आकाशवाणी वरील जुने कार्यक्रम कुठून/कसे मिळवायचे?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
15 Jun 2017 - 8:45 am
गाभा: 

युट्युब वर "old radio" असे शोधल्यास बरेच इंग्रजी कार्यक्रम सापडतात (जसे की वेगवेगळ्या पुस्तकांची वाचने, नाटक , मुलाखती वगैरे) . बीबीसी तर आपले जुने कार्यक्रम ऑडिबल वर "ऑडिओ बुक" म्हणून विकताना दिसते.

आपल्या भारतीय आकाशवाणीवरही असे बरेच कार्यक्रम स्वातंत्र्य मिळाल्यापासून (किंवा त्या आधीही) होत आहेत. पण ते कधी पब्लिक डोमेन मध्ये सगळ्यांसाठी खुले असताना दिसत नाहीत. म्हणजे - भारताला स्वातंत्र्य मिळत असताना रेडिओवर काय बातम्या देत होते किंवा ३० वर्षांपूर्वी रेडिओवर कोणत्या पुस्तकाचे झालेले वाचन किंवा पु ल देशपांडेंचा रेडिओवर एखाद्या कार्यक्रमात असलेला सहभाग.. अशा अनेक गोष्टी/रत्ने अजूनही आकाशवाणीच्या अर्काइव्ह मध्ये धूळ खात पडलेल्या असतील.

http://allindiaradio.gov.in/Profile/Pages/Archives.aspx# या लिंक वर गेले असता असे दिसते की त्यांनी शास्त्रीय संगीताचे बरेच कार्यक्रम अरकाईव्ह मधून काढून सामान्य लोकांसाठी उपलब्ध केले आहेत (त्यांच्या सीडी / डीव्हीडी विकतात).

जर इतर जुने (सांगीतिक नसलेले) कार्यक्रम / बातम्या आकाशवाणीवरून मिळवायचे असतील तर काय करावे लागेल? कोणाला या प्रोसेस चा अनुभव आहे का?

धन्यवाद.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

15 Jun 2017 - 11:06 am | मराठी_माणूस

शास्त्रिय संगीत, सातत्याने , नियमीतपणे फक्त आकाशवाणीवरच लावले जाते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांच्याकडे याचा खुप मोठा संग्रह आहे. सध्यातरी, ते प्रक्षेपीत करतील तेंव्हा ऐकणे एव्हढेच हातात (कानात ?)आहे. आकाशवाणी ने ते नेट वर उपल्ब्ध करुन दिले तर फार चांगली सोय होईल.

कोणता कार्यक्रम केव्हा लावणार हेसुद्धा दोन दिवस अगोदर सांगत नाहीत ही मुजोरी आहेच.

मराठी_माणूस's picture

15 Jun 2017 - 2:54 pm | मराठी_माणूस

१००% सहमत. संध्याकाळी ५.३० ते ६ ही शास्त्रिय संगीताची वेळ बदलुन ५ ते ५.३० केली ते समजलेच नाही.
दुसरे म्हणजे सकाळी १० ते १०.३० आणि १०.३० ते ११ ह्या वेळात फक्त सकाळचेच राग लावले जातात तसेच संध्याकाळी फक्त संध्याकाळचे. रागांच्या वेळा जरी ठरलेल्या असल्या तरी तो काही नियम नाही. वर्षानुवर्षे तेच ते राग ऐकवले जातात . त्यात हे फक्त MW वरच ऐकता येतात. त्यामुळे आवाजाची गुणवत्ता FM सारखी नसते.

संजय क्षीरसागर's picture

15 Jun 2017 - 3:00 pm | संजय क्षीरसागर

शिवाजीनगर बस स्टॉपला उतरलात की सिमला ऑफिस चौकात पुणे आकाशवाणीचं ऑफिस आहे. वेळ काढून तिथे जा, नक्की माहिती मिळेल.

माहितीसाठी धन्यवाद! त्यांचे ऑफिस गाठल्याशिवाय पर्याय नाही असे वाटते..