हातोळे

सूड's picture
सूड in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

हातोळे
बदलापुरात अनंत हलवायाकडे श्रीखंड घेताना एकदा हा पदार्थ दिसला होता. खायला अगदी चविष्ट वाटला. खाताना, त्यात काय काय असावे याचा अंदाज घेत केलेली ही पाकृ.
साहित्यः

  • साजूक तूप (मोहन आणि तळणीसाठी)
  • मैदा साधारण एक वाटी
  • साखर/पिठीसाखर एक वाटी
  • खवा २५० ग्रॅम
  • वेलदोडे
  • सुका मेवा


कृती:
सारणासाठी खवा एका जाड बुडाच्या पातेलीत परतायला घ्यायचा. परतून साधारण तो असा दिसायला लागला की गॅस बंद करून त्यात आवडीप्रमाणे साखर दळून मिसळावी

ते थंड होईपर्यंत मैद्यात त्याच्या अंदाजे पाव भाग साजूक तूप गरम करून मोहन घालावे आणि घट्ट मळावे. गोळा साधारण असा दिसायला हवा.

मैद्याच्या सारख्या आकाराच्या लाट्या लाटून, एका लाटीत खव्याचे सारण भरावे आणि दुसरी लाटी त्यावर ठेवून पाण्याचे बोट फिरवून कडा नीट बंद कराव्यात. नंतर त्याला मुरड घालून हातोळे साजूक तुपात तळून घ्यावेत.

हातोळे तयार आहेत.

त.टी: ओरिजनल पाकृत हातोळे, चिरोटे पाकात घालतात तसे केले होते. हे मी वेळेअभावी थोडक्यात केलंय ;)

प्रतिक्रिया

जुइ's picture

20 Oct 2017 - 12:03 am | जुइ

फोटो दिसत नाही.

एकच लंबर रे सुडुक,
मस्त जमलंय

जुइ's picture

20 Oct 2017 - 12:43 am | जुइ

व्हिडीयो आता पाहिला. मुरड घातलेले हातोळे फारच सुंदर दिसत आहेत. पाकृ आवडली!

राघवेंद्र's picture

20 Oct 2017 - 1:28 am | राघवेंद्र

सूड भाऊ एक नंबर !!!
मस्त झाले आहेत हातोळे

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 2:27 am | पद्मावति

क्लासच!

निशाचर's picture

20 Oct 2017 - 3:22 am | निशाचर

मस्त पाककृती

सविता००१'s picture

20 Oct 2017 - 8:05 am | सविता००१

अरे यालाच चंद्रकला पण म्हणतात ना?
फार सुरेख मुरड जमली आहे रे.
मस्त दिसताहेत हातोळे

पुंबा's picture

1 Nov 2017 - 5:49 pm | पुंबा

बरोबर!
मीदेखिल हा अपदार्थ चंद्रकला म्हणूनच खाल्ला आहे.
बाकी, पाकृ जबरी!

फार सुरेख मुरड जमली आहे रे.

धन्यवाद्स

अरे यालाच चंद्रकला पण म्हणतात ना?

पुण्यात म्हणत असतील तर माहीत नाही. जिथे लिंबू पिळलेला गुलाबजामचा पाक सुधारस असतो, फोडणीची पोळी मणिकपैंजण असते तिथे हातोळे चंद्रकला झाले तर नवल नाही.

आता दिसतायेत का फोटो की अजूनही नाही?

एस's picture

20 Oct 2017 - 5:57 pm | एस

फोटो दिसत नाहीयेत.

सविता००१'s picture

20 Oct 2017 - 6:15 pm | सविता००१

फक्त व्हिडिओ दिसतोय

नूतन सावंत's picture

20 Oct 2017 - 7:03 pm | नूतन सावंत

अनंत हलवाईकडली हातोली हा आवडीचा पदार्थ आहे,कल्याणला गेलं की तिथे एक फेरी त्याच्या मूळ दुकानात असतेच.
फोटो दिसत नाहीयेत ,फक्त व्हिडीओ दिसतोय.तोही अर्धवट.

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2017 - 7:13 pm | पिलीयन रायडर

व्हिडीओ का अर्धवट दिसतोय? मी तर एकदम कमी साईझ करुन अपलोड करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे ब्राऊज करताना काही त्रास होऊ नये.

नक्क्की काय अडचण आहे ताई ? सांगतेस का? म्हणजे मी बघते दुरुस्तीचं...

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2017 - 7:07 pm | पिलीयन रायडर

मला फक्त व्हिडीओ दिसतो. पण चालतंय.

काय ती नजाकत आहे मुरड घालण्यात!!! वाह!! मी थक्क झालेय तो फोटो पाहुन. फार सुंदर काम करतोस रे तू सूड!

पगला गजोधर's picture

20 Oct 2017 - 7:26 pm | पगला गजोधर

मस्त

ओक्के, यांना हातोळे म्हणतात हे माहित नव्हते. मला वाटायचे की उत्तरप्रदेशी लोकांची करंजी आहे. हा प्रकार हलवायाकडे पाहिलाय.
पाकृ आवडली. तू म्हणतोयस तशी पाकातली रेसिपी पाहिल्याचे आठवतेय.

सर्वांचे आभार. मी फोटो पब्लिक फोल्डर मध्ये वैगरे टाकण्याचे सर्व उपाय करुन आता हात टेकले आहेत. त्यामुळे आता दिसले तर ठीक नाहीतर के सेरा सेरा. :)

तुम्ही फोटो गुगल फोटोंवरून टाकले आहेत. ते ब्राउजरमधून उघडायला गेल्यास गुगल साइन इन करायला लावतं. याचा अर्थ फोटो पब्लिक नाहीयेत अजूनही. हे फोटो एका अल्बममध्ये हलवा आणि संपूर्ण अल्बम व प्रत्येक फोटोला पब्लिक अॅक्सेस द्या. हे झाल्यावर सर्व फोटोंच्या लिंका द्या सासं ना.

फारच देखणे दिसताहेत हातोळे ! करंजीचा भाऊ असावा असे वाटतेय.

किसन शिंदे's picture

23 Oct 2017 - 12:49 pm | किसन शिंदे

मस्त दिसताहेत हातोळे. ती मुरड बोटांनी केल्याचं जाणवत नाही इतकी सुरेख दिसतेय.

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2017 - 8:13 pm | स्वाती दिनेश

व्हिडिओ मध्ये बघितले, सुरेख दिसत आहेत. मुरड अगदी सुबक घातली आहेस.
फोटोंचा गणेशा झाला आहे.
पाकृ मस्तच!
स्वाती

स्रुजा's picture

23 Oct 2017 - 9:48 pm | स्रुजा

फार च सुरेख झालेत ! मुरड घालण्याचं कसब तर अगदी मुरलेल्या सुगरणीचं.... सुंदर !!