✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्मार्ट रेस

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 09/25/2008 - 20:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9568 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2008 - 20:37 नवीन

भीती..

भारतापेक्षा कितीतरी प्रगत देश आहेत जे ह्या सर्वातून आधी गेले आहेत. त्यांचे अनुभव तपासून पाहिले पाहिजेत. त्यांच्या आताच्या पिढीत जे गुण -दुर्गूण आहेत तेच काही वर्षांनी आपल्याकडे दृष्यमान होतील का? ह्यावर संशोधन केले पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ गुरुवार, 09/25/2008 - 20:40 नवीन

छान

विप्रसाहेब, लवकरच लग्नात मंडपाबाहेर वा कार्यालयांमधे चाटेज् गर्भ संस्कार क्लासेसच्या जाहिराती लागतील.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 09/26/2008 - 11:34 नवीन

एवढ्च

http://vipravani.wordpress.com/ बस एवढ्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 09/25/2008 - 20:52 नवीन

चांगली

चांगली विषय आहे, अनुभवी लोकांनी लिहावे, येणार्‍या पिढीला उपयोगी पडेल. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 09/25/2008 - 20:59 नवीन

ही आपली कितवी पिढी आहे

हे आपल्याला माहिती नाही. आपल्या अगोदरच्या पिढ्यांशी तुलना करण्यासाठी पुरेशी माहिती नाही. तरीपण एक सर्वसाधारण बदल प्रत्येक दशकात दिसतो हे खरे आहे.आता हा बदलाचा वेग वाढला आहे हे पण खरं आहे. यासाठी गर्भ-संस्कार किती उपयोगी ठरतात हे मला माहीती नाही. माझ्या नजरेत भिती दाखवून आणि प्रलोभन दाखवून माल विकणे एकाच तागडीत बसते. भावनांना आवाहन करून विक्री करणे हे तंत्र फार जुने आही नाही का? पण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मुलं आता लवकर मोठी व्हायला लागली हे खरं असेल तर एका दृष्टीने बरेच आहे. मला असं ही वाटतं की नवी जनरेशन फार लवकर मोठी म्हणजे फार लवकर पोक्त पण होईल हे नुकसान आहे नाही का? निसर्गाची हीच इच्छा असेल तर ठीक आहे पण नसेल तर ...? अवांतर: मी तुमच्याच पिढीतला माणूस आहे पण तुम्ही लिहीलेले मला बर्‍याच वेळा समजायला कठीण जातं. वेळेचा अभाव मी समजतो पण विचार लिहीताना मला(आम्हाला) सोबत घेऊन चला बॉ. महानुभाव पंथाची शिकवण फार सुरेख होती. पण मानभावी दूर गेले समाजापासून कारण लिखाण क्लिष्ट-क्लिष्ट होत गेलं.(असं मी एमेच्या पुस्तकात वाचलं होतं.) समुपदेशकानी ढ विद्यार्थ्यांसोबत थोडंस.... अती अवांतर--लिपी ब्राम्ही असो वा देवनागरी ढ दोन्हीकडे सारखाच लिहीला जातो म्हणे.. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 09/25/2008 - 21:05 नवीन

आयला

http://vipravani.wordpress.com/ आयला तुम्हीसुद्धा. काय पट्ले नाय बॉ. ती विदुषी काही पण विकत नव्हती. वाचा की निट.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 09/25/2008 - 21:30 नवीन

ढ

तुम्ही ढ तर मी बिपाशा बसु. सांगाल तिथे बसीन. /
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ल
लिखाळ गुरुवार, 09/25/2008 - 21:07 नवीन

.

>>भिती दाखवा आणि विका.<< सुंदर लेख.. हे खरेच आहे. हल्लीची मुले स्मार्ट का? याबद्दलचा अंदाज बरोबर वाटतो. >>भारतापेक्षा कितीतरी प्रगत देश आहेत जे ह्या सर्वातून आधी गेले आहेत. त्यांचे अनुभव तपासून पाहिले पाहिजेत. त्यांच्या आताच्या पिढीत जे गुण -दुर्गूण आहेत तेच काही वर्षांनी आपल्याकडे दृष्यमान होतील का? ह्यावर संशोधन केले पाहिजे.<< पेठकरकाकांच्या या मताशी सहमत आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 09/25/2008 - 21:22 नवीन

आजकाल मुले

आजकाल मुले किती स्मार्ट असतात हो ">>>>>>>> हम्म. मला वाटत की अनेक कारण असतील. माझ्या लक्षात आलेली दोन कारण. पहिल एक ह्याला बहुतेक कारण असेल त्याना मिळत असलेल एक्सपोजर. आजुबाजुच वातावरण. मी लहान असताना एका गल्लीत एक किंवा दोघांकडेच टिव्ही असायचा. आणि अर्थातच चॅनल एकच दुरदर्शन. मग त्यावेळी आम्हाला सास बहुची राजकारण कशी कळणार?? मग आम्ही मोठे होइतो आम्हाला त्यात फारस कळायच नाही. आताची परिस्थिती प्रचंड बदलली आहे. शिवाय दुसर एक कारण असेल अस वाटत ते म्हणजे मिळणारी औषधं. आपल्या आधीच्या पिढीत गर्भवतीची काळजी घेताना नेमकी कोणती औषध देत असायचे हे आता माहीत नाही. पण हल्ली सगळ्या डिफिशियन्सीज गर्भवतीला गोळ्या औषध देवुन पुर्‍या केल्या जातात. जस की फोलवाइट, आयरन, कॅल्शियमच्या गोळ्या. अर्थात मला मेडिकल मधल नॉलेज शुन्य आहे. कुणी जाणकाराने ह्या विषयी लिहिल्यास जास्त बर. पण ह्याचा प्रभाव मुलांच्या वाढीवर होत असावा अस वाटत. वि प्र तुम्ही लेख छान लिहिता. पण थोडी गाडी डबल फास्ट असते. तो वेग पकडायला लेख २-३ वेळा वाचावा लागतो. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 09/25/2008 - 21:24 नवीन

मान्य

http://vipravani.wordpress.com/ झकासराव, मी फास्ट आहे हे एकदम मान्य.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 09/25/2008 - 21:39 नवीन

विचार प्रवर्तक विषय!

प्रभू साहेब, आपण विचार प्रवर्तक विषय मांडलात. आपल्या देशात ह्या विषयावर फारसे लेखन आढळत नाही. मि.पा. वरचे परदेशस्थ भारतीय यावर ज्यास्त प्रकाश टाकू शकतील. अमेरिकेत, पालकांना समुपदेशन केले जाते असे एकून आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Fri, 09/26/2008 - 14:32 नवीन

>>"ह्यावर

>>"ह्यावर उपाय काय? विदूषी उदगारली, " इफ आय कम अक्रॉस द फॉर्मुला, आय विल बी रिचर दॅन मुकेश अंबानी. there is no standart formula for this as every one in this world has an unique identity मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/26/2008 - 14:59 नवीन

इथे लक्षात

इथे लक्षात घेण्यासारखी बाबः पुर्वी मुले नजर धरायला साधारण ४५ दिवस लावायची. आता बरिचशी तान्ही ३ आठ्वड्यात नजर धरतात. हे कशावरुन? पूर्वी बाळंतीणीची खोली अंधारी असायची हल्ली ती भरपूर उजेडाची असते बाळाच्या डोळ्याला प्रकाशाची सवय लवकर होते हे कारण असु शकेल. बाकी हल्लीची मुले थोडी रागीट असतात त्याना पटकन राग येतो. हा टीव्ही वरच्या कार्टुन्स चा प्रभाव असु शकेल. कार्टून्स न बघता पुस्तके वाचणारी, आणि मैदानात खेळणारी मुले कमी रागीट असतात. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 09/27/2008 - 18:25 नवीन

बाकी

बाकी हल्लीची मुले थोडी रागीट असतात त्याना पटकन राग येतो. हा टीव्ही वरच्या कार्टुन्स चा प्रभाव असु शकेल. कार्टून्स न बघता पुस्तके वाचणारी, आणि मैदानात खेळणारी मुले कमी रागीट असतात. हल्लीची मुले एकटी एकटी खुप राहतात, त्यामुळे असेल कदाचीत. पुर्वी मैदानी खेळच जास्त होते. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विनायक प्रभू Fri, 09/26/2008 - 16:01 नवीन

अनुभव

http://vipravani.wordpress.com/ मी कुठ्लेही विधान अनुभव घेतल्यावरच करतो. ७०-८० मध्ये सुमारे १०००० तान्ही बघितली आहेत. सर्व प्रकारच्या प्रदुषणाचा जेनेटीक सायन्स मधे आता विचार होतो आहे. समजतो तेव्ढ सोपे प्रकरण नाही.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/26/2008 - 18:11 नवीन

