श्रावण मोडक आणि मिपा

IT hamal's picture
IT hamal in काथ्याकूट
30 May 2017 - 2:58 pm
गाभा: 

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली ... मिपा होमपेज वर दिलेल्या लिंकवरून त्यांचे सारे लेख पुन्हा वाचले.. ९/१० वर्षापूर्वीचे मिपा पुन्हा अनुभवले. छान वाटले . त्यावेळचे बरेच id ( ब्रिटिश टिंग्या...तात्या.. सोत्री ..गुगळे .... इत्यादी ) आजकाल मिपावर active नाहीत . मी ८/९ वर्षांपासून मिपा वाचतोय.. बरेच नवीन लेखक आलेत आणि त्यातले बरेचसे लोक खूप चांगले लिहिताहेत..तसेच डबक्यात दगड मारून ही स्वतःवर चिखल उडू न देणारेही ( ते id स्वतः तरी किमान तसे समजतात) खूप वाढलेत.. सहज मनात आले म्हणून हे निरीक्षण इथे टाकतोय.. कुणी अंगावर ओढून घेऊ नये ही विनंती..... मित्रांनो तुम्हाला ही मिपावर झालेले अनेक बदल लक्षात आले असतील ..तर त्यातले कुठले बदल तुम्हाला आवडलेत वा खटकलेत?

प्रतिक्रिया

मला वाटलं तुम्ही कै. श्रावण मोडक यांच्या मिपावरील लेखनाबद्दल वगैरे काहीतरी लिहाल. त्यांच्या लिखाणाचा आवाका त्यांच्या अनुभवविश्वाप्रमाणेच विस्तृत आणि समृद्ध होता. त्यांच्या 'काही नोंदी अशा-तशा' या लेखमालिकेचे भाग परवाच परत वाचून काढले होते. त्यांच्या 'पर्स्पेक्टिव्ह' ला निश्चित मिस करत आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!

असो. लेख वाचून अंमळ निराशा झाली. कृपया राग मानू नये ही विनंती!

मला वाटलं तुम्ही कै. श्रावण मोडक यांच्या मिपावरील लेखनाबद्दल वगैरे काहीतरी लिहाल. उत्सुक्तेने वाचायला अलो तर भलतचं.

लेख वाचून अंमळ निराशा झाली. कृपया राग मानू नये ही विनंती!

खरचं

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2017 - 8:11 pm | प्रकाश घाटपांडे

श्रावण मोडक यांचे लेखन नवीन लोकांना उपलब्ध करुन द्यावे.लिंक द्या

मारवा's picture

30 May 2017 - 8:23 pm | मारवा

अहो वर बघा की
संस्थळाच्या कपाळावर च दिलेली आहे ना लिंक
कि मलाच तृतीय नेत्र दिसतोय ?

प्रकाश घाटपांडे's picture

31 May 2017 - 9:36 am | प्रकाश घाटपांडे

होय मला दिसली नाही. पण लेखातही असावी असे वाटले.