वासरे मारली जात असताना ....

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
1 Jun 2017 - 9:36 pm
गाभा: 

वासरू मारते आहे ...

गाय हा एक उपयुक्त पशु आहे हे विधान 'आम्हांला ' अमान्य आहे. ह्याचा अर्थ आम्ही सनातन आहोत असा नाही. गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात हे ही आम्हास मेनी नाही. तसे आम्हाला कुणाचे काहीही पटत तथा आवडत नाही. आम्हाला मात्र स्वतः:ला 'आम्ही ' असे बहुवचनी संबोधणे प्रिय आहे. आम्ही एक नाममात्र नामांकित संपादक आहोत. सं पादक असल्याने दुर्गंधीयुक्त स्वमतांचा पुकार करत राहणे हा आमचा स्वभाव आहे. आता वासरू मारले गेले आहेच तर गाय वासरावर एक म्रुत्यु लेख लिहिणे क्रमप्राप्त आहे.

धूर्त कोल्हयाने जंगलाचा ताबा घेतल्यापासून अनुदाने , भत्ते , परदेश दौरे बंद केले आहेत. कोल्ह्याचे ह्या असहिष्णू कृत्याचा आम्ही गेल्यावर्षी आमची पदमश्री परत करून निषेध केला. आता तर इतकी असहिष्णुता पसरली आहे कि आमची १० वी /१२वी च्या मार्कलिष्ट सुद्धा परत कराव्या म्हणतोय. पण हल्ली त्याला कोणी हिंग लावून विचारेना . आता परत गाय किंवा वासरू किंवा बैल म्हणजेच गो-वंशाचे राज्य यावे ह्याकरता आमचे देव पाण्यात ठेवले आहेत.

देशावर देशी गायीचे राज्य होते तेंव्हा आम्ही उपसंपादक होतो. वारांगना पदराआडून सुद्धा आपली स्तनमंडळे मोठ्या खुबीने दाखवतात तशीच आम्ही आमच्या लेखातून विरोधकांच्या टोकाच्या विरोधातून गो-वंशाची स्तुती करत होतो. ह्याचा परिपाक म्हणून २ वेळेला दिल्ली , एकदा बंगलोर आणि एकदा ऱ्होडेशिया देशांचा अभ्यास दौरा करन्याची संधी मिळाली . पुढे देशी गायीने जंगलात आतंक माजवला. सिंह , वाघ , हत्ती , घोडे ह्यांना डांबून ठेवले गेले. तितर आणि कबुतरांचे फिरणे आणि बोलणे बंद केले. आम्ही गायीच्या ह्या कृत्याचे जोरदार समर्थन केले आणि पदमश्री मिळवली . त्या गायीचे वासरू नंतर अपघातात वासरू मेले आणि पुढे गायीचीच हत्या झाली . गोहत्या म्हणजे पाप , महापाप ! ही अस्सल देशी गाय गेली आणि तिचे विदेशी वासरू जंगल चे राज्य करू लागले. ह्या वासराला लांडग्यांनी घेरले. ह्या ही वासराची हत्या झाली आणि आमचा थरकाप उडाला . २ वासरे अशी हकनाक मारली गेली. अजून आमचे १५० देश मुख्य म्हणजे अमेरिका कि जिथे आमचे चिरंजीव असतात फिरणे बाकी होते. पदमविभूषण नाही पण भूषण तरी हवेच हवे . तेही बाकी होते. आणि २ उमदी वासरे मारली गेली होती. पण आम्ही हिम्मत गमावून थोडीच बसणार होतो ? जर्सी गाय राजकारणात आली आणि आम्ही तिच्या चार पेंडीची सोय जमवू लागलो. तिचे वासरू लहान होते , अल्लड होते , अनपढ होते आणि म्हणून तिने हुशारीने हुशार नंदीला राजा बनवले. नंदीने आम्हास भरभरून दिले ! चर्चासत्रे , अनुदाने , पुरस्कार , लेखनाला विषय , पैसा असे सगळे मिळाले आणि -
घात झाला . कोल्ह्याने राज्य बळकावले , जंगलचा कायदा , जंगलाची नीती सगळे सगळे पायदळी तुडवायला लागला तो कोल्हा. ह्या कोल्ह्याचा त्रास आणि वासरू अल्लड आणि लहान अश्या दुहेरी कात्रीत जंगल आहे. सुखी आहे पण आम्ही विचारवंत मात्र त्रस्त आहोत.

आता तर हद्द होते आहे. वासरू प्रत्येक लढाई हारून भाग-प्रभागातून पळून येते आहे. गायीचे वासरावर /वारसावर लक्ष नाही , आणि वासरू रोज कोल्याकडून मार खाते आहे.

परवा एका प्राण्याने दक्षिणच्या जंगलात प्रातिनिधिक वासरू मारले आणि आता संपले ह्या निष्कर्षशा पर्यंत आम्ही येते झालो. वासरू हेलपाट्याने मसणारच होते , मुद्दाम मारण्याची काहीही गरज नव्हती . पण लक्ष्यात कोण घेतो ?

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2017 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

आमची १० वी /१२वी च्या मार्कलिष्ट सुद्धा परत कराव्या म्हणतोय.

छ्या, छ्या ! ह्ये आसं कायबी करू नगा. खासकरून १० वी/१२वी फेल आसाल मंग तर आज्याबात नगा. याटिकानी हे सांगने कारन की, तुमी योग्य आसामीला भ्येटा, कुटंना कुटं चिटकवून देत्याल बगा...

(चित्र कायप्पावरून साभार)

अनन्त अवधुत's picture

2 Jun 2017 - 12:02 am | अनन्त अवधुत

.

अनन्त अवधुत's picture

2 Jun 2017 - 12:02 am | अनन्त अवधुत

जबरी लिहिले आणि खरे लिहिले.

स्पा's picture

2 Jun 2017 - 8:56 am | स्पा

लोल, कडक हाणलान

नि३सोलपुरकर's picture

2 Jun 2017 - 2:00 pm | नि३सोलपुरकर

एकदम कडक " तर्री ''.

नंदू's picture

5 Jun 2017 - 7:25 am | नंदू

जबरदस्त लिहिलंय!

टर्मीनेटर's picture

7 Jun 2017 - 7:52 pm | टर्मीनेटर

झकास...