सूक्ष्म

सूक्ष्म जनुकिय बदलामुळे,शरिरावर आणि मानसिकतेत होणार्या परिणामाची.तीच्या म्हणण्यानुसार एक ६ महिन्याची गर्भवती जेंव्हा अंधेरीला विरार लोकल ला चढ्ते, आणि लटकत असताना तीच्या मनातली असुरक्षिततेची आंदोलने गर्भाच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम करतात. ... पण पोरं माहितीच्या एक्स्पोजरमुळे , भीतीमुळे किंवा एकूणच फास्ट लाईफ, टेन्शन्स यामुळे जास्त स्मार्ट होताहेत असं मात्र आहे, याबद्दल सहमत .... जनुकीय कारणाबद्दल मात्र शंका आहे.... कारण मी तर ऐकलं होतं की जनुकीय बदल घडून यायला अनेक पिढ्या जाव्या लागतात आणि खूप घुसळण आवश्यक असते.... असं एखाद्या दुसर्‍या पिढीत जनुकीय बदल म्हणजे जरा जास्त वाटतंय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 09/26/2008 - 20:16 नवीन

बदल

http://vipravani.wordpress.com/ असुरक्षिततेची मानसिक आंदोलने त्याचा परिणाम मी स्वतः मानतो. प्रगत देशात इंड्स्ट्रीयलायझेशन सुरु झाल्यापासुन डे १ पकडतात. त्या नुसार ४थी पिढी पकडायला हरकत नाही. एकंदरीत ह्या बाबतीत मी पण साशंकच आहे. ही भिती दाखवा आणि काहीतरी विका चे मूळ तर नाही ना? आणि तसे नसेल तर? जेनेटीक सायन्स अजुनही पुर्ण प्रगत झाले आहे का? डोक्याला जाळ. तुमच्या क्षेत्रात हे अजुन घुसले आहे कि नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/26/2008 - 20:35 नवीन

... पण पोरं

... पण पोरं माहितीच्या एक्स्पोजरमुळे , भीतीमुळे किंवा एकूणच फास्ट लाईफ, टेन्शन्स यामुळे जास्त स्मार्ट होताहेत असं मात्र आहे, याबद्दल सहमत .... मीपण सहमत. कारण मी तर ऐकलं होतं की जनुकीय बदल घडून यायला अनेक पिढ्या जाव्या लागतात आणि खूप घुसळण आवश्यक असते.... असं एखाद्या दुसर्‍या पिढीत जनुकीय बदल म्हणजे जरा जास्त वाटतंय... मलाही असंच वाटतं. आईमधे होणार्‍या हॉर्मोनल बदलांमुळे जनुकीय बदल होत असतील मला कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
उ
उर्मिला०० Fri, 09/26/2008 - 18:51 नवीन

यु आर सिंपली ग्रेट.

काका, सहजरित्या न हाताळ्ला जाणारा विषय तुम्ही अगदी सहजरित्या मांडला आहे.मला वाटतं,यासाठी आयुर्वेदाकडे आणि योगशास्त्राकडे वळावंच लागेल.आयुर्वेदानुसार बाळ जन्माला येण्यापुर्वी त्याच्यावर झालेले संस्कार जन्मानंतरच्या संस्काराच्या तुलनेत जास्त प्रभावी ठरतात.यासाठी मातेने पालन करावयाचे नियम आयुर्वेदाकडे आहेत्.ते आहे तसे वापरणे नोकरदार स्त्रीला शक्य नसले तरी त्यात modification करता येते.परदेशात शिक्कामोर्तब झालेले तेच खरे मानणार्‍या इंग्रजाळलेल्या भारतीयांना याचा प्रत्यय येइलच.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 09/26/2008 - 20:50 नवीन

भीती आणि स्मार्टनेस

भीती आणि स्मार्टनेस यांचा परस्परसंबंध कळला नाही. भीती, धाकदपटशा यांनी माणूस दबून राहतो, एकलकोंडा होता, चातुर्य गमावतो एवढीच माझी क्षुल्लक माहिती. :) जनुकिय बदल तेही इतक्या झपाट्याने होणे कठिण वाटते. उद्या कोणीतरी आईला वाटणार्‍या भीतीमुळेच माणसाचे शेपुट गळून पडले असा निष्कर्ष काढायचे. मुलं स्मार्ट होताहेत कारण त्यांना एक्सपोजर जास्त मिळते आहे. उद्धट होताहेत कारण हल्ली कमी असतात संख्येने त्यामुळे घरात मिळणारे महत्त्व हे मुख्य कारण आहे. शेअरिंग किंवा आपली गोष्ट वाटण्याची गरज न राहणे हे दुसरे. बाकी, गर्भसंस्काराचे क्लासेस म्हणजे काय शिकवतात त्यात? पुढची पिढी चक्रव्युहात अडकून मरणारी अभिमन्यू बनली नाही म्हणजे मिळवले.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 09/26/2008 - 22:00 नवीन

नक्की

http://vipravani.wordpress.com/ भिती मुळे माणुस स्मार्ट होत नाही. नक्की, नक्की, नक्की? उत्क्रांती ही सरवायवल च्या भितीने झाली असे मला वाटते. त्यात मुलांचे काय घेउन बसलात. अर्थात भितीचे रुपांतर एखाद्या दुसर्‍या संवेदन स्पंदनात होउ शकते हे मला मान्य आहे. आता मुंबईतच बघा, बाँब स्फोटाच्या दुसर्‍या आठवड्यात विमा मागणार्‍यांची संख्या वाढते. ही भिती की हुशारी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/26/2008 - 22:28 नवीन

हा स्मार्टनेस???

आता मुंबईतच बघा, बाँब स्फोटाच्या दुसर्‍या आठवड्यात विमा मागणार्‍यांची संख्या वाढते.
हा स्मार्टनेस, की तात्कालिक प्रतिक्रिया??? ९/११ नंतर डक्ट टेपचा खप वाढला म्हणतात. (डक्ट टेप तर मामूली गोष्ट, ओसामाची भीती दाखवून बुशप्रभृतींनी घाबरलेल्या अमेरिकी जनतेला पूर्णपणे असंबद्ध इराक-युद्धसुद्धा विकले. पण ते एक सोडा.) त्यापूर्वी वायटूकेच्या वेळीसुद्धा बर्‍याच फालतू गोष्टी खपल्या वगैरे. (चावी मारल्यावर अर्धा तास वगैरे चालणारा रेडियो-कम्-दिवा एरवी कोणी विकत घेईल?) इथे अमेरिकेत सध्या पेट्रोलटंचाईची नुसती अफवा उठली की तातडीनं केवळ भीती-खरेदी सुरू होऊन आख्ख्या गावातले बहुतांश पेट्रोलपंप काही तासांत वगैरे रिकामे झालेले पाहायला मिळताहेत. जिथे शिल्लक आहे तिथे मैलभर रांगा लागून आहे तेही लवकर संपवण्याच्या मागे लागताहेत. अफवा उठली नसती तर ही (कृत्रिम) टंचाई इतक्या लवकर आली नसती. हा स्मार्टनेस??? मी तर म्हणेन की भीतीमुळे स्मार्टनेस वाढत नाही, तर सारासार विचार करण्याची शक्ती गमावल्यामुळे मूर्खपणा मात्र वाढतो, आणि असल्या बकर्‍यांना नको त्या गोष्टी विकणार्‍यांचा स्मार्टनेस तेवढा वाढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sat, 09/27/2008 - 11:34 नवीन

तत्कालिक

http://vipravani.wordpress.com/ तत्कालिक प्रतिक्रिया त्याच्या कुटूंबाकरिता लाँग टर्म शहाणपणा होतो. नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/27/2008 - 20:46 नवीन

नॉट नेसेसरीली

कारण शहाणपणा म्हणून, दक्षता म्हणून जेव्हा माणूस विमा विकत घेतो, तेव्हा तो नीट विचार करून, शॉप-अराउंड करून, आपल्याला योग्य अशा टर्म्सचा विमा योग्य अशा किमतीत चोखंदळपणे विकत घेतो. भीतीपोटी, तात्कालिक प्रक्रियेने दिसल्या पहिल्या एजंटाकडून विमा घेताना हा चोखंदळपणा बाजूला सारला जाण्याचीच शक्यता अधिक, आणि घेतलेला निर्णय लाँग टर्ममध्ये योग्य असेलच याची खात्री नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 09/28/2008 - 08:55 नवीन

तुम्ही

http://vipravani.wordpress.com/ तुम्ही म्हणता तसा तुलनात्मक अभ्यास करुन विमा किती जण घेतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/29/2008 - 23:24 नवीन

बरोबर, पण...

बहुतांश नाही घेत, मान्य! पंण मग यात हुशारीचा, स्मार्टनेसचा भाग कुठे आला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Tue, 09/30/2008 - 14:35 नवीन

चूक

http://vipravani.wordpress.com/ माझेच काही तरी चुकतय बहुदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
प
प्रियाली Fri, 09/26/2008 - 22:24 नवीन

विमा मागणारे

मुंबईतच बघा, बाँब स्फोटाच्या दुसर्‍या आठवड्यात विमा मागणार्‍यांची संख्या वाढते.
अहो याला स्मार्टनेस म्हणतात का? आणि असलाच स्मार्टनेस तर तो लोकांचा की विमा एजंटांचा?
ही भिती की हुशारी?
माझ्यामते हा निव्वळ मूर्खपणा. मागे एका बापाकडून मार खाऊन तोतरे बोलणार्‍या मुलाचे उदाहरण दिले होते. तो जर भीतीने स्मार्ट झाला असता तर मोठ्ठा वक्तृत्वपटू झाला असता ना स्मार्टनेसमुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sat, 09/27/2008 - 18:06 नवीन

खुलासा

http://vipravani.wordpress.com/ विमा मागणारांची संख्या वाढते. त्यांत ए़जंट कुठुन आले. माझ्या माहिती प्रमाणे विमा कुटुंबाकरिता असतो. तो काढण्याकरिता स्फोट्च हवा असतो काही जणांना. ह्या ट्रीगरने जरी काढला तर तो कुटुंबाकरिता शहाण पणाच ना. मुलगा नागपुरला आता जी.एस आहे. सर्व काही ठीक आहे. आता वक्त्रुत्व पटु व्हायला बापाने मारायला पाहिजे असा नियम निघु नये म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 09/27/2008 - 18:28 नवीन

अद्यापही स्पष्ट झाले नाही

लेख तान्ह्या मुलांसाठी आहे. तिथे प्रौढ माणसांची भीती दाखवून विमा काढण्याचे उदाहरण सयुक्तिक नाही. उदाहरणे द्यायचीच झाली तर भीतीने लहान मुले स्मार्ट कशी होतात ते पटवून द्यावे? तो मुलगा आता काय आहे त्याचा प्रश्न नाही. तो जो आता आहे तो समुपदेशाने हे आपण सांगितले म्हणजे बापाने जी भीती घातली त्याने तो स्मार्ट होऊन जीएसला गेला असे म्हणणे विपर्यस्त आहे. मला वाटतं घाईघिसाडीने लेख टाकत राहण्यापेक्षा तुम्हाला कोणते मुद्दे सांगायचे त्यांच्यासाठी कोणती उदाहरणे लागू होतात त्यावर विचार करून लेख टाकावेत.
आता वक्त्रुत्व पटु व्हायला बापाने मारायला पाहिजे असा नियम निघु नये म्हणजे मिळवली.
संबंध काय? गोष्टही तुम्हीच सांगणार आणि विपर्यस्त अनुमानही तुम्हीच काढणार. कमाल आहे. आणि विमा काढणे हा कुटुंबासाठी शहाणपणा नाही. केवळ सावधपणा. शहाणपणा यात आहे की जेव्हा आपल्यावर अवलंबून काही जीव आहेत याची जाणीव झाल्यावर लगेच विमा काढणे. मृत्यू काही बॉम्बस्फोटातच येतो असे तर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ऋ
ऋषिकेश Sat, 09/27/2008 - 21:21 नवीन

अवांतरः जावे त्यांच्या देशा

चर्चा वाचून पुलंचं जावे त्यांच्या देशा मधील वाक्य आठवलं (नीट लक्षात नाहि साधारण देतो): "विका विका विका! बालपण विका, तारुण्य विका, शक्ती विका, भीती विका, कौमार्य विका, विकण्यासारखं उरत नाहि ते वार्धक्य! विक्री हा ज्या देशाचा मुलमंत्र आहे त्या देशांत वार्धक्याचं निर्माल्य होत नाहि पाचोळा होतो.." - पुल. ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 09/27/2008 - 21:27 नवीन

