लठ्ठपणा आणि आपली जीभ !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
5 Aug 2017 - 12:08 pm

लठ्ठपणा ही ही सध्या जगभर भेडसावणारी समस्या आहे. त्याची कारणे आणि त्यावरील उपाय यावर सतत संशोधन होत असते. अलीकडे एक मजेदार संशोधन वाचले. काही स्थूल व्यक्तींना अति गोड खाण्याची सवय असते. त्याची काही कारणे आहेत त्यात अजून एकाची आता भर पडली आहे.

आपल्या जिभेवर निरनिराळ्या चवींचे ज्ञान देणाऱ्या ‘चव-कलिका’ (taste buds) असतात. काही स्थूल व्यक्तींच्या बाबतीत या कलिका ‘मंद (dull)’ झालेल्या असतात. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्याला तृप्ती आणि आनंदाची भावना होते. पण जर त्या कलिका मंद असतील तर ती भावना लवकर होतच नाही. त्यामुळे अशी व्यक्ती ही प्रमाणाबाहेर गोड खाऊ लागते. परिणामी वजन वाढत जाते.

अशा व्यक्तीच्या बाबतीत तिचा हा ‘खादाडपणा’ हा या कारणामुळे तिच्या अनिच्छेने होतो.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

7 Aug 2017 - 8:45 am | ज्योति अळवणी

उत्तम माहिती. आता चव कालिका स्ट्रॉंग करण्याचे तंत्र विकसित होण्याची वाट पाहूया

बरोबर. लठ्ठपणा हा संशोधनाला भरपूर वाव असलेला 'लठ्ठ' विषय आहे ☺