परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन अवकाशातल्या माणसाला कोण वाचवेल का ? थॅनोस

महासंग्राम's picture
महासंग्राम in काथ्याकूट
22 Apr 2019 - 9:40 pm
गाभा: 

आज अवकाशात प्रचंड संख्येने ऍव्हेंजर्स येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे अवकाशातील थॅनोसचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.
टायटनच्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित अवकाशात ही पसरू लागले आहे. थॅनोस संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन परग्रहवासी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर थॅनोस अवकाशात अल्पसंख्यक होतील. ह्या ऍव्हेंजर्सच्या कायदा व घटनेत कुठलिच तरतूद नाही.

अशा वेळी थॅनोस ने काय करावे ब्रे ?

चुटकी वाजवावी कि वाजवू नये हाच प्रश्न आहे