✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आर्या वृत्ताची चाळ कोणाला माहिती आहे का?

ध
धष्टपुष्ट यांनी
गुरुवार, 10/22/2020 - 19:57  ·  लेख
लेख
अनेक प्रचारातील वृत्तांना आपल्या माहितीच्या चाली असतात. उदाहरणार्थ भुजंगप्रयात वृत्ताला मनाच्या श्लोकांची चाल लअसते. किंवा मालिनी वृत्ताला करुणाष्टक. . आर्या मयूरपंतांची आपण म्हणतो. पण आर्या वृत्ताची चाल शाळेत शिकवलेल्ं कधी आठवत नाही. मला तर वाटतंय की अनेक वर्षांमध्ये कोणी आर्या वृत्तामध्ये लिहिलंच नाहीये. (त्यांचं सगळ्यांना माहीत असणारं सुसंगति सदा घडो हे पृथ्वी वृत्तात आहे) . युट्यूब वर हुडकून पाहिलं पण काही दिसलं नाही. ज्या कोणी प्रयत्न केला आहे त्यांचा प्रयत्न गद्य वाटतो; पद्य नाही. काही लोकांनी चाल लावली आहे पण ती नियमित नाही. एकूण जरा मामला बिकट आहे. . कोणी कुठल्या प्रकारची मदत करू शकेल काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4764 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

पुढील दुवा (मोरोपन्तानी आर्या

शेखरमोघे
गुरुवार, 10/22/2020 - 23:44 नवीन
पुढील दुवा (मोरोपन्तानी आर्या वृत्त वापरून केलेली गीता, गायलेल्या स्वरूपात) उपयोगी ठरावा https://archive.org/details/MoropantAryaVrittaGitaCh18/Moropant_Arya-vritta_Gita_ch-1.mp3
  • Log in or register to post comments

येथे पाहा...

अरविंद कोल्हटकर
Fri, 10/23/2020 - 03:17 नवीन
https://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA&t=788s येथे एकूण ३१ वृत्ते, त्यांच्या लक्षणांसह आणि संस्कृत श्लोकांसह, माझ्या उच्चरणात पाहायला मिळतील. त्यामध्ये ७:३४ ते ७:४७ ह्या वेळामध्ये आर्या वृत्त ऐकण्यास मिळेल. येथे हे लक्षात घ्यायला हवे की मी म्हटलेली आर्या १२-१८-१२-१५ अशा मात्रांची आहे. मोरोपंतांच्या काव्यास आर्या असे नाव जरी दिले जाते तरी ती शुद्ध आर्या नाही. मोरोपंत अधिककरून १२-१८-१२-१८ अशा मात्रांचे 'गीति' नावाचे आर्येचे उपवृत्त वापरतात. आर्येचे उपगीति, उद्गीति, आर्यागीति असेहि उपप्रकार परशुरामपन्त गोडबोलेकृत वृत्तदर्पणात दाखविलेले आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद साहेब !

धर्मराजमुटके
Sun, 10/25/2020 - 11:25 नवीन
धन्यवाद साहेब ! अगदी माहितीपुर्ण ! आवडला. मात्र मलाही धागालेखकाला पडलेला प्रश्न बरेच वर्षे पडलेला आहे. "आर्या" आधारीत एखादी मराठी रचना ऐकावयास मिळाली असती तर जास्त आनंद झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर

आर्या मयुरपंतांची

रमेश आठवले
Fri, 10/23/2020 - 05:16 नवीन
सुश्लोक वामनाचे आर्या मयुरपंतांची ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

चौकटराजा
Fri, 10/23/2020 - 09:27 नवीन
हे असे हवे सुश्लोक वामनाचा , किंवा आर्या मयुरपंतांची ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची तर वृत्त पूर्ण होते !! )))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

चौरा

चौथा कोनाडा
Mon, 10/26/2020 - 17:43 नवीन
मस्त गुगली, चौरा साहेब ! 😍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ज्या कोणी प्रयत्न केला आहे त्यांचा प्रयत्न गद्य वाटतो;

धर्मराजमुटके
Sun, 10/25/2020 - 11:26 नवीन
म्हणूनच हे वृत्त जास्त प्रसिद्धी पावले नसावे असा माझा एक अंदाज आहे. अर्थात मी मराठी व्याकरणाचा केवळ हौशी विद्यार्थी आहे. अधिक प्रकाश जाणकार व्यक्तीच टाकू शकेल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा