भाजीसाठी काही नाही त्यामुळे मी काल डोस्याचे पीठ बनवले आहे, सोबत बटाट्याची भाजी करणार असे आईने चहा पिताना सांगितले. डोसा खायची इच्छा नव्हती आणि थोडा वेळही होता म्हटल चला कांदा/चीज उत्तपा बनवूया.
बघितलं तर दोनच छोटे कांदे होते, मग त्यात टोमॅटो टाकायचे म्हणुन फ्रिज उघडला तर पनीर दिसले. आणि म्हटल चला आजे "पनिर उत्तपा" बनवुन पाहू.
साहित्यः
- कांदे २ (तेवढेच होते)
- टोमॅटो २
- पनीर १०० ग्रॅम (अंदाजे)
- हिरव्या मिरच्या २
- चाट मसाला १ चमचा
- कोथिंबिर
- मिठ
कापाकापी नंतरचा फोटो
सर्व एका भांड्यात मिक्स केलं
तव्यावर दोन डाव पीठ टाकुन गोलाकारात पसरवण्याचा प्रयत्न केला व त्यावर थोड मिश्रण टाकलं आणि गॅस सुरु केला.
एक मिनिट गॅस मोठाच ठेवला व नंतर कमी गॅसवर दोन मिनिट ठेवलं. नंतर पलटुन दुसर्या बाजुने दोन मिनिट ठेवला.
तयार झाल्यानंतर त्यावर थोड तूप टाकलं आणि...
कांदा / पनीर / टोमॅटो असल्याने याला कुठला उत्तपा म्हणावा ?
वाचने
11820
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
"कांदा पनीर टोमॅटो उत्तप्पा"
हैला, एवढं सोपं असतं का हे!!
हो..
In reply to हैला, एवढं सोपं असतं का हे!! by जव्हेरगंज
मालक... येक नंबर
अगदी अनपेक्षितपणे तुमच्याकडून
पनीर (एक फस्टक्लास जमुन आलेला
१) पहिले दोन फोटो - चिरलेले
सरपंच जोरात, मिपाकर कोमात!
छान झालाय
मिश्रणाला पनीर चाट नाव देता येईल
अरे वाह !
उत्कृष्ट .. बाकी प्रशांत
मीच..
In reply to उत्कृष्ट .. बाकी प्रशांत by गवि
हेच म्हणते !
In reply to उत्कृष्ट .. बाकी प्रशांत by गवि
मस्तच! सगळे टोमॅटोचे तुकडे
झकास, आवडली पाकृ आणि फोटो
...पांडू मोड ऑन
धन्स ...