✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

..........पापनिष्ठ ?

अ — अरूण गंगाधर कोर्डे, Tue, 08/15/2017 - 12:52
देव पाप्यांशी धार्जिणा जैसी गाय कसाबाशी पुण्यवान कष्टती जगी दर्शन भासेही न पावती रावणे राम पाहिला शिशुपाले कृष्ण जैसा कंस तो भाग्यवान कालिया सहजी उद्धरला संभ्रमात साधुजन व्हावे पुण्यनिष्ठ की पापनिष्ठ ? भेटे देव तामसियांशी सर्वाआधी ..... सामान्य जन तीर्थाशी जाती लक्ष्मिचा अपव्यय करिती संसार व्यवहारी कष्टती अकारण जन्मोजन्मी गंगाधरसुत म्हणे प्राधान्य तिमिराशी जगी मैत्री वाढवावी घट्ट तयाशी

प्रतिक्रिया द्या
1020 वाचन

💬 प्रतिसाद (1)

रचना उत्तम पण आशयाशी सहमती नाही

धर्मराजमुटके
Tue, 08/15/2017 - 14:44 नवीन
कवितेची रचना उत्तम आहे पण आशयाशी सहमत नाही. कवितेत उल्लेखिलेल्या सर्व दुष्टांचे पाप जास्त झाल्यावर भगवंताने त्यांचे निर्दालन केले आहे. शिवाय यातील बहुतेक खलनायक एकेकाळी उत्तम भक्त होते मात्र नंतर ते मदोन्मत्त झाले तेव्हा त्यांचा संहार झाला आहे. 'जैसी गाय कसाबाशी' हे वाक्य तुम्हाला जैसी गाय कसायाशी' असे लिहायचे होते का ? किंवा कसायालाच काही ठिकाणी 'कसाब' म्हणतात काय ? माझा बोलीभाषांचा तितकासा अभ्यास नाही म्हणून छोटीशी शंका. लिहित रहा !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा