आर्या वृत्ताची चाळ कोणाला माहिती आहे का?

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in काथ्याकूट
22 Oct 2020 - 7:57 pm
गाभा: 

अनेक प्रचारातील वृत्तांना आपल्या माहितीच्या चाली असतात. उदाहरणार्थ भुजंगप्रयात वृत्ताला मनाच्या श्लोकांची चाल लअसते.
किंवा मालिनी वृत्ताला करुणाष्टक.

.
आर्या मयूरपंतांची आपण म्हणतो. पण आर्या वृत्ताची चाल शाळेत शिकवलेल्ं कधी आठवत नाही. मला तर वाटतंय की अनेक वर्षांमध्ये कोणी आर्या वृत्तामध्ये लिहिलंच नाहीये. (त्यांचं सगळ्यांना माहीत असणारं सुसंगति सदा घडो हे पृथ्वी वृत्तात आहे)

.
युट्यूब वर हुडकून पाहिलं पण काही दिसलं नाही. ज्या कोणी प्रयत्न केला आहे त्यांचा प्रयत्न गद्य वाटतो; पद्य नाही. काही लोकांनी चाल लावली आहे पण ती नियमित नाही. एकूण जरा मामला बिकट आहे.

.
कोणी कुठल्या प्रकारची मदत करू शकेल काय?

प्रतिक्रिया

पुढील दुवा (मोरोपन्तानी आर्या वृत्त वापरून केलेली गीता, गायलेल्या स्वरूपात) उपयोगी ठरावा

https://archive.org/details/MoropantAryaVrittaGitaCh18/Moropant_Arya-vri...

अरविंद कोल्हटकर's picture

23 Oct 2020 - 3:17 am | अरविंद कोल्हटकर

https://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA&t=788s येथे एकूण ३१ वृत्ते, त्यांच्या लक्षणांसह आणि संस्कृत श्लोकांसह, माझ्या उच्चरणात पाहायला मिळतील. त्यामध्ये ७:३४ ते ७:४७ ह्या वेळामध्ये आर्या वृत्त ऐकण्यास मिळेल.

येथे हे लक्षात घ्यायला हवे की मी म्हटलेली आर्या १२-१८-१२-१५ अशा मात्रांची आहे. मोरोपंतांच्या काव्यास आर्या असे नाव जरी दिले जाते तरी ती शुद्ध आर्या नाही. मोरोपंत अधिककरून १२-१८-१२-१८ अशा मात्रांचे 'गीति' नावाचे आर्येचे उपवृत्त वापरतात. आर्येचे उपगीति, उद्गीति, आर्यागीति असेहि उपप्रकार परशुरामपन्त गोडबोलेकृत वृत्तदर्पणात दाखविलेले आहेत.

धर्मराजमुटके's picture

25 Oct 2020 - 11:25 am | धर्मराजमुटके

धन्यवाद साहेब ! अगदी माहितीपुर्ण ! आवडला. मात्र मलाही धागालेखकाला पडलेला प्रश्न बरेच वर्षे पडलेला आहे. "आर्या" आधारीत एखादी मराठी रचना ऐकावयास मिळाली असती तर जास्त आनंद झाला असता.

रमेश आठवले's picture

23 Oct 2020 - 5:16 am | रमेश आठवले

सुश्लोक वामनाचे आर्या मयुरपंतांची
ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची

चौकटराजा's picture

23 Oct 2020 - 9:27 am | चौकटराजा

हे असे हवे

सुश्लोक वामनाचा , किंवा आर्या मयुरपंतांची
ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
तर वृत्त पूर्ण होते !! )))

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2020 - 5:43 pm | चौथा कोनाडा

मस्त गुगली, चौरा साहेब !

😍

म्हणूनच हे वृत्त जास्त प्रसिद्धी पावले नसावे असा माझा एक अंदाज आहे. अर्थात मी मराठी व्याकरणाचा केवळ हौशी विद्यार्थी आहे. अधिक प्रकाश जाणकार व्यक्तीच टाकू शकेल.