✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

स — सत्यजित..., Wed, 04/19/2017 - 01:49
कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे! खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे! मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे! अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे! वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
2630 वाचन

💬 प्रतिसाद (8)

छान कविता.

एस
Wed, 04/19/2017 - 04:55 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

फार सुंदर!

प्राची अश्विनी
Wed, 04/19/2017 - 06:54 नवीन
फार सुंदर!
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 04/19/2017 - 09:30 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

मस्तचं !

मोनाली
Wed, 04/19/2017 - 10:13 नवीन
मस्तचं !
  • Log in or register to post comments

सुंदर.. तुमच्या कवितांतली

पुंबा
Wed, 04/19/2017 - 10:43 नवीन
सुंदर.. तुमच्या कवितांतली शब्दकळा अन प्रतिमा टवटवीत वाटतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Wed, 04/19/2017 - 15:28 नवीन
धन्यवाद...एस,प्राची अश्वीनी,पैसा,मोनाली,सौरा विशेष!
  • Log in or register to post comments

अनवाणी फिरल्यावर कळली ऊब

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/19/2017 - 20:55 नवीन
अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे!
Image removed.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद!

सत्यजित...
गुरुवार, 04/20/2017 - 06:11 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा