रोजचं जगणं 'थ्रीलिंग' व्हावं यासाठी तुम्ही काय करता?????
लहान असताना आपल्याला जगण्यात थ्रील यावे म्हणून फार काही वेगळे करावे लागत नाही.लहानपणीचे कुतुहल,मोठ्यांचे अटेंशन,वेगवेगळे खेळ ,भुतांच्या गोष्टी अन काय अन काय.हा काळ खूपच सुखाचा असतो.अनेक गोष्टी नव्याने माहीत होत असतात,कसलीही भ्रांत नसते, त्यामुळे रोजचा दिवस आनंदाचा असतो(बर्याचदा).
थोडे मोठे झाल्यावर ,कॉलेजला गेल्यावरही आयुष्य बर्याचदा थ्रीलींग वाटते.विरुद्धलिंगी आकर्षंण ,मुव्हीज,फॅशनेबल राहणे,खाणे ,नवीन ठीकाणी फिरणे हे होत असते.नवतरुण असल्याने उत्साह दांडगा असतो.
पण जसे आपण शिक्षण सोडून नोकरी धंद्याला लागतो तसे आयुष्य साचून रहायला लागते.नाही म्हणायला लग्न झाल्यावरचे काही दिवस आनंदाचे असतात.यात लैंगिकता हा भाग आहे पण तो इथे विषय नाही.तर, हे साचलेपण यायला लागल्यावर आयुष्य कुबट होऊ लागते.जसा एखादा ओढा आटून त्याचे ड्बके झाल्यावर वास मारायला लागते तसे आपले आयुष्यही वास मारायला लागते.कसलेही थ्रील राहत नाही.
मी गेल्या काही वर्षात या परीस्थीतीतून गेलो आहे.अजुनहि बरेच साचलेपण आहे पण् आता मी त्यावर मात करायला शिकलो आहे.
मी काय केले----
१.माझी ट्रेकिंगची आवड मी पुन्हा नव्याने जोपासली.पण वेगळ्या कोनातून.
सोलो ट्रेकींग ....
मित्रांबरोबर ट्रेकींगला जाण्याऐवजी मी काही दिवसांपुर्वी दोन सोलो ट्रेक केले.एकट्याने निबीड अरण्यात फिरताना येणारा रोमांच अवर्णनीय आहे.एक वेगळीच झिंग याने येते .याची कल्पना बेअर ग्रील्सच्या मॅन vs वाइल्डवरुन मी उचलली.एकट्याने ट्रेक करण्यात धोके आहेत,पण तेच मला हवं आहे.जिथे धोका आहे तिथेच थ्रीलही आहे.
२.बाईकींगची आवड मी गेल्या काही वर्षांपासुन जोपासली आहे.माझ्या वडीलांची जुनी य्झदी बाईक मी दुरुस्त करुन् आणली.इतर गाड्या सायलेंटली जात असताना त्यामधुन वेगाने माझी यझदी धाssडधाssड आवाज करत नेण्यात एक वेगळेच थ्रील वाटते.परत ३००cc ची पावर अनुभवने हा एक वेगळाच आनंदाचा प्रकार वाटतो.
३.दारु मी कधीतरीच पितो .पुर्वी बिअर प्यायचो पण वजन वाढण्याचा धोका असल्याने हार्डड्रींक सुरु केले.पण महागडे हार्ड ड्रींक पिण्यापेक्षा मी दर आठवड्यातुन एकदा देशी दारु घेतो.नाक दाबून ती जहाल कडवट चवीची दारु प्यायची,व नंतर येणारी नशा अनुभवने फारच थ्रीलिंग वाटते.(गटारात लोळत नाही,पण एकदा लोळायचे आहे)
तंबाखु खात होतो पण त्यात काय मजा नाही म्हणून ती सोडून सिगरेट व नंतर बिडीवर आलो आहे.आवडत्या जागी आवडत्या पेया सोबत बिडीचे झुरके घेण्यात एक वेगळीच बेफीकीरी वाटते.(लेखक व्यसनांचे समर्थन करत नाही,दारु,तंबाखुचे व्यसन आरोग्याला घातक आहे.)
४.आमचे रान जिथे आहे तिथल्या ओढ्यांवर सध्या नालबंडींगचे काम चालू आहे.लोक सहभागातून.मी त्या कामात वेळ मिळेल तेव्हा मदत् करतो.गरीब ,पण रानगट कष्टकरी लोकांबरोबर काम करणे ,त्यांचे छंदीफंदी वागणे ,त्यांच्याकडून बाहेरख्यालीचे किस्से ऐकणे(स्वतःच्या आयुष्यात अंमलबजावणी चालू आहे.).हा एक वेगळा अनुभव देऊन जातो.आपले मराठी मध्यमवर्गीय आयुष्य काहि काळ विसरता येते.
तर मित्रहो, सध्यातरी आयुष्य spice up करण्यासाठी ,थ्रील येण्यासाठी मी हे धंदे करत आहे.यात काही ठीकाणी अनैतिकता जरुर आहे.पण मराठी मध्यमवर्गीय आयुष्य आपल्याला फार काही थ्रील देऊ शकत नाही या मतापर्यंत मी आलेलो आहे.
तर तुम्हाला काही प्रश्न.
१.तुमच्या आयुष्यात साचलेपण आले आहे असे तुम्हाला वाटते का?
२.आयुष्याचा प्रत्येक दिवस थ्रीलिंग असावा असे तुम्हाला वाटते का?
३.रोजच्या जगण्यात थ्रील यावे यासाठी तुम्ही काय करता?
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एकदा कोकेन आणि हेरॉईन पण घेऊन
ये नाय चॉल्बे.फुकट किंवा
व्यसनातून थ्रील येते असा माझा
कोण म्हणतं पैसे लागतील?
नि:शब्द
मी पडेपर्यंत
ह्याह्याह्या!
=)) =)) =))
;):):)
ए, ए, ए नाय चॉलबे...!
=))
मी सासू सासर्यांना रहायला बोलावून घेते! =))
मग!
मी सासू सासर्यांना रहायला
मी सासू सासर्यांना रहायला बोलावून घेते! =))हे सासू सासऱ्यांसाठी थ्रिलिंग आहे. यात स्वतःला थ्रिलिंग कसे वाटेल?नाय ओ!
टफि, शिका यातून काही.
हे सासू सासऱ्यांसाठी थ्रिलिंग
रोज एक नवीन फालतू धागा
३.रोजच्या जगण्यात थ्रील यावे
मिपा वाचते
मिपा...
आंतरजालावर इतके बिनधास्त आणि
आय डिफर.थ्रील हे वन टाईम असते
माझी यझदी धाssडधाssड आवाज करत
विषयाला धरुन हा पहीला
असं कसं असं कसं?
पण महागडे हार्ड ड्रींक
@खरे ,थ्रील आणि थ्रेट यातला
रोजचं जगणं 'थ्रीलिंग' व्हावं
मी सकाळ सकाळी आईला तिला
टफी
फेसबुकवर सारकॅझम सोसायटी,
नानासाहेब,
आठवडाभर
नाकात अडकलेलं कडक, हटवादी मेकूड काढण्यात पण थ्रिल आहे ....
:-))))
'थ्रील' (मराठीत 'झिंग' चालेल
प्रत्येक दिवस?
फुकट सल्ला
थोडी सुधारणा...
व्हाट्स अप वर नाँनवेज विनोद
काई उपेग न्हाय. कोनिच
सहमत
मुंबईत रोज कारने कामावर जातो.