जपमाळ
हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते
मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,
आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते
खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते
सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे
हसरे सारेच होते
-शैलेंद्र
अशक्य सुंदर का काय ते...
+१
धन्यवाद
@प्रचंड आवडली!!
अप्रतिम
धन्यवाद
अतिशय सुरेख.
धन्यवाद पद्मावती
खुपच सुंदर.
मनापासून आभार
सुरेख!
_/\_ पैसाताई
अगदी
अगदी
_/\_
हेही असेच होते, तेही तसेच
प्रेरणा असं नाहही, कारण पूर्ण
छान.
धन्यवाद
मस्त कविता,
हो, मस्त आयडिया,
क्या बात रे
थँक्स साहेब
छान, आवडली कविता
धन्यवाद
सुरेख!
धन्यवाद
जबरदस्त आवडली
भारी ओ... अजून लिहा..!!
सगळ्यांचे आभार
कविता आवडली
छान ..!! खूप आवडली ..