आठवांच्या काळवेळा पाहिल्या.
हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या.
मालवेणा चंद्र भोळा कालचा.
कालच्या या चांदण्याही राहिल्या.
सोसली मी ही तमांची अंतरे.
रात्र काळी झाडपाने मंतरे.
गारव्याने जाग आली या फुला.
पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या.
प्राण झाले कातिलांचे सोबती.
सांग हे का माणसाला शोभती ?
वाचण्याचे मार्ग सारे संपले.
शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या.
-कौस्तुभ
वृत्त - मालीबाला
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4300
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख कविता !
अभिप्रया बद्दल आभारी आहे
In reply to सुरेख कविता ! by संजय क्षीरसागर
आवडली
धन्यवाद
In reply to आवडली by प्राची अश्विनी
आवडली
धन्यवाद
In reply to आवडली by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)