आता कोण ?

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
30 Nov 2008 - 11:49 pm
गाभा: 

एकंदरीत विलासराव व आबा यांना जावे लागेल असे दिसते.

मग आता कोण?

माझा अंदाज
मुख्यमंत्री - सुशिलकुमार शिंदे
उपमुख्यमंत्री/ गृहमंत्री - छगन भुजबळ

आपला अंदाज काय?

प्रतिक्रिया

व्यंकु's picture

1 Dec 2008 - 12:06 am | व्यंकु

मुख्यमंत्री : अफजल गुरु
उप.: (हिँदु मुस्लीम वाद होउ नये म्हणून) साध्वी प्रद्न्या सिंग ठाकूर

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 12:29 am | विसोबा खेचर

माझ्या मते देशात आणिबाणी लागू करावी. सगळेच राजकारणी एक नम्बरचे चोर आणि खुर्चीला चटावलेले आहेत.. त्यांच्यात डावंउजवं करण्यात अर्थ नाही. हे सगळेच एका माळेचे मणी आहेत...

तात्या.

विकास's picture

1 Dec 2008 - 8:59 am | विकास

आणिबाणी लागू केल्यास त्याच राज्यकर्त्यांकडे सत्ता एकवटेल आणि तेही नेहमीच्या कायद्यात न सापडता...

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 9:10 am | विसोबा खेचर

हरकत नाही. आणिबाणी नाही तर मग दुसरा उपाय काय? कारण सर्वच पक्षाचे राजकारणी नालायक आहेत..! फक्त स्वत:ची पोळी भाजण्यात मग्न आहेत..!

घाटावरचे भट's picture

1 Dec 2008 - 12:44 am | घाटावरचे भट

मुख्यमंत्रीपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Dec 2008 - 2:21 am | अविनाशकुलकर्णी

मुख्य मंत्री--राखी सावंत
उप....कोणताहि हास्य सम्राट

खरा डॉन's picture

1 Dec 2008 - 10:04 am | खरा डॉन

मुख्यमंत्री : राम गोपाल वर्मा

उपमुख्यमंत्री : डेव्हीड धवन

आम्हाघरीधन's picture

1 Dec 2008 - 11:44 am | आम्हाघरीधन

विसोबा म्हणतात ते अगदी योग्य आहे. देशात आणीबाणी लागु करुन लश्कराच्या हातीच सत्ता द्यावी. प्रत्येक राजकारणी सत्तेवर येताच नालायक बनायला सुरुवात होते. कुणाकुणाचे पर्याय वापरावे?
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2008 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

मुख्यमंत्री :- निळु फुले
उपमुख्यमंत्री :- अशोक सराफ

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

केदार's picture

1 Dec 2008 - 10:45 pm | केदार

माझ्या मते देशात आणिबाणी लागू करावी >>
अहो विसोबा काहीही काय. आणिबाणीच्या फायद्यांपेक्षा तोटे जास्त असतात असे आपल्यास माहीती असेलच.
आणि पाक, क्युबा व इतर अनेक देशांत लक्ष्कराची सत्ता आहे त्यामूळे ते देश पुढे गेले आहेत काय? आणिबाणी लागू झाली तर आपन ही जी चर्चा करत आहोत ती देखील बंद करावी लागेल. मग मिसळ पाव खानार कुठे? आणी रोज ब्लॉग पाडनार्‍यांचे काय होइल ह्याचा विचार करा की राव.

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 10:50 pm | विसोबा खेचर

अरे बाबा त्राग्यातून मनुष्य बोलतो असा कधितरी! साला गोळीबार व्हायच्या अवघा अर्धातास आधी मी व्हिटी स्थानकात होतो.. मरणाचं काही नाही रे, ते एक ना एक दिस येणारच आहे पण घरी अजून सत्तरीची अपंग म्हातारी आहे रे!

साला, मेट्रोच्या आसपासदेखील मला हप्त्यातून दोनतीनदा जावे लागते..!

असो...

आणिबाणी लागू व्हावी हे माझे वाक्य बदलून खाली नवीन वाक्य्त देत आहे..

संपूर्णपणे नव्या चेहेर्‍यांना/तरूण रक्ताला राजकारणात वाव द्यावा...

तात्या.

केदार's picture

1 Dec 2008 - 10:55 pm | केदार

कळतय हो. पण म्हणतात ना कठिन प्रसंगे विचार निट करावा म्हणून लिहीले.
तूमच्या बदललेल्या वाक्या साठी मिसळीचा लालभडक रस्सा आणि वर मस्त पाव तुम्हाला देन्यात यावा.