✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आप (Discussion on characteristics, properties and classification of liquids)

अ
अनिकेत कवठेकर यांनी
Sat, 05/26/2018 - 14:30  ·  लेख
लेख
(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील आप किंवा द्रवरूप पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली जल किंवा आपद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो)े ४.२: ३५अप्त्वाभिसम्बन्धादापः । Water or liquid state is that which is comprised in the class water. द्रवरूपात असलेल्या सर्वच द्रव्यांना आप किंवा जल या गटात मोजलं जातं. रूपरसस्पर्शद्रवत्वस्नेहसङ्ख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागपरत्वापरत्वगुरुत्वसंस्कारवत्यः । It has the following qualities: Colour, Taste, Temperature, Fluidity, Viscosity, Quantity (Measurability), Dimension (Unit of Measure), Separateness, Conjunction, Distance, Proximity, Gravity and Ability to apply force. आपगटाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे – रंग, चव, तापमान, प्रवाहीपणा, चिकटपणा, मोजणी करता येणे, मोजण्याचे एकक असणे, विलगपणा, संलग्नपणा, दूरत्व, निकटत्व,गुरुत्वबळ त्यांच्यावर काम करते आणि ती दुसऱ्या पदार्थांवर बळ लावू शकतात. ४.२: ३५पूर्ववदेषाम्सिद्धिः । These are indicated by the Sutra in the same way. वैशेषिक सूत्रांमध्येही ते गुणधर्म सांगितलेले आहेत. रूपरसस्पर्शवत्य आपो द्रवा: स्निग्धाश्च (२|१|२) The water has the qualities of colour, taste, temperature. It also has natural fluidity and viscosity. रंग, चव आणि तापमान असणाऱ्या आपद्रव्याचे नैसर्गिक प्रवाहीपणा आणि चिकटपणा हे ही गुण असतातच. ४.२: ३५शुक्लमधुरशीताएवरूपरसस्पर्शाः। The colour of water is white, its taste is sweet and it is cool in touch. पाण्याचा रंग पांढरा असतो, चव गोड असते आणि ते थंड असते. स्नेहोऽम्भस्येवसांसिद्धिकम्चद्रवत्वम् । Viscosity belongs to the water or class of liquids alone as also the natural fluidity. चिकटपणा आणि नैसर्गिक प्रवाहीपणा हे गुणधर्म केवळ आपद्रव्यांच्या गटालाच लागू होतात. ४.२: ३६ताश्चपूर्ववद्द्विविधाः । नित्यानित्यभावात् । Like Earth, water is also of two types – eternal and non-eternal. स्थायू द्रव्यांप्रमाणे आपद्रव्याचेही दोन गट आहेत – सूक्ष्मरूपात ते चिरकाल टिकतात व मोठ्या आकारात ते काही विशिष्टकाळापर्यंतच टिकतात. तासाम्तुकार्यम्त्रिविधम्। शरीरेन्द्रियविषयसंज्ञकम् । Its products are of three types – in the shape of body, the sense organ and the object. आपद्रव्यापासून तीन प्रकार तयार होतात – शरीरांचे बाह्यकवच, इंद्रिय आणि वस्तू. ४.२: ३६तत्रशरीरमयोनिजमेववरुणलोके,पार्थिवावयवोपष्टम्भाच्चोपभोगसमर्थम् । The body of water is one that is not born of womb and is known to exist only in the regions of Varuna. These aquatic bodies however are made capable of experiencing pleasure, pain etc by the admixture of Earth molecules. जलयुक्त बाह्कवच असलेली शरीरे ही मातेच्या गर्भातून जन्माला आलेली नसतात आणि ती पाण्यातच असतात. पण जलचर हे सस्तन प्राण्यांच्या वर्गात मोडत नाहीत. परंतु तरीही या जलचर प्राण्यांचे शरीर हे स्थायू व जलरेणूंच्या मिश्रणातून बनलेले असल्याने त्याद्वारे त्यांना आनंद व दु:ख यांचा अनुभव घेता येतो. ४.२: ३६इन्द्रियम्सर्वप्राणिनाम्रसव्यंजकम्विजात्यनभिभूतैर्जलावयवैरारब्धम्रसनम् । The aqueous sense organ is the organ of taste, which serves to make taste perceptible by all living beings, and is made up of the aqueous atoms only, without any part of the molecules of other substances. जलद्रव्याने बनलेले इंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय किंवा जीभ आणि सर्व सजीवांना या रसनेंद्रियाद्वारे चवीचा अनुभव घेता येतो. हे इंद्रिय केवळ द्रवरूप रेणूंचेच बनलेले असते. त्यात इतर कुठल्याही कोणत्याही प्रकारचे द्रव्य नसते. ४.२: ३६विषयस्तुसरित्समुद्रहिमकरकादिः ॥ The aqueous object exists in the shape of rivers, oceans, snow, hails etc. द्रवरूपाने बनलेल्या वस्तू म्हणजे नद्या, समुद्र, हिमप्रपात इत्यादि. पदार्थ धर्म संग्रह: अनुक्रमणिका मूळ गोष्ट : विक्रम वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4518 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

'आप' हे पंचमहाभूतांपैकी एक

एस
Wed, 05/30/2018 - 22:58 नवीन
'आप' हे पंचमहाभूतांपैकी एक महाभूत असे केवळ न मानता त्याचे अधिभौतिक दृष्टीने निरीक्षण आणि विश्लेषण करणे, आणि त्याच्या गुणधर्मांंना नियमांमध्ये मांडण्याचा वैशेषिकांचा प्रयत्न तत्कालीन अभ्यासपद्धती, गृहितके व परिस्थितीचा विचार करता एक स्तुत्य 'शास्त्रीय' पुढाकार म्हटले पाहिजे. भारतीय दर्शनांमधील न्याय-वैशेषिक दर्शनांचे हे वेगळेपण नकीच उठून दिसते. छान लेख. थोडा त्रोटक वाटला. पण काहीतरी लिखाण या विषयावर होतेय हे आश्वासक आहे.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद`

अनिकेत कवठेकर
गुरुवार, 05/31/2018 - 09:37 नवीन
हो, मी एक प्रयत्नच करतोय. संस्कृत पंडित आणि शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन यांचा विचार करायला हवा. जे सहजसिद्ध आहे ते ठेवणे, जे कालबाह्य आहे त्याला सन्मानाने निरोप देणे अशी कामे शास्त्रीय दृष्टिकोनातून करायला हवी आहेत. पण भारतीयांचा हा खरा विज्ञान दृष्टिकोन आहे हे निश्चितच. बाकी हा लेख त्रोटक आहे हे खरंय. मूळ पुस्तकातील श्लोक 'वरुण प्रदेश', 'जल शरीरे' असा प्रयोग करते तेव्हा शरीर म्हणजे आवरण का आपण ज्याला शरीर म्हणतो ते 'काया ' या अर्थी असते असे संभ्रमाचे प्रसंग येतात. अशा वेळी काहीतरी विचित्र/अनर्थ कारक विधान होऊ नये म्हणून केवळ श्लोकार्थाला चिकटून राहणे मी पसंत करतो. म्हणून काहीवेळा स्वतः:ला आवारावं लागतं :) हे आपलं सर्वांचं ज्ञान असल्याने त्याबाबत कोणाच्या काही सुधारणा असल्यास विचार करता येईल. हा सर्व भारतीयांचाच वारसा हक्क आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हे सगळं विश्लेषण फक्त अभ्यास म्हणुन ?

अर्धवटराव
Tue, 06/12/2018 - 08:31 नवीन
कि त्याचा वापर सुद्धा होता? म्हणजे कॅनाल/तळे बांधणी, औषधी बनवणे, रसायनांचं वर्गीकरण वगैरे... तुमचा अभ्यास खरच स्तुत्य आहे राव.
  • Log in or register to post comments

तलावाबद्दल

प्रचेतस
Tue, 06/12/2018 - 08:57 नवीन
गिरनार शिलालेख त्यासाठी प्रसिद्ध आहे. एकाच विशाल प्रस्तरावर सम्राट अशोक, क्षत्रप रुद्रदामन आणि स्कंदगुप्त ह्यांचे वेगवेगळ्या कालखंडातील लेख आहेत. रुद्रदामनाच्या लेखात लिहिलेले आहे की चंद्रगुप्त मौर्याच्या पश्चिमेकडील प्रांताधिकारी पुष्यगुप्त ह्याने सुदर्शन नाम सरोवर निर्मिले आणि तद्नंतर अशोकाचा यवन अधिकारी तुषास्य ह्याने त्यातून कालवे खोदवले त्यानंतर हा बांध प्रचंड वादळाने नष्ट होऊन गेला त्यानंतर मी (रुद्रदामनाने) हा बांध पहिल्यापेक्षा तिपटीने मोठा असा परत बांधून काढला. तर स्कंदगुप्ताच्या शिलाल्केहात लिहिले आहे की इस. ४५८ मध्ये बांध परत फुटला आणि त्यानंतर लगेचच सम्राटाचा (स्कंदगुप्त) उपप्रधान पर्णदत्त ह्याचा मुलगा चक्रपालित ह्याने त्या बांधाची डागडुजी केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

_/\_

अर्धवटराव
Mon, 06/18/2018 - 07:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रतिसाद व कॊतुकाबद्दल आभारी आहे

अनिकेत कवठेकर
Tue, 06/12/2018 - 15:06 नवीन
हे पुस्तक आजकालच्या भाषेत आपण ज्याला treatise म्हणतो तसे आहे. हे पुस्तक त्या काळातला theoretical physics ग्रंथ असू शकतो. यांचा वापर करण्याविषयी काहीही माहिती नाही. या सूत्रांचे application वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे केले असावे. त्याची विस्तृत माहिती मिळणे अवघड आहे. पण मजा अशी आहे की ही सूत्रे जितक्या वेळा वाचावीत तसे अजून अर्थ लागतात. जसे .. द्रव दोन आकारात असतात.. सूक्ष्म आणि नेहमीच्या ढोबळ आकारातले..सूक्ष्म आकार दीर्घकाळ टिकतात.. ढोबळ आकार कालांतराने नष्ट होतात.. म्हणजेच द्रव्य हे अणू रेणू आकारात 'नित्य' असते असा त्या काळातला अणुवाद आपल्याला लक्षात येतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तत्कालीन ज्ञानसंपदा अशीच तयार होत गेली असावी.

अर्धवटराव
Mon, 06/18/2018 - 07:35 नवीन
आजही हि पद्धत उपयोगी आहेच. धन्यवाद भाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत कवठेकर

वाचत आहे..

यशोधरा
Wed, 06/13/2018 - 12:41 नवीन
काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे.
खर आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा