या मनोवृत्तीचा निषेध.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

31 Jan 2009 - 3:09 pm | मधु मलुष्टे ज्य...

घाशीरामा कसे धाडस केलेस तु ? वरुन स्वत:चे नाव टाकलेस कहरच केलास.

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

चोरीराम कोतवाल's picture

31 Jan 2009 - 5:51 pm | चोरीराम कोतवाल

पुर्वीच्या काळी ऋषिमुनीनी लाखो अध्याय लिहिले त्याचं क्रेडिट घेतलं नाही. नव्या
युगातील लेखकांना क्रेडिट का हवे?

महेंद्र's picture

31 Jan 2009 - 6:00 pm | महेंद्र

http://kayvatelte.wordpress.com/

माझ्या ब्लॉग वर जा. पहिल्या पानावर एक चिन्ह दिसेल my free copy right..
त्यावर क्लिक करा आणि फ्रि कॉपी राईट करा..
( म्हणजे खरंच काय होतं ते मला माहित नाही पण हा एक प्रकार आहे कॉपिराइट सेव्ह कर्ण्याचा असं वाटतं)

विसोबा खेचर's picture

31 Jan 2009 - 6:10 pm | विसोबा खेचर

कोतवालांनी क्षमा मागितली आहे. माझ्या मते आता हा विषय संपायला हवा..

तात्या.