कामगार संघटना

शेवटचा डाव's picture
शेवटचा डाव in काथ्याकूट
31 May 2017 - 8:43 am
गाभा: 

माझा एक मित्र एका pvt. Ltd. कंपनीत नोकरी करतो . तिथली मॅनेजमेंट त्याचा म्हणण्यानुसार खुपच जाचक नियम व अटी लावते आहे . म्हणून त्याना तिथे कामगार संघटना ऊभी करायची आहे त्या विषयी माहिती व मार्गदर्शन हव आहे .
1)संघटना कशी तयार करावी
2)कायदेशीर बाबी
3)कंपनी काय अ‍ॅक्शन घेऊ शकते
4)कंपनी त्यांची संघटना फेटाळून लावु शकते का ?
5)जर कोणी प्रायव्हेट सेक्टर मध्येे मध्ये असेल तर त्यांच मार्गदर्शन
6)वकीलांांच मार्गदर्शन
7)काय मागण्या कराव्या

प्रतिक्रिया

Ranapratap's picture

1 Jun 2017 - 7:53 pm | Ranapratap

कामगार संघटना शक्यतो नकोच. आज कालचे नेते फक्त स्वतः पुरते पाहतात. व्यवस्थापनाशी बोलून सामोपचाराने मार्ग काढा. HR विभाग ऐकत नसेल तर थेट संचालकाशी बोला, निनावी पत्र लिहा, त्यामध्ये अधिकारी लोकांची मन मणी कशी चालते ते लिहा पोकळ आरोप करू नका. पुरावा असतील, पटतील असे लिहा.

पैसा's picture

1 Jun 2017 - 9:32 pm | पैसा

https://en.wikipedia.org/wiki/Trade_unions_in_India इथे बर्‍याच युनियन्सची लिस्ट आहे. त्यातल्या तुमच्या मित्राच्या प्रकृतीला पटेल आणि परवडेल त्या युनियनशी संपर्क करून बघा. स्वतंत्र युनियन बांधण्यापेक्षा एखाद्या पक्षाच्या युनियनशी संलग्न असणे जरा जास्त फायद्याचे असते.