वाचा

http://vipravani.wordpress.com/ प्रियाली ताई, प्रकटनात मी कुठे विदुषी बरोबर सहमत झालो आहे. . सर्वात महत्वाचे म्हणजे मी स्वतः विदुषी जे सांगत आहे ते भिती दाखवुन आण्खी काही विकायचा प्रकार आहे ह्या बाबतीत प्रष्न केला आहे की. बाकी तुम्ही मुलाच्या स्वभावात फरक यायची कारणे म्हणत आहात त्याचा उल्लेख आहे की. रहाता राहीला एक्स्ट्रीम स्टिम्युलस मुळे माणसाच्या स्वभावात काय फरक पडेल हे कोणालाच सांगता येणार नाही. तो भित्रा पण होईल, स्मार्ट होईल. किंवा आण्खी काय होइल हे ठाम पणे सांगता येणार नाही.(नक्की) शेवटी तान्ही कधी ना कधी तरी माणुस होणार आहेत. आणि विदुषी हेच म्हणते आहे. आणि जगभर ह्या विषयावर संशोधन चालु आहे गेली काही वर्षे. पण कुठ्ल्याही ठाम निर्णय होत नाही नेहेमीप्रमाणे. पण शक्यता पण नाकारत नाही मंड्ळी. आहारातुन येणार्या प्रदुष्णाने जेनेटीक प्रोफाइल्स बदलु शकतात ह्यावर जवळ जवळ एकमत होउ घातले आहे. परत हा वादग्रस्त मुद्दा आहे हे मला मान्य आहे.(प्रोटीन कंटामिनेशन)मांणसाला मात्र (सगळीच नव्हे ) हुशार व्हायला ट्रिगर लागतो हे २००० वर्षात अनेक वेळा सिद्ध झाले आहे. हुशार माणसाना ट्रिगर लागत नाही. आणि सगळी हुशार असती तर आज जी परिस्थीती उद्भ्वली आहे ती उद्भवली नसती.(लोकसंख्या, ग्लोबल वार्मींग वगैरे) . माझ्या लेखात सर्व मुद्दे आणि उदाहरणे अगदी बरोबर आहेत अशी आग्रही भुमिका मी कधीच घेतली नाही. उलट संभाळुन घ्या ही नम्र विनंती आधीच केली आहे. किबहुना इथेलिहले जाणारे सर्व बुकर प्राइजच्या लायकीचे असते असे तुम्हाला म्हणायचे नाही ना. मग फार लांब जायची गरज नाही. आज दोन दिवसात मी पण वाचतो आहे की. एका गोष्टीबद्दल मनापसुन धन्यवादः नॉन स्टॉप फुकट सप्लाय बद्द्ल एड्रिनिलिनच्या.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Mon, 09/29/2008 - 22:48 नवीन

मस्त विषय

प्रभू साहेब, विषय रंजक आहे. ऐरणीवर घेतल्याबद्दल आभार! जगभरातल्या संशोधकांचे एका बाबतीत आता मतैक्य होत आहे - आईच्या विचारपद्धतीवर तसेच आजूबाजूला काय घडते आहे यावरुन गर्भावर संस्कार सुरु होतात. तसेच जन्माला आल्या नंतर मिळणारे वातावरण हे ही मुलांच्या स्वभावाला करणीभूत असते. एक छोटे, सामान्य (अनुभवलेले) उदाहरण: अमेरिकन बालके त्यांच्या बुस्टर सीट मध्ये बसून जेवायच्या वेळेला त्यांचे आई-बाप देतील ते मुकाट्याने खातात. त्यांच्या मागे लागावे लागत नाही. मात्र देशी बालके पाच-सहा वर्षाची झाली तरी एका जाग्यावर बसून हाताने जेवत नाहीत. त्यांच्या आया घास घेऊन मागे व लेकरू पुढे असा खेळ बहुतांश देशी (अमेरिकन) घरात चाललेला असतो. कारण? मुलांना लहानपणापासून लावलेल्या सवयी की जैवीक फरक? तर मुलांना लहानपणापासून लावलेल्या सवयी. काही देशी पालक अमेरिकन पद्धतीने अगदी ६व्या महिन्यापासून त्यांच्या लेकरांना बुस्टर सीटवर केवळ खायच्या वेळेतच खायला देतात. नाही खाल्ले तर बस उपाशी... पुढच्या वेळी त्या लेकराची काय मजाल की भूक असून खाणार नाही? बालके अजूबाजूच्या वातावरणाकडून शिकलेली प्रत्येक लहान-मोठी गोष्ट त्यांच्या स्वभावतून/वर्तनुकीतून/बोलण्यातून दाखवून देतात. जितके जास्त विषय त्यांना पहायला मिळतील तितके जास्त ते शिकतात. बाकी आपण काढलेला विषय फार विस्तृत आहे. पण तुर्तास एवढेच. स्-स्नेह, (जिज्ञासू पालक) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा