गणेशोत्सवाचे नवनिर्माण

मी-सौरभ's picture
मी-सौरभ in काथ्याकूट
12 Sep 2016 - 5:14 pm
गाभा: 

सध्या सगळिकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे. ते बघुन मला काही प्रश्न पडले आणि ते ईथे चर्चेला यावेत अशी ईच्च्छा झाली म्हणून हा धागा.
१. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का?

२. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्‍या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अ‍ॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का?

३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई. गोष्टींचा अपव्यय झाल्याचे बर्‍याच वेळा पाहण्यात येते, त्यावर काय ऊपाय करता येइल?

ज्यांना या विषयावर चर्चा करायची आहे त्यांचे या धाग्यावर स्वागत आहे.

बाकीच्यांच्या अनुपस्ठितीबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

12 Sep 2016 - 5:21 pm | महासंग्राम

चुकून महानिर्वाण वाचलं...

१.गणेशमूती धातूची काय किंवा पाषाणाची काय, निर्माल्य साठणारच. सबब निर्गुण, निराकार स्वरुपाचे ध्यान करावे.

२. पुरोहित केवळ मध्यस्थ असतो. तेव्हा app वापरून किंवा चातुर्मासाचे पुस्तकातील विधी वाचून पूजा करता येउ शकते.

३. उरलेल्या फ़ुलांचा वापर ख़त म्हणून करावा. मिठाई आणि जेवणासाठी घरी मित्रमंडळींना बोलवावे किंवा फ़क्त घरातील व्यक्तींइतकेच अन्न बनवावे.

रुस्तम's picture

12 Sep 2016 - 6:41 pm | रुस्तम

सहमत

अंतरा आनंद's picture

12 Sep 2016 - 6:07 pm | अंतरा आनंद

मानसपूजा करावी.

टवाळ कार्टा's picture

12 Sep 2016 - 6:25 pm | टवाळ कार्टा

मा.मो.ऑन

फक्त मनात नाव घेतल्यानेसुध्धा नमस्कार पोचतो हो असे आमच्या(च) ह्यांचे मत...पण मलासुध्धा पटते बै ते...आजकाल नुस्ता गोंगाट आणि हिडिसपणा चालू आहे...

बाकी सध्ध्या दुसर्या आयडीने लॉगिन असल्याने वयोमानानुसार मिपावर यायला जमत नाही त्याबद्दल वैट्ट वाटून घेउ नका...अत्ता टकामार्फत प्रतिसाद पाठवला आहे तसा आमच्या(च) ह्यांचे मत अधूनमधून कोणानाकोणाकडून जरुर पाठवत जाईन

मा.मो.ऑफ

मी-सौरभ's picture

12 Sep 2016 - 6:36 pm | मी-सौरभ

=))

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 6:57 pm | फेदरवेट साहेब

१. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का?

मूर्ती फक्त शाडूची अन ठराविकच उंचीची असावी, हे न ऐकणाऱ्या मंडळाच्या मेंबर अन खास करून आधारवड अध्यक्ष महोदयांना नेमक्याजागी पोकळ बांबूचे फटके देण्यात यावे. ह्याने पैसा वाचेल , उरलेला पैसा गरीब लोकांत किंवा गरीब वस्तीत लोकोपयोगी कार्यक्रम करायला उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप वगैरे करायला वापरला जावा, सीएसआर प्रमाणे ह्या मंडळांवर ठराविक रक्कम लोकपयोगी कामात खर्च करणे सक्तीचे करावे

२. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्‍या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अ‍ॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का?

मनापासून गणपती बसवतात हे काय कमी आहे, बाकी अर्थवशीर्ष ते आरती कॅसेट लावून (कमी आवाजात) वाजवली तरी काय फरक पडतो??

३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई. गोष्टींचा अपव्यय झाल्याचे बर्‍याच वेळा पाहण्यात येते, त्यावर काय ऊपाय करता येइल?

नाही ते फुले सजावट मखर अन मांडवापर्यंत ठीक आहे हो, उगा प्रसाद अन मिठाईवर नका घसरू बुआ, नाही ह्या सणांच्या दरम्यानच तर आम्हा कुत्रे मंडळीला थोडे गोडाधोडाचे चाखायला मिळते म्हणून म्हणले हॅ हॅ हॅ हॅ हॅ

जेपी's picture

12 Sep 2016 - 8:07 pm | जेपी

हे सगळ करायलाच पाहिजे का ?
मी स्वत: घरातील गंपती बसवणे बंद केलय.
सार्वजनीक मंडळांना देणगी देत नाही.

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 8:09 pm | फेदरवेट साहेब

तुम्ही लय मोठे क्रांतिकारी आहात म्हणून लोकसमूह क्रांतिकारी नसतो हो जेपीश्री. समूहाचा आयक्यु किमान असतो. समूह प्रश्नात असलेल्या विषयात वैयक्तिक मते देणे अप्रस्तुत वाटते.

(विचारवंत भूभू)

ढेल्या

आदूबाळ's picture

12 Sep 2016 - 9:24 pm | आदूबाळ

जेपीश्री? पिवळी अक्षरं?

ऐकूया लता मंगेशकरांच्या आवाजातलं सुरेल गाणं, चित्रपट हकीकतः

कहीं ये "वो" तो नहीं....

अनुप ढेरे's picture

12 Sep 2016 - 9:31 pm | अनुप ढेरे

आत्मभानवाले?

साथमे निराकार गधे की जगह एक कुत्ता भी तो आया है.
आता ऐकुया लतादिदींच्या आवाजातच बहुधा.
"हां... तू है वही"

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 9:49 pm | फेदरवेट साहेब

हि हि हि हि ... किमान आम्ही आयडीचा "अष्टवर्ग" जमा करून नंतर मला संपादक करा म्हणून नाही खेटे घालत हो ! ;)

मला तर भीती वाटत होती की आबा मला जेपीश्रींचाच एखादा आयडी समजतायत का काय.....

=))

किती लागतात हो मिनिमम? काही अंदाज?
बाकी गुण कळलेत. कुणाचाय ते सांगायची गरज नाही.

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 9:32 pm | फेदरवेट साहेब

अरे दिवानो मुझे पहचनो, कहाँ से आया, मई हु कौन! ;)

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 8:08 pm | पिलीयन रायडर

आमच्या ओळखीच्या एक काकु शाडूचा गणपती घरी बनवतात, मग त्याचे बादलीत विसर्जन करतात. ती माती गाळुन घेतात आणि परत पुढच्या वर्षी वापरतात. हे अनेक वर्ष चालु आहे.

निर्माल्य कुंड्यांमध्ये टाकता येते.

थर्माकॉलचे डेकोरेशन आम्ही तर अनेक वर्ष वापरतो. फेकुन कधी दिलं नाही.

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 8:16 pm | फेदरवेट साहेब

हे बेस्टे, विशेषतः शाडू बादली अन पुनर्वापर प्रयोग, ह्याची सुजाण लोकांनी सुरु केल्यास चळवळ होऊ शकेल, थर्माकोल सजावट करतानाच जर थर्माकोल मोठ्या गेजचा (जास्त जाडीचा) घेतला तर अजूनच टिकाऊ सजावट होऊ शकते. थर्माकोल नको असेल अन अगदी बायो डिग्रेडेबल साहित्य वापरायचे असेल तर बालसावूड वापरले जाऊ शकते (ऐरो मॉडेलिंग मधील उड्डाण क्षमता असलेली बारकी विमाने तयार करायला वापरलेले लाकूड) ते लाकूड अगदी हलके असते (थर्माकोल समकक्ष) अन खूप टिकाऊ असते, वर्षोंवर्षे चालावे ते. बंगाली लग्नात नवरीच्या डोक्यावरचा मुकुट अन नवऱ्याच्या डोक्यावरची मजेशीर गोल टोपी ह्याच लाकडाची असते, त्याला बंगालात (लाकडाला) सोलापित का कायसे म्हणतात. अन त्या मजेशीर टोपीला टुपुर म्हणतात.

(इंटरनेट ज्ञानी )

ढेल्या

सतिश गावडे's picture

12 Sep 2016 - 8:11 pm | सतिश गावडे

आईची शपथ घालून डीजेला आवाज वाढवण्यास उदयुक्त करण्याबद्दल काहीच लिहीले नाही.

मी-सौरभ's picture

13 Sep 2016 - 12:11 am | मी-सौरभ

मग आपण लिहावे हि विनंती

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

12 Sep 2016 - 8:47 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

गणेश/गणपती असा कोणता देव नव्हताच मुळी,
1)मानव शरीरास हत्तीचे मुख कसे असू शकते??
2)बरं बसवले हत्तीचे मुख,मग शंकराने एक हत्ती मारून पाप केले नाही का??
3)गणपतीने शंकाराला आत सोडले नाही म्हणून शंकराने त्रिशूलने त्याचे मस्तक उडवले???
योगी शंकर इतके रागीष्ठ कसे??? त्यांच्या योगशक्तीचा काय फायदा??
4)लहान मुलाला एक देव ठार मारतो??? म्हणजे हाईटच आहे राव!!

किती सोप्या गोष्टी आहेत,पण विचार कोण करतयं?काय उपयोग आमच्या शिक्षणाचा?काय उपयोग आमच्या शेंबड्या बुद्धीचा?
सबब,ही थेरडेशाही बंद करावी
(प्रतिसाद उडाला तरी i don't care)

सतिश गावडे's picture

12 Sep 2016 - 10:12 pm | सतिश गावडे

काही वर्षांपूर्वी काहीसे असेच प्रश्न माझ्या एका अमेरिकन सहकारीणीने विचारले होते. (जी तेव्हा जवळपास माझ्या आईच्याच वयाची होती) म्हणे, हाऊ अ सुप्रीम गॉड कॅन कील अ चाइल्ड? तेव्हा श्रद्धाळू होतो. तिने विचारलेले प्रश्न पूर्वी कधीच पडले नव्हते. क्षणभर काही सुचलेच नाही. "लॉर्ड शिवा इज अ गॉड ऑफ डिस्ट्रक्शन सो ही कॅन डू इट" असे म्हणून वेळ मारुन नेली होती.

आता असे प्रश्न कुणी विचारले तर मी तीन शब्दांत उत्तर देतो, "these are myths".

खटपट्या's picture

12 Sep 2016 - 11:58 pm | खटपट्या

हेच तो झाकीर नाइकही विचारीत असतो.

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 9:07 pm | फेदरवेट साहेब

तुमचा प्रतिसाद उडायच्या अगोदर मी तुम्हाला चावलो नाही असे व्हायला नको म्हणून हा प्रतिसाद.
आता बघ असं आहे, तू पण डु आयडी, मी पण डु आयडी =))
आपण दोघेही काय वाटेल ते बोलू शकतो. पण म्हणून मी बोलत नाही अन तू बोलतो. तू तुझ्या घरातली सगळी गणपतीची चित्रे फाडून टाक, शिवलिंग फोडून टाक, पण जामावावर तुझा कंट्रोल नाही, त्यामुळे सार्वजनिक जागी असली अक्कल पाजळून उपेग बी नाही
हा ही प्रतिसाद उडाला तरी हरकत नाही

(चावरा) ढेल्या

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

13 Sep 2016 - 12:25 am | खालीमुंडी पाताळधुंडी

त्यामुळे सार्वजनिक जागी असली अक्कल पाजळून उपेग बी नाही

उपयोग आहे,
कारण मिपा वाचूनच मी नास्तिक झालोय.
.
.
एकमेकां नास्तिक करू अवघे धरू सुपंथ

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2016 - 7:53 am | टवाळ कार्टा

नास्तिक असणे आणि दुसर्याच्या देवतांबद्दल काहीही बोलणे या २ वेगवेगळ्या गोष्टी आहेत

फेदरवेट साहेब's picture

13 Sep 2016 - 7:58 am | फेदरवेट साहेब

++१०,०००

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2016 - 8:07 am | टवाळ कार्टा

अण्णा....तुम्ही परत आलात?

फेदरवेट साहेब's picture

13 Sep 2016 - 8:10 am | फेदरवेट साहेब

होय, तुम्ही यझ आयडी म्हणून आमची वासलात लावलीत तरी आम्ही तुमचे पंखेच आहोत हो! येऊन येऊन येणार कोण टका सोडून आहेच कोण. ;)

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2016 - 8:55 am | टवाळ कार्टा

खी खी खी

मी-सौरभ's picture

13 Sep 2016 - 10:49 am | मी-सौरभ

असे पटकन मान्य नाही करायचं.
अजुन थोडे दिवस तुम्हि आम्हाला ईथे हवे आहात. आता त्याची शक्यता कमी झाली :(

मी-सौरभ's picture

13 Sep 2016 - 10:52 am | मी-सौरभ

सध्या जी गणेशाची पुजा उपलब्ध आहे ती संस्कृत मध्ये आहे.
त्याला काही मराठीत पर्याय आहे का?

धर्मराजमुटके's picture

13 Sep 2016 - 5:29 pm | धर्मराजमुटके

१. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का?

शाडूची किंवा इतर मातीची मुर्ती वापरणे हा योग्य पर्याय आहे. कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय देखील चांगला आहे.
मात्र नावीन्याची हौस यामुळे भागवली जाऊ शकणार नाही.

२. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्‍या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अ‍ॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का?

शक्यतो पुरोहित मिळत नाहीत असे होत नाही. मात्र दिवसाचे महत्त्व आणि त्यांच्या अपॉईंटमेंटची संख्या जास्त असल्यामुळे उशीरा येऊ शकतात. तुम्ही भारता बाहेर राहत असाल तर तुम्ही म्हणता तसे असू शकेल. अ‍ॅप वापरणे हा योग्य पर्याय नाही. दरवेळी पुरोहित मिळण्याची अडचण असेल तर जरुरीपुरते स्वतः शिकून घ्यावे. आवाहन मंत्र, विसर्जन मंत्र, दोन चार आरत्या शिकण्यासाठी फार मेहनत लागत नाही. अ‍ॅपवर / मोबाईलवरच आरत्या करायच्या तर मोबाईलवर एक गणपतीचा फोटो टाकून तिथेच अ‍ॅपद्वारे पुजा करावी. हेडफोनवर आरती ऐकावी. घरात वेगळी मुर्ती आणण्याचे काय कारण ?
मध्यस्थ, गुरु कशाला पाहिजे ? अशी भावना असेल तर तो वेगळ्या लेखाचा विषय आहे.

३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई. गोष्टींचा अपव्यय झाल्याचे बर्‍याच वेळा पाहण्यात येते, त्यावर काय ऊपाय करता येइल?
शक्यतो या गोष्टींचा अपव्यय होत नाही. मिठाईचा अपव्यय होतो हे माझ्यातरी पाहण्यात नाही. पण कदाचित तुम्ही म्हणता तसेदेखील होई शकेल. अन्नाचा अपव्यय करणे हे फक्त उत्सवकाळातच होते असे नाही. ती तुमची एक चुकीची सवय आहे. जर तुमच्या घरात नेहमीच अन्न वाया जात असेल तर ते उत्सवकाळात देखील जाणारच. त्यामुळे जर ही सवयच असेल तर मुळापासून सुधारण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर वाईट वाटून घेऊ नये. फुलांचे निर्माल्य झाले तरी ते निसर्गाशी एकरुप होतात त्यामुळे त्यांची चिंता करु नका. तुम्ही प्लॅस्टिकची फुले वापरत असाल तर वेगळा प्रश्न.

ही झाली तुमच्या प्रश्नांची उत्तरे. आता थोडे अवांतर पण महत्त्वाचे :
गणपती बसविणे हा श्रद्धेचा विषय असू द्यावा. उगाच पोराने हट्ट केला म्हणून, बाजूवाले आणतात मग आपण का मागे रहा अशा भावनेतून आणू नये. शक्यतोवर सगळेच सण पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचा प्रयत्न करावा. पुर्वीच्या काळात तंत्रज्ञान जास्त प्रगत नव्हते त्यामुळे साधेपणाने सण साजरे करण्यावर भर असे. तोच साधेपणा वर्तनात दिसू द्यावा. ध्वनी़क्षेपकाचा वापर टाळावा. असेही बाप्पाचे कान मुळातच मोठे आहेत. त्यामुळे त्याला ध्वनीवर्धन करुन ऐकविण्यात काही हशील नाही.
गणेशाचे रुप मुळातच मोहक आणी आनंददायी आहे. पुजा अर्चना मनोभावे व कोणतीही आशा मनात न ठेवता करावी. बाप्पाच्या दर्शनमात्रे मनोकामना पुर्ण होतात. अजून काय मागायचे ? भगवंताची साधना हा एक आनंदोत्सव व्हावा. देण्याघेण्याचा बाजार होऊ नये हा कटाक्ष पाळावा. अमुकतमुक गल्लीचा राजा नवसाला पावतो म्हणून मुर्खपणाने त्याच्या मागे पळून वेडे होऊ नका. असे गल्लोगल्लीचे राजे फक्त त्यांच्या आयोजकांनाच पावतात. तुमच्या घरात तुम्ही मनापासून पुजा केलेया भगवंताच्या रुपापेक्षा कल्याणकारी आणी आनंददायी रुप दुसरीकडे नाहीच याची खात्री बाळगा.

सगुण / निर्गुण च्या वादाचे बळी होऊ नका.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमुक पुजेमागे तमुक विज्ञान आहे, तुळशीमुळे अमू़क होते, दुर्वांमुळे तमुक फायदा होतो असले सो कॉल्ड भंपक विज्ञान आणी भक्ती यांची सांगड कधीही घालू नका. काय होतं की विज्ञानापेक्षा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायच्या नादात लोक धार्मिक कर्मकांडात विज्ञान शोधतात आणी फसतात. या तो चतूर बोलो या तो घोडा बोलो. देवाधर्माला कोणत्याही वैज्ञानिक सर्टिफिकेटची गरज नाहिये हे लक्षात ठेवा. विज्ञान आणि देवधर्म कधीही एक होऊ शकत नाही. त्यामुळे आपले विचार जरी डाऊन मार्केट वाटले तरी भक्ती केवळ आपल्या आनंदापुरती, आपल्या समाधानासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी करावी. त्यात विज्ञान आणूच नये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चष्म्यातून पाहायची सवय असेल तर देवधर्म तुमच्यासाठी नाही याची खात्री बाळगा आणि या वाटेवर चालू नका. तुम्हाला फक्त वाईट गोष्टीच दिसत राहतील आणी मनोस्वास्थ गमवायची पाळी येईल.
असो.
लेखणीला विराम देतो. गणपती बाप्पा मोरया !

छान आणि व्यवस्थित लिहिले आहे. एकूण एक मुद्दे अन परामर्ष आवडला.

गणेशाचे रुप मुळातच मोहक आणी आनंददायी आहे. पुजा अर्चना मनोभावे व कोणतीही आशा मनात न ठेवता करावी. बाप्पाच्या दर्शनमात्रे मनोकामना पुर्ण होतात. अजून काय मागायचे ? भगवंताची साधना हा एक आनंदोत्सव व्हावा. देण्याघेण्याचा बाजार होऊ नये हा कटाक्ष पाळावा. अमुकतमुक गल्लीचा राजा नवसाला पावतो म्हणून मुर्खपणाने त्याच्या मागे पळून वेडे होऊ नका. असे गल्लोगल्लीचे राजे फक्त त्यांच्या आयोजकांनाच पावतात. तुमच्या घरात तुम्ही मनापासून पुजा केलेया भगवंताच्या रुपापेक्षा कल्याणकारी आणी आनंददायी रुप दुसरीकडे नाहीच याची खात्री बाळगा.

सगुण / निर्गुण च्या वादाचे बळी होऊ नका.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमुक पुजेमागे तमुक विज्ञान आहे, तुळशीमुळे अमू़क होते, दुर्वांमुळे तमुक फायदा होतो असले सो कॉल्ड भंपक विज्ञान आणी भक्ती यांची सांगड कधीही घालू नका. काय होतं की विज्ञानापेक्षा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायच्या नादात लोक धार्मिक कर्मकांडात विज्ञान शोधतात आणी फसतात. या तो चतूर बोलो या तो घोडा बोलो. देवाधर्माला कोणत्याही वैज्ञानिक सर्टिफिकेटची गरज नाहिये हे लक्षात ठेवा. विज्ञान आणि देवधर्म कधीही एक होऊ शकत नाही. त्यामुळे आपले विचार जरी डाऊन मार्केट वाटले तरी भक्ती केवळ आपल्या आनंदापुरती, आपल्या समाधानासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी करावी. त्यात विज्ञान आणूच नये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चष्म्यातून पाहायची सवय असेल तर देवधर्म तुमच्यासाठी नाही याची खात्री बाळगा आणि या वाटेवर चालू नका. तुम्हाला फक्त वाईट गोष्टीच दिसत राहतील आणी मनोस्वास्थ गमवायची पाळी येईल.

भारी. मस्त.

अभिजीत अवलिया's picture

13 Sep 2016 - 8:24 pm | अभिजीत अवलिया

मस्त प्रतिसाद धर्मराज मुटके साहेब

सतिश गावडे's picture

13 Sep 2016 - 9:34 pm | सतिश गावडे

सुंदर प्रतिसाद. अगदी मनापासून आवडला. असा विचार प्रत्येक श्रद्धावंताने केला तर सण आणि उत्सव खुपच सुसह्य होतील.

मी-सौरभ's picture

14 Sep 2016 - 6:29 pm | मी-सौरभ

सर्व्प्रथम तुमचा प्रतिसाद आवडला आणि बराचसा पटला देखिल.

माझे काही मुद्दे आहेत

शक्यतो पुरोहित मिळत नाहीत असे होत नाही. मात्र दिवसाचे महत्त्व आणि त्यांच्या अपॉईंटमेंटची संख्या जास्त असल्यामुळे उशीरा येऊ शकतात.

माझ्या स्वतःच्या घरी गणपती स्थापन होत नाहीत पण नातलग आणि मित्रांकडे होतात (मु.पो.: पुणे / परदेश नाही). त्यांच्या अनुभवानुसार गणेश चतुर्थीला गुरुजी मिळणे अवघड जाते.

अ‍ॅपवर / मोबाईलवरच आरत्या करायच्या तर मोबाईलवर एक गणपतीचा फोटो टाकून तिथेच अ‍ॅपद्वारे पुजा करावी. हेडफोनवर आरती ऐकावी. घरात वेगळी मुर्ती आणण्याचे काय कारण ?

अ‍ॅपचा किंवा पुर्वी सीडी / कॅसेट ह्या फक्त प्राणप्रतिष्ठा करताना वापरले जाते आणि माझ्या मते ते सोयीचे आहे. गुरुजी नाहीत किंवा पूजा सांगता येत नाही म्हणून गणपती बसवू नका हा पर्याय पटला नाहीये. गणपती हा पुजार्‍याला पूजा सांगण्यासठी साजरा करत नाहीत.

धर्मराजमुटके's picture

14 Sep 2016 - 7:33 pm | धर्मराजमुटके

अ‍ॅपचा किंवा पुर्वी सीडी / कॅसेट ह्या फक्त प्राणप्रतिष्ठा करताना वापरले जाते आणि माझ्या मते ते सोयीचे आहे. गुरुजी नाहीत किंवा पूजा सांगता येत नाही म्हणून गणपती बसवू नका हा पर्याय पटला नाहीये. गणपती हा पुजार्‍याला पूजा सांगण्यासठी साजरा करत नाहीत.

आपण आपले राहणीमान सुधारण्यासाठी वयाची २०-२५ वर्षे मेहनत करुन शिकत असतो पण दोन-चार आरत्या / श्लोक पाठ करण्याऐवजी कोणत्यातरी सीडी/अ‍ॅपचा आधार घेणे माझ्या मनाला तरी पटत नाही. असो. एकदा प्रयत्नपुर्वक हे करुन बघा. तुमचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. बाकी तुमच्या मताचा आदर आहेच.

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2016 - 8:03 pm | टवाळ कार्टा

आरती पाठ केलेल्याची पूजेची भक्ती जास्त स्ट्रॉंग असते?

धागा आणि प्रतिसाद नेहमीच्या वळणावर जायला सुरुवात झाली आहे. माझे विचार डाऊनमार्केट व चुकीचे आहेत आणि ते मला बदलण्यात स्वारस्य नाहीत. मी आता नम्रपणे रजा घेतो. राग नसावा. धन्यवाद !

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2016 - 8:19 pm | टवाळ कार्टा

आर्र असं काय करता, मला म्हणायचे होते की ज्याला जशी जमेल त्याने तशी पूजा करावी, आपलीच पद्धत जास्त बरोबर असे करू नये अथवा आपली पद्धत जास्त बरोबर कशी ते पटवून द्यावे

धर्मराजमुटके's picture

14 Sep 2016 - 8:29 pm | धर्मराजमुटके

नक्कीच. मी फक्त माझं मत सांगीतलं. आग्रह नाही. ज्यांना आवडेल ते सहमत होतील. नाही आवडलं तरीही हरकत नाही. विरोधी मतांचा खरोखरीच आदर आहेच. आपण इथं येतो ते व्यक्त व्ह्यायला. दुसरं सगळं दुय्यम. तरीही अशा चर्चा वाचून विचारमंथनातून जे बदलतात त्यांच अभिनंदन !

आपली पद्धत कशी बरोबर ते पटवून द्यावे .

अवघड आहे हो. आयुष्यात कधी कुणाला पटवता आलचं नाही. ")

माझं एक आवडतं वाक्य इथे देण्याचा मोह आवरत नाहिये.

"सांगून शिकवून कोणीही शहाणं होत नाही. जो तो आपल्या अनुभवातूनच शहाणा होतो."

मी-सौरभ's picture

15 Sep 2016 - 7:56 am | मी-सौरभ

_/\_

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2016 - 1:59 pm | टवाळ कार्टा

:) मग ठिकाय

लै भारी वाटतय का असे लिहायला? ;)

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2016 - 3:17 pm | टवाळ कार्टा

ए गपे भा(व)ड्या

रंगासेठ's picture

27 Sep 2016 - 5:47 pm | रंगासेठ

मस्त प्रतिसाद, आवडला.

पैसा's picture

15 Sep 2016 - 3:30 pm | पैसा

धर्मराज मुटके यांचे प्रतिसाद आवडले. मराठीतून पूजा किंवा विधीमधे काही बदल हवे असतील तर धाग्यावर आपल्या आत्मुबुवांना बोलवा.

प्रचेतस's picture

15 Sep 2016 - 5:15 pm | प्रचेतस

त्यांचा मिपावरील प्रोफाइल आठवून डोळे पाणावले.

व्यवसायाचे/कामाचे स्वरूप
दूध तापवून देणे. अटवणे. चाटवणे. घो....(माफ करां हं! ;) ) घोटवणे...

थोडक्यात काय?
लोकांना "हवि असलेली" आवडती मिठाई करून देतो.

(हल्ली या कलेला पौरोहित्य असे म्हणतात,पूर्वी संस्कृती संरक्षण असे म्हणत! ;) )

पैसा's picture

15 Sep 2016 - 5:20 pm | पैसा

हा, म्हणूनच त्याना बोलवा म्हटले!

प्रचेतस's picture

15 Sep 2016 - 5:40 pm | प्रचेतस

=))

मी-सौरभ's picture

15 Sep 2016 - 6:16 pm | मी-सौरभ

तू ३ प्रतिसाद टाकून पण बुवा येईनात
चुकन त्यांचे कौतुक केलेस का तू?

प्रचेतस's picture

15 Sep 2016 - 6:23 pm | प्रचेतस

ते सध्या दुसरीकडे मिठाई बनवण्यात व्यस्त असावेत.

मी-सौरभ's picture

19 Sep 2016 - 7:02 pm | मी-सौरभ

ख्या ख्या ख्या !!

मी-सौरभ's picture

24 Sep 2016 - 1:29 pm | मी-सौरभ

काय तरी बोला कि

श्री मुटके यांचा प्रतिसाद आवडला आणि पटला.
साध्या पद्धतीने घरच्या घरी विधिवत पूजा करावी. सार्वजनिक पातळीवर सध्याच्या पद्धतीने केल्याने प्रदूषण आणि अडचणी यापेक्षा काही मिळत नाही. ते बंद झाले की महाराष्ट्र ऊर्जेच्या अपव्ययापासून वाचेल खरोखर.

माझ्या बघण्यात काही उदाहरणे आहेत जी वर लिहिल्याप्रमाणे मुलांनी हट्ट केला म्हणून गणपती बसवतात, यात मराठी तसेच बरेच अमराठीसुद्धा आहेत. त्यातल्या एका अमराठी कुटुंबातली एक छोटी मुलगी थोड्या थोड्या वेळाने घरच्या गणपती समोर जाते आणि तांदळाचे थोडे दाणे त्याच्यावर टाकून निघून जाते. मूर्तींना मागणी जास्त असल्याने काही विक्र्येत्यांकडे गणपती च्या मूर्तीला बाकी स्टफ टाॅईज प्रमाणे हाताळले जाते.
बाकी आयोजकांना पावणाऱ्या राजांबद्दल एवढेच वाटते कि जर भारत राज्यघटनेप्रमाणे धर्मनिरपेक्ष आहे तर सर्व धर्माच्या मंडळींना आपापले देव/देवतुल्य उंब-याच्या आत ठेवणे बंधनकारक का करू नये ?

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 5:07 pm | संदीप डांगे

समान नागरी कायद्याच्या बुमरांगकडे, त्या कायद्याची मागणी करणारे दुर्लक्ष करतात असे आमचे मत..

गामा पैलवान's picture

15 Sep 2016 - 6:08 pm | गामा पैलवान

धर्माराजांचा प्रतिसाद आवडला. ये हुई ना बात! विशेषत: धर्मराजांचा भक्ती आणि विज्ञान वेगवेगळे ठेवायचा सल्ला मनापासून पटला (माझ्या मते धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू मानतो तरीही!).
-गा.पै.

नाखु's picture

20 Sep 2016 - 11:00 am | नाखु

प्रतिसाद खरडीत जतन करणार आहे, अर्थात त्यांच्या परवानगीने.

घराच्या आत (कसोशीने) धर्म ठेवलेला विज्ञानप्रेमी नाखु

धर्मराजमुटके's picture

24 Sep 2016 - 1:44 pm | धर्मराजमुटके

अहो साहेब,
शब्दांवर कुणाची मालकी नसते. जे जे चांगले वाटतील ते ते नक्की घ्यावेत.

बॅटमॅन's picture

20 Sep 2016 - 12:08 am | बॅटमॅन

धमु (धर्मराज मुटके) सरांचा प्रतिसाद आवडला. बाडीस हेवेसांनल.

एरन्दोल्कर's picture

20 Sep 2016 - 1:34 am | एरन्दोल्कर

गनेशा चि मुर्ती हि धातुचिच आसवी.
पुस्तक वाचुन बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा करावी.