✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी स्वप्न पाहत नाही

ख — खिलजि, Wed, 04/25/2018 - 18:36
मी स्वप्न पाहत नाही कारण , मला ते पडत नाही नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे काहीतरी वेगळंच बनायचे मी पडतो , लकटतो त्या पलंगावर विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे डोळे काही मिटत नसतात स्वप्न कुठले बघायचे नि कसे ? याचेच विचार मनात घोळत असतात हळूहळू झापड यायला लागते डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो काही स्वप्न पडलं का ? ते आठवून पाहतो आजूबाजूच्या लोकांना हि गोष्ट न्यारी वाटते आजही मला माझ्या स्वप्नाची पाटी कोरीच वाटते घेतले मी नाना वैद्यांचे सल्ले वेडा समजून त्यांनी मलाच हाकलले गुरुजनांत, एक सज्जन मला पुन्हा भेटले त्यांनी यामागचे मर्म उघडले करीत नाहीस कधीही तू कशाचीही चिंता क्षणात सोडवी मळाप्रमाणे तू व्यापाचा गुंता प्रश्नास सदैव तू उत्तरावरच ढकलले हेच कारण असे इथे कि आजवर स्वप्न तुला ना पडले मिळत नसते अशी कधीही कुणालाही भेट जो निष्काम सेवा करतो त्यालाच मिळते थेट मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

प्रतिक्रिया द्या
4905 वाचन

💬 प्रतिसाद (6)

काय लीहीलय हो तुम्ही!

श्वेता२४
Wed, 04/25/2018 - 20:33 नवीन
<मिळत नसते अशी कधीही कुणालाही भेट जो निष्काम सेवा करतो त्यालाच मिळते थेटcode> स्वतः ची पाठ थोपटून घेता की राव तुम्ही
  • Log in or register to post comments

धन्यवाद श्वेता ताई .

खिलजि
गुरुवार, 04/26/2018 - 17:28 नवीन
मला खरंच स्वप्न का पडत नाही हा मोठा यक्ष प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे . मी सध्या त्याचे उत्तर शोधतोय पण अजून काही सापडले नाही आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

भाग्यवान आहात.

चित्रगुप्त
Fri, 04/27/2018 - 05:23 नवीन
मी स्वप्न पाहत नाही... कारण , मला ते पडत नाही
-- भाग्यवान आहात.
मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा .... निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा
.... अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद चित्रगुप्त साहेब .

खिलजि
Mon, 04/30/2018 - 17:59 नवीन
धन्यवाद चित्रगुप्त साहेब .
  • Log in or register to post comments

कविता आवडली. वेगळा विचार जरा

पद्मावति
Mon, 04/30/2018 - 18:27 नवीन
कविता आवडली. वेगळा विचार जरा हटके.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पद्मावती ताई

खिलजि
Wed, 05/02/2018 - 13:11 नवीन
धन्यवाद पद्मावती ताई सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा