चला कथा लिहू या

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जनातलं, मनातलं
18 Sep 2007 - 8:29 am

मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते.

आपल्याकडे अतिशय प्रतिभावान साहित्यिक आहेत. चला आता सर्वजण मिळून एक कथा लिहूया.

१. प्रत्येक प्रतिसादकर्त्याला एक परिच्छेद लिहिण्याची परवानगी आहे.
२. परिच्छेद शक्यतो दहा ओळींपेक्षा जास्त नसावा
३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत.

अशी साधारण मार्गदर्शक तत्त्वे.

चला तर मग.

कथामुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 8:31 am | विसोबा खेचर

मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते.

नाही, मी नव्हता केला एवढेच सांगू इच्छितो..

तात्या.

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 8:33 am | आजानुकर्ण

कोणी तरी केला होता. ;) तुम्ही प्रतिसाद दिले होते.

सहज's picture

18 Sep 2007 - 8:56 am | सहज

३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत.

मला वाटते त्या कथेत दर्जा चांगला रहावा म्हणून एका दिवशी एका लेखकाने एकच प्रतिसाद द्यावा, भेंड्या सारखे धडाधड लिखाण नको. अश्याने जास्त विचार केला जाइल व कथा चांगली रंगेल.

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:18 am | सर्किट (not verified)

मी एका अख्ख्या कादंबरीचे प्वाईंट्स तयार केलेले आहेत. ह्यात कुणाला इंटरेश्ट असल्यास, चार पाच जणांनी मिळून ही कादंबरी लिहावी हा मानस आहे. त्यासाठी मिसळपाव हे मात्र योग्य माध्यम आहे असे मला वाटत नाही. त्यासाठी विकी सारखी सोय असावी असे वाटते. पाच नावे आल्यावर मी हा "उपक्रम" सुरू करेन.

- सर्किट

गुंडोपंत's picture

18 Sep 2007 - 9:25 am | गुंडोपंत

मला खरं तर काही कळत नाही यातलं...
तरी पण!
पण तरी ही खांब दिसलाच आहे तर पाय वर करून पाहतोय!

लेखक
(उद्याचा कांदंबरी लेखक)
गुंडोपंत

विशाल कुलकर्णी's picture

17 Aug 2009 - 9:40 am | विशाल कुलकर्णी

सर्किटदेवा आमची येंट्री चालंल का? :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

स्वाती दिनेश's picture

18 Sep 2007 - 9:29 pm | स्वाती दिनेश

माझ्या आठवणीप्रमाणे रोहिणीने अशी कल्पना 'त्या तिथे,पलिकडे' मांडली होती आणि ती गोष्ट पुढे छान सरकत होती,मजा आली होती.
स्वाती

ख्रेडूत's picture

19 Sep 2007 - 5:14 am | ख्रेडूत

कर्ना,
ल्येका भेंड्या काय गोष्ट काय..येक वर्षाचा उपास संपल्यावानी तुजी खादाडी चाललीया!!..चालू दे चालू दे.. येकदम जुनं दिवस पुन्ना आल्यासारकं वाटलं बग!!

बरेच दिवस काहीतरी लिहायसाठी हात खाजतो आहे पण च्यायला ह्या फुटकळ लेखकाला कोण सन्धी देणार अन स्वतःच॑ मातेर॑ करुन घेणार?

आता मिळतोच आहे चान्स तर घ्यावा म्हणतो वाहत्या ग॑गेत हात धूउन...

बघा बुवा आमची लेखणी तुम्हाला चालते का ते!

(अत्य॑त थरारक, गु॑ग करणारा, सिद्धहस्त, वाचकप्रिय(???) रटाळ फुटकळ लेखक ---मायमराठीच॑ अहो-दुर्भाग्य, दुसर॑ काय?)

- आपला 'णम्र',
धमाल.

मुक्तसुनीत's picture

9 Jan 2008 - 6:55 pm | मुक्तसुनीत

मला बी ल्हिउन द्या की ! :-)

आपली तयारी आहे. होऊन जाऊ द्या !

विश्वजीत's picture

9 Jan 2008 - 8:45 pm | विश्वजीत

तयार आहे! सुरू करा.

विश्वजीत.

प्राजु's picture

10 Jan 2008 - 12:10 am | प्राजु

तयारी आहे...
सुरू करूया..

- प्राजु.

सुनील's picture

10 Jan 2008 - 1:34 am | सुनील

एक ओव्हर टाकून मीही सरावलोय(खरंच?). तेव्हा माझी पण रेडी...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Jan 2008 - 2:41 am | ब्रिटिश टिंग्या

सुनीलभाऊ, ओपनिंग ओव्हर तुम्हीच टाका.......
वाटलचं तर पुढची ओव्हर मी टाकतो.....

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 2:43 am | इनोबा म्हणे

कर्णा उपक्रम चांगला आहे...पण किती वेळ ताणून धरतोयस्...एकदाचं चालू कर कि...च्यायला!डोक्यात असलेले विचार कधी एकदा दुसर्‍यांच्या डोक्यावर फोडतोय असं झालंय...
बाय द वे...दुर्योधनाने तुला 'रिझ्यूम' फॉरवर्ड करायला सांगीतलाय,...धृतराष्ट्र अंकलनी नुकतंच 'धृतराष्ट्र ऑप्टीकल्स' नावाचं एक चष्म्याचं दूकान टाकलंय-चक्कर मारून जा...कुंती आंटी तुझी आठवण काढत होत्या...जमल्यास फोन कर...जोश्यांची द्रौपदी कुलकर्ण्यांच्या अर्जुनाबरोबर पळून गेली... हस्तीनापूर कॉलनीत फ्लॅट घेतलाय म्हणे...त्याचा भाऊ भिम आमच्या बाजूच्याच जिममधे इन्स्ट्रक्टर आहे,तुझी त्याच्याबरोबर खुन्नस आहे म्हणून सांगतोय,पाहिजे असेल तेव्हा सांग चार-पाच पोरं पाठवून रट्टे द्यायला लावतो...संजयला नुकताच 'परसो तक' मधे 'रिपोर्टरचा' जॉब मिळालाय ...तुझी 'कवचकुंडले'कुरीयरने पाठवली आहेत,पोचल्यावर फोन टाक...बाकी विशेष काही नाही...पत्राचे उत्तर जरुर देणे...वाट पाहत आहोत.

(इति'हास्य'प्रेमी) -इनोबा

सुधीर कांदळकर's picture

10 Jan 2008 - 10:27 pm | सुधीर कांदळकर

सध्या इझरेल लेबनॉन्मध्ये समझौता करण्याच्या मिशनवर आहे. शंकररावांना चश्मा घ्यायचाय. तीन डोळ्यांचा. धृतराष्ट्रांच्या दुकानात असल्यास कळवावे. शुक्राचार्यांकडे नवा स्टॉक आलेला आहे. कृष्णरावांच्या साड्यांच्या दुकानांत सेल लागलेला आहे. मेनका बारचे नूतनीकरण झले. आबांच्या हस्ते अनावरण झाले. यामध्ये नवीन बारबाला आलेल्या आहेत. द्रोणाचार्यांच्या क्लासची नवी शाखा लवकरच उघडत आहे. जास्त फी जास्त गुण हे त्यांचे ब्रीद आहे. अंगठा देणा-यास गोल्ड मेडल देणार. सैरन्ध्रीने नवीन ब्यूटी पार्लर उघडले आहे. काल त्यात देव आनंद गेला. परंतु बाहेर अमीर खान आला. एकता कपूरने मालिका संन्यास घेतला आहे. वाजपेई यापुढे शाहरुख च्या स्टाईलमध्ये बोलणार आहेत. रिकी पाँटिंग खरे बोलण्याचे क्लास काढणार आहे. पहिले मेंबर म्हणून डॅरिल हेअर, मार्क बेन्सन व स्टीव्ह बकनॉर यांनी नावे नोंदवली. जॉर्ज डब्लू बुश शांततेचे पाठ देणार. प्रमुख प्रपाठक इझरेलचे पंतप्रधान.

शिळ्या बातम्याचे बातमीपत्रक संपन्न होत आहे. आता पाहा पुढील कार्यक्रम .......

इनोबा म्हणे's picture

11 Jan 2008 - 1:16 am | इनोबा म्हणे

वा रे सुध्या!याला म्हणातात इति'हास्य' प्रेमी...

('चान्स पे डान्स' करणारा) -इनोबा

धमाल मुलगा's picture

21 Jan 2008 - 2:57 pm | धमाल मुलगा

आयला, नुसत॑च नमनाला घडाभर तेल...
ओsss काय गाडी पुढ॑ सरकते का नाही ???

पेशवे बाजीराव तिसरे's picture

21 Jan 2008 - 3:33 pm | पेशवे बाजीराव तिसरे

खुपच छान कल्पना आहे.. शुभस्य शीघ्रम

बाकरवडी's picture

17 Aug 2009 - 8:44 am | बाकरवडी

खुपच छान कल्पना आहे,
मी पन लिहीन !

:B :B :B बाकरवडी :B :B :B

खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!