✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोणती मराठी अध्यात्मिक पुस्तके घ्यावीत?

क
कोहंसोहं१० यांनी
Sat, 08/20/2022 - 03:59  ·  लेख
लेख
मला खालील धार्मिक पुस्तके मराठीतून विकत घ्यायची आहेत. कृपया सर्वमान्य आणि अचूक भाषांतरे असलेली मराठी पुस्तके सुचवावीत. पुस्तकाचे पूर्ण नाव आणि लेखक दिल्यास फारच मदत होईल. १. उपनिषदे (१० किंवा ११ प्रमुख. शंकरभाष्यासहित असल्यास उत्तमच). २. दासबोध ३. तुकारामांची गाथा अर्थासहित ४. भागवतपुराण ५. वाल्मिकी रामायण ६. महाभारत (व्यासरचित)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2556 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

वाल्मिकीरामायण, व्यासरचित

प्रचेतस
Sat, 08/20/2022 - 05:06 नवीन
वाल्मिकीरामायण, व्यासरचित महाभारत विदर्भ मराठवाडा बुक कम्पनी आणि वरदा प्रकाशन अशा दोन वेगवेगळ्या प्रकाशनांनी प्रसिद्ध केले आहे. दोन्ही उत्तम आहेत, मात्र वरदाचा टाईप बारीक आहे, विदर्भ मराठवाडा वाचायला जास्त सुलभ आहे. भागवत महापुराण देखील विदर्भ मराठवाड्याचे उपलब्ध आहे. चार वेद आणि उपनिषदे यांचा अनुवाद बहुधा प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.
  • Log in or register to post comments

दासबोध पू. बाबा बेलसरे

शाम भागवत
Sat, 08/20/2022 - 07:01 नवीन
दासबोध पू. बाबा बेलसरे
  • Log in or register to post comments

विकत घेण्या आधी....

प्रसाद गोडबोले
Sat, 08/20/2022 - 11:48 नवीन
विकत घेण्या आधी इन्टरनेट्वर विशेषतः https://archive.org/ ह्या वेबसाईट वर शोध घेऊन सॉफ्ट कॉपी डाऊनलोड कराव्यात व वाच्याव्यात असे विनम्रपणे सुचवु इच्छितो. कारण आपण दिलेले जवळपास सर्वच ग्रंथ हे अवाढव्य आहेत , खर्चिक प्रकार आहे, शिवाय विकत घेऊन पुस्तक वाचले न जाणे हे फार दुखद असते. ब्रह्मसुत्रशांकरभाष्याचे तीन खंड आवर्जुन विकत घेतले अन पहिलेच प्रकरण वाचल्यावर लक्षात आले की , संसारात असताना , चिल्लर प्रापंचिक कटकटीनीं आयुष्य व्यापले असताना इतक्या गहन विषयावर चिंतन करायला वेळच देता येणार नाहीये :( तुर्तास तीन्ही खंड मस्त कव्हर घालुन आमच्या पुस्तकांच्या कपाटात विराजमान आहेत मुहुर्ताची वाट पहात... :( १. उपनिषदे (१० किंवा ११ प्रमुख. शंकरभाष्यासहित असल्यास उत्तमच). https://fdocuments.in/document/subodh-upanishad-sangraha-part-1of-4-marathi-translation.html?page=23 २. दासबोध https://satsangdhara.net/db/das01.htm ३. तुकारामांची गाथा अर्थासहित https://archive.org/details/sant-tukaram-gatha/Tukaram%20gatha%20original/page/n195/mode/2up ४. भागवतपुराण https://satsangdhara.net/bhp/bhsk01.htm ५. वाल्मिकी रामायण https://satsangdhara.net/vara/k1s001.htm ६. महाभारत (व्यासरचित) https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/mahabharata-bori.html (मराठी अनुवादाच्या लिन्क्स वल्लीसर देऊ शकतील.)
  • Log in or register to post comments

स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना

Trump
Sat, 08/20/2022 - 19:05 नवीन
स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह https://www.maayboli.com/node/13468
  • Log in or register to post comments

मस्तच

कर्नलतपस्वी
Sat, 08/20/2022 - 21:27 नवीन
आजकाल अंतरजालावर भरपुर चकटफू पि डी एफ अवृत्या उपलब्ध आहेत. वरील दिलेल्या लिंक बